Govinda Broke Down in Tears In His Secretary Funeral: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा (Sunita Ahuja) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरलेला असताना दुसरीकडे गोविंदावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटस्फोटाच्या अफवांवर कोणत्याही प्रकारचं वक्तव्य न करणारा गोविंदा कॅमेऱ्यात स्पॉट झाला तो ढसाढसा (Govinda Secretary Funeral) रडताना. त्यामुळे नेटकऱ्यांच्या काळजात चर्रर्र झालं असून नेटकऱ्यांकडून गोविंदाचं सांत्वन करणाऱ्या कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. 


6 मार्च 2025 रोजी गोविंदाचे मॅनेजर शशी प्रभू यांचं निधन झालं. गोविंदाच्या करिअरची सुरुवात झाल्यापासून बराच अवधी शशी प्रभू गोविंदासोबत काम करत होते, त्यामुळे त्यांच्या जाण्यानं अभिनेता पुरता खचल्याचं पाहायला मिळालं. शशी प्रभू यांच्यासोबत गोविंदाचं अगदी जवळचं नातं होतं, त्यामुळे त्यांच्या मृत्यूची बातमी मिळताच गोविंदानं तात्काळ त्यांच्या घरी धाव घेतली. शशी प्रभूंना अंतिम निरोप देताना गोविंदा ढसाढसा रडत होता, नेमका याचवेळी गोविंदा मीडियाच्या कॅमेऱ्यात गोविंदा कैदा झाला. अशातच सध्या नेटकऱ्यांकडून गोविंदाचं सांत्वन केलं जातं आहे. 


VIDEO: एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, तर दुसरीकडे गोविंदावर कोसळला दुःखाचा डोंगर; ढसाढसा रडला अभिनेता


शशी प्रभू यांच्या मृत्यूनंतर 6 मार्च रोजी रात्री 10 वाजता त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच व्हिडीओमध्ये आपल्या अगदी जवळच्या मित्राला, करिअर घडत असताना मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या शशी प्रभूंना निरोप देताना गोविंदा ढसाढसा रडताना दिसला. तसेच, शशी प्रभूंच्या कुटुंबीयांनाही गोविंदा आधर देत असल्याचं पाहायला मिळालं. गोविंदाच्या या कृतीनं त्याचे चाहते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. 


गोविंदा, शशी प्रभू यांच्यात जवळचं नातं 


गोविंदा आणि शशी प्रभू यांच्यात अगदी जवळचं नातं होतं. प्रभू फक्त गोविंदाचे सेक्रेटरी नव्हते, तर बॉलिवूडमध्ये गोविंदाचं करिअर घडत असताना त्याचा आधार आणि त्याचे साक्षीदार होते. दोघांमध्ये निखळ मैत्री होती. शशी प्रभू गोविंदाच्या करिअरच्या अगदी सुरुवातीपासूनच एकमेकांसोबत राहिले.  त्यांनी अभिनेत्याच्या आयुष्यातील चढ-उतारांमध्ये त्यांची खंबीरपणे साथ दिलेली. 






दोघांमधील संबंध कसे होते? 


गोविंदाचे दुसरे सेक्रेटरी शशी सिन्हा यांनी ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल बोलताना सांगितलं होतं की, "त्यांच्यात सुरुवातीपासूनच जवळचं नातं होतं आणि त्यांनी अनेक वर्ष गोविंदासाठी कामही केलं. मी त्याला नंतर ओळखलं. पण गोविंदाच्या सुरुवातीच्या संघर्षात तो त्याच्या भावासारखा होता. गोविंदाचं त्याच्यावर भावासारखं प्रेम होतं आणि आजही त्यांचं नातं तसंच आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Actor Lived With His Wife Dead Body: पत्नीच्या सडलेल्या देहासोबत एक आठवडा राहिला, नंतर...; प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूचं हादरवणारं रहस्य उलगडलं