Actor Lived With His Wife Dead Body: ऑस्कर विजेता (Oscar Winner) हॉलिवूड स्टार जीन हॅकमन (Gene Hackman), त्यांची पत्नी आणि पाळीव कुत्रा काही दिवसांपूर्वी त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. त्यांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला. प्रसिद्ध अभिनेत्याच्या अशा संशयास्पद मृत्यूमुळे इंडस्ट्रीत खळबळ माजली होती. पोलिसांनी तातडीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला. तोपर्यंत या जोडप्याच्या मृत्यूचं कारण कळू शकलेलं नाही. पण आता यासंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. जीन हॅकमन यांचा मृत्यू हृदयरोगानं झाल्याचं उघड झालं आहे. पण एवढंच नाहीतर, मृत्यूपूर्वी जीन हॅकमन त्यांची पत्नी बेट्सी हॅकमनच्या मृतदेहासोबत एक आठवडा राहिल्याचं खळबळजनक खुलासा झाला आहे.
एवढंच नाही तर मृत्यूपूर्वी जीन हॅकमन त्यांची पत्नी बेट्सी हॅकमनच्या मृतदेहासोबत तब्बल एक आठवडा राहिल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. 'सेंटा फी'मधील लोकल मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल एग्जामिनर्सनी सांगितलं की, पत्नी बेट्सी हॅकमनचा हंतावायरस पल्मोनरी सिंड्रोमनं मृत्यू झाल्यानंतर जीन हॅकमॅन एक आठवड्यापर्यंत जिवंत राहिले. जीन हॅकमन यांच्या पत्नीला झालेला आजार उंदरांमुळे पसरतो. 26 फेब्रुवारी रोजी नियमित तपासणी दरम्यान मेक्सिकोमधील त्यांच्या घराच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जीन हॅकमन, त्यांची पत्नी आमि पाळीव कुत्रा मृतावस्थेत आढळले.
अॅडव्हान्स अल्जायमर्स अन् हृदयरोग; जीन हॅकमनच्या मृत्यूचं कारण
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेडिकल एग्जामिनर्सनी दिलेल्या माहितीनुसार, जीन हॅकमॅन अल्जायमर्सच्या अॅडव्हान्स स्टेजला होते. यामुळे त्यांना त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची कितपत माहिती असेल, याबाबत शंका आहे. 95 वर्षीय जीन हॅकमन यांच्या मृत्यूचं कारण केवळ हृदयरोग नव्हतं, तर अल्झायमर देखील होतं.
जीन हॅकमनच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय?
जीन हॅकमन यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, अॅक्टरला अॅडव्हान्स अल्झायमर्स होतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीन हॅकमन यांच्या पत्नीचा Hantavirus Pulmonary Syndrome नं मृत्यू झाला. असं सांगितलं जातं की, पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर एका आठवड्यानं जीन हॅकमन घरात त्यांच्या मृतदेहासोबत राहत होते. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, जीन हॅकमन यांच्या पोटात अन्नाचा एकही कण नव्हता.
11 फेब्रुवारीपर्यंत जीवंत होती अभिनेत्याची पत्नी
जीन हॅकमन यांना पेसमेकर देखील बसवण्यात आला होता आणि 17 फेब्रुवारी रोजी त्यांची तपासणी करण्यात आल्याचं वृत्त आहे. यामध्ये काही अनियमितता आढळून आल्या. या आधारे, अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, बेट्सी हॅकमनचा सर्वात आधी मृत्यू झाला, त्या 11 फेब्रुवारीपर्यंत जीवंत होत्या आणि नंतर अभिनेत्यानं अखेरचा श्वास घेतला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :