Grammy Awards 2022 : 64 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याचे (Grammy Awards 2022) आयोजन लास वेगसमधील एमजीएम ग्रँड गार्डन एरिना येथे पार पडला. या सोहळ्याला नॅट बरगत्जे (Nate Bargatze) अवार्ड देण्यासाठी हेल्मेट घालून स्टेजवर आला. वेबकास्ट होस्ट करत असलेले लेवर बर्टन (LeVar Burton) म्हणाले ,आता मी तुम्हा सर्वांना चेतावणी देत ​​आहे कारण आमचा पुढचा अवार्ड प्रेजेंटर एक विनोदी कलाकार आहे, मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला नक्कीच समजलं असेल. बरगत्जेची ओळख बर्टनने एक कॉमिक म्हणून केली होती. लेवर बर्टन पुढे म्हणाले, 'मी सर्वांना सावध करू इच्छितो, तुमच्या जागेवर रहा आणि तुम्ही हात नियंत्रणात ठेवा.'


नॅट बरगत्जे हा  हेल्मेट घालून स्टेजवज जाण्यामाघे एक खास कारण होते. याचे कनेक्शन थेट विल स्मिथ आणि ख्रिस रॉक यांच्या थप्पड प्रकरणासोबत होते. बरगत्जेनं सांगितलं, 'पुरस्कार सोहळ्यात कॉमेडियनला हेलमेट घालावं लागेल. हेल्मेटमुळे अशी जागा कव्हर होते, ज्या ठिकाणी तुम्ही मला मारू शकता.'


यावर्षी कॉमेडी अल्बम द  ग्रेटेस्ट अॅव्हरेज अमेरिकनसाठी  बरगत्जेला नॉमिनेटेड केलं होतं. त्याच्यासोबतच लावेल क्रॉफर्ड, चेल्सी हैंडलर, लुइस सी.के, लुईस ब्लैक आणि केविन हार्ट यांना देखील नॉमिनेट करण्यात आलं होतं. 






विल स्मिथ आणि ख्रिस रॉक यांचे थप्पड प्रकरण
हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथला ऑस्कर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ऑस्कर सोहळ्यामध्ये एक घटना घडली. विल स्मिथनं  ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावली. विल स्मिथच्या पत्नीबद्दल म्हणजेच  जॅडा स्मिथबद्दल  ख्रिस रॉकनं वक्तव्य केलं. त्यामुळे  विल स्मिननं  विलला कानाखाली मारली होती. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha