Hansika : राजस्थान हे जगभरातील पर्यटकांचं आवडतं राज्य आहे. देश-विदेशातील पर्यटक राजस्थानमध्ये पर्यटनासाठी येत असतात. तसेच गेल्या काही दिवसांत राजस्थान हे बॉलीवूड कलाकारांसाठी डेस्टिनेशन वेडिंगचं ठिकाण बनलं आहे. विकी कौशल-कतरिना कैफ, रवीना टंडन-अनिल थडानी आणि प्रियांका चोप्रा-निक जोनासनंतर आता हंसिकादेखील (Hansika) राजस्थानमध्येच लग्नबंधनात अडकणार आहे.
हंसिकाचा पती उद्योगपती!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानी जयपूरच्या 'मुंडोटा' किल्ल्यात सात फेरे घेणार आहे. हंसिका डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. पण ती कोणासोबत लग्न करणार हे अद्याप समोर आलेले नाही. पण तिचा पती उद्योगपती असल्याची चर्चा आहे. हंसिका 450 वर्ष जुन्या 'मुंडोटा' किल्ल्यात लग्नबंधनात अडकणार आहे.
हंसिका मोटवानी एक लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. बालकलाकार म्हणून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. 'शक लाका बूम बूम', 'सास भी कभी बहू थी' आणि 'सोन परी' यांसारख्या गाजलेल्या मालिकांत हंसिकाने काम केलं आहे. या मालिकांच्या माध्यमातून हंसिका घराघरांत पोहोचली आहे. 'कोई मिल गया', 'आपका सरूर' आणि 'मनी है तो हनी' यांसारख्या बॉलिवूड सिनेमांत तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.
हंसिका 4 डिसेंबरला अडकणार लग्नबंधनात
हंसिका 4 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. 2 डिसेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान लग्नविधी पार पडणार आहे. हंसिकाचं लग्न डेस्टिनेशन वेडिंग असणार आहे. या विवाहसोहळ्यात फक्त जवळचे कुटुंबिय आणिमित्रचं सहभागी होणार आहेत. जयपूरला हा लग्नसमारंभ पार पडणार आहे.
हंसिकाच्या नवऱ्याचे नाव गुलदस्त्यात...
हंसिकाच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही. यासंदर्भात हंसिकानेदेखील भाष्य केलेलं नाही. पण लवकरच ती यासंदर्भात चाहत्यांना माहिती देऊ शकते असं म्हटलं जात आहे. त्यामुळे हंसिकाच्या घोषणेकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या