एक्स्प्लोर

हानिया आमिरचं जमलं? सिंगरसोबत अडकली लग्नबंधनात? व्हायरल व्हिडीओमुळे चाहते पेचात

Hania Aamir and Asim Azhar Reunite: हानिया आमिरचा व्हिडिओ व्हायरल. अभिनेत्रीनं लग्न केले असल्याची चर्चा.

Hania Aamirs Wedding Rumours Spark Buzz: पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरच्या क्युटनेसवर तिचे चाहते फिदा आहेत. भारतातही तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिच्या सौंदर्याने प्रत्येकजण मोहित होतो. हानिया सोशल मीडियात प्रचंड चर्चेत असते. ती दैनंदिन आयुष्याच्या निगडीत पोस्ट करत असते. दरम्यान, हानिया आमिर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. परंतु, तिच्या चर्चेत येण्यामागचं कारण वेगळं आहे.   सध्या हानिया तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.  ही अभिनेत्री आसिम  अजहरशी गुपचूप विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे.  

गेल्या महिन्याभरापासून हानिया आमिरच्या लग्नाची प्रचंड चर्चा होत आहे.  हानिया आणि आसीम रमजान महिन्यात लग्न करतील, अशी माहिती समोर आली आहे. एका खासगी समारंभात दोघेही निकाह करतील, अशी माहिती आहे. रमजान सुरू होण्यापूर्वी  हानिया आमिरचा एक व्हिडिओ समोर आला आहे.  ज्यामध्ये ती नाचत आणि गाताना दिसत आहे. या व्हिडिओत आसीम देखील दिसत आहे.   हानिया आणि आसीम लग्नाच्या वातावरणात दिसत आहे. या समारंभात मोठ्या संख्येनं  लोक उपस्थित होते. अभिनेत्रीनं पिवळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. तिच्यावर फुलांचा हार घालण्यात आला आहे. तर,  आसीम काळा कुर्ता घालून हानियासोबत नाचताना दिसत आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝐇 𝐎 𝐎 𝐑 (@haniacupid)

हानिया आमिरचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  तर, दुसऱ्या व्हिडिओमध्ये हानिया काही महिलांसोबत नाचताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी हानिया आमीर 'माझं लग्न झालं', असं म्हणताना दिसत आहे.  दोन्ही व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान,  मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे व्हायरल व्हिडिओ हानिया आमिरच्या वाढदिवसाचा आहे. तिचा वाढदिवस 12 फेब्रुवारी रोजी असतो. वाढदिवसाच्या पार्टीची थीम 'लग्न' अशी होती.  हे व्हिडिओ पाहून चाहत्यांना प्रचंड धक्का बसला.

हानिया आणि आसीम यांचा डेटिंगचा इतिहास खूप रंजक आहे.   काही वर्षांपूर्वी दोघांची भेट झाली होती. 2018 साली त्यांनी डेटिंगला सुरुवात केली. परंतु, 2020 साली दोघांचे नाते संपुष्टात आले.  आसीमनं एका अभिनेत्री - मॉडेलसोबत लग्न केलं. परंतु,  2025 साली दोघांनी काडीमोड घेतला. आसीम पुन्हा  हानियासोबत दिसला आहे.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Panchayat 5 OTT Release: बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
Vicky Kaushal on Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
Gaurav More Hindi Webseries: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत
Bobby Deols Aashram Season 4: पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?
पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
BMC : मोठी बातमी : किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
Ketan Agrawal Case :
"तो खूप साधा, मनमिळाऊ होता, केतनच्या स्वप्नातील लग्नासाठी..." केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर वेडिंग प्लॅनरही हळहळले; सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली
Embed widget