Hansal Mehta : दिग्दर्शक हंसल मेहता 54 व्या वर्षी अडकले लग्नबंधनात; लिव्ह इन पार्टनरसोबत बांधली लग्नगाठ
हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी त्यांच्या लाँग टाइम लिव्ह इन पार्टनरसोबत म्हणजेच सफीना हुसैन (Safeena Husain) यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.

Hansal Mehta : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) हे 54 व्या वर्षी लग्नबंधनात अडकले आहेत. हंसल मेहता यांनी त्यांच्या लाँग टाइम लिव्ह इन पार्टनरसोबत म्हणजेच सफीना हुसैन (Safeena Husain) यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. हंसल मेहता यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हंसल मेहता यांनी त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची माहिती दिली आहे. हंसल मेहता यांनी त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले, '17 वर्षानंतर आपल्या मुलांना मोठं होताना पाहात असताना तसेच स्वत:ची स्वप्न पूर्ण करत असताना आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. जीवनातील इतर गोष्टींसारखेच हे पण अचानक पद्धतीनं घडलं. प्रेम हे इतर गोष्टींवर विजय मिळवते. '
हंसल मेहता यांना अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता राजकुमार रावनं कमेंट करत लिहिलं, 'माझ्या सर्वात आवडत्या जोडीला मी शुभेच्छा देतो.' तसेच मनोज बाजपेयी, हुमा कुरेशी, विशाल भारद्वाज यांनी देखील हंसल मेहता यांना शुभेच्छ दिल्या. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तसेच अगदी साध्या पद्धतीनं हंसल मोहता यांचा विवाह सोहळा पार पडला.
View this post on Instagram
हंसल मेहता आणि सफीना यांना दोन मुली आहेत. हंसल मेहता यांच्या स्कॅम 1992 या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
संबंधित बातम्या
- Sumona Chakravarti : काजोलच्या भावासोबत लग्न करणार? पाहा काय म्हणाली सुमोना चक्रवर्ती
- Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता' शोमध्ये दयाचं होणार पुनरागमन; पाहा काय म्हणाले निर्माते
- Disha Vakani : दिशा वकानी दुसऱ्यांदा झाली आई; दिला मुलाला जन्म
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष






















