एक्स्प्लोर

Gharoghari Matichya Chuli Marathi Serial Track:घरोघरी मातीच्या चुली मालिकेत जानकी-ऋषिकेशच्या नात्यात येणार वादळ; मास्क मॅनचं गुपित उलगडणार

जानकीवरील त्याचं प्रेम, त्याची झुंज आणि त्याच्या भावना या सर्व गोष्टी साकारताना एक वेगळाच अनुभव येत आहे.”

Gharoghari Matichya Chuli Marathi Serial Track:स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका घरोघरी मातीच्या चुली (Gharoghari Matichya Chuli) सध्या प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले असून आता कथा एका अत्यंत उत्कंठावर्धक टप्प्यावर पोहोचली आहे. मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना जानकी आणि ऋषिकेशच्या नात्यात एक मोठं वादळ येताना पाहायला मिळणार आहे. हे वादळ आणणार आहे एक नवं पात्र मकरंद! (Marathi Serial)

12 वर्षांपूर्वीच्या काळात जाणार मालिका (Marathi Serial)

कथेचा प्रवास आता 12 वर्षांपूर्वीच्या काळात जाणार आहे. या फ्लॅशबॅकमधून ऋषिकेश आणि जानकीच्या प्रेमकथेची सुरुवात, त्यांच्या नात्याचा प्रवास आणि त्यांच्या आयुष्यात आलेला मकरंद नावाचा व्यक्ती याचा सखोल मागोवा घेतला जाणार आहे. मकरंद हा शांत, संकोची पण अत्यंत बुद्धिमान स्वभावाचा आहे. त्याचं जानकीवर एकतर्फी प्रेम आहे. मनोमन तो तिला आपली पत्नी मानतो, पण तिचं ऋषिकेशवर असलेलं प्रेम त्याला अस्वस्थ करतं. त्यामुळे तो या नात्याचा सर्वात मोठा अडथळा बनतो. (Gharoghari Matichya Chuli Marathi Serial Track)

मालिकेनं  जिंकली प्रेक्षकांची मने 

या रहस्यमय व्यक्तिरेखेची भूमिका साकारत आहे सुप्रसिद्ध अभिनेता कश्यप परुळेकर. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या कश्यपने या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्याची तयारी केली आहे. तो म्हणतो, “स्टार प्रवाहसोबत माझं नातं अगदी खास आहे. मन उधाण वाऱ्याचं पासून सुरू झालेला माझा प्रवास घरोघरी मातीच्या चुलीपर्यंत आला आहे. मकरंदची व्यक्तिरेखा अत्यंत वेगळी आणि भावनिक आहे. जानकीवरील त्याचं प्रेम, त्याची झुंज आणि त्याच्या भावना या सर्व गोष्टी साकारताना एक वेगळाच अनुभव येत आहे.”

‘मास्क मॅन’चं गुपितही उलगडणार

मालिकेच्या पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना फक्त जानकी-ऋषिकेश-मकरंद या त्रिकोणी नात्याचा संघर्षच नाही, तर ‘मास्क मॅन’चं गुपितही उलगडताना दिसणार आहे. हे रहस्य काय आहे, आणि त्याचा जानकी-ऋषिकेशच्या आयुष्यावर काय परिणाम होणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मालिकेचं कथानक भावनिक, नाट्यमय आणि रहस्यमय वळणांनी सजलेलं आहे. पात्रांमधील नाती, त्यांच्या भावना आणि संघर्ष यामुळे घरोघरी मातीच्या चुली ही केवळ मालिका न राहता एक भावनिक प्रवास बनली आहे. तेव्हा हा रंजक प्रवास अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. पाहायला विसरु नका घरोघरी मातीच्या चुली सायंकाळी 7.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! देशी कट्टा नव्हे तर तुर्कीच्या 'झिगाना' पिस्तुलाने दिला दगा, ऐनवेळी लॉक झाल्याने प्लॅन फसला
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! देशी कट्टा नव्हे तर तुर्कीच्या 'झिगाना' पिस्तुलाने दिला दगा, ऐनवेळी लॉक झाल्याने प्लॅन फसला
Netflix वर साऊथच्या सिनेमाचा कब्जा! येताच नंबर-1, कोर्टातला थरार पाहून व्हाल थक्क!
Netflix वर साऊथच्या सिनेमाचा कब्जा! येताच नंबर-1, कोर्टातला थरार पाहून व्हाल थक्क!
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Madhuri Dixit Ukhana: KBCच्या मंचावर माधुरी दीक्षितचा सातारी ठसका! डॉक्टरांसाठी उखाणा घेताच हास्यजत्रेच्या कलाकारांमध्ये रंगला हास्यकल्लोळ
KBCच्या मंचावर माधुरी दीक्षितचा सातारी ठसका! डॉक्टरांसाठी उखाणा घेताच हास्यजत्रेच्या कलाकारांमध्ये रंगला हास्यकल्लोळ

व्हिडीओ

Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाडली गोळी; पोलिसांकडून दोघांना बेड्या, गावठी कट्टाही जप्त
गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाडली गोळी; पोलिसांकडून दोघांना बेड्या, गावठी कट्टाही जप्त
Anant Singh : चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
Bengal Bay Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
Embed widget