Gharat Ganpati :  तगडी स्टारकास्ट असलेल्या 'घरत गणपती' (Gharat Ganpati) या सिनेमाचा ट्रेलर नुकतच लॉन्च करण्यात आला आहे. प्रत्येक घराची आणि घरातील प्रत्येकाची गोष्ट या घरत गणपती या सिनेमातून दाखवण्यात आलीये. नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर दिग्दर्शित ‘घरात गणपती’ चित्रपटाची निर्मिती नम्रता बांदिवडेकर, नवज्योत बांदिवडेकर, गौरी कालेलकर चौधरी, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी केली आहे. या सिनेमाच्या टीझर लॉन्चवेळी अजिंक्य देव यांनी दिग्दर्शकाचं कौतुक केलं. 


नातेसंबंधातील प्रेम, गोडवा आपल्या सणांच्या माध्यमांतून अधिक  दृढ  होत असतो. मायेने आणि  आपलेपणाने माणसं जोडणाऱ्या घरत कुटुंबातील ‘श्री गणराया’च्या आगमनाच्या वेळी घडणारी गमतीशीर गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या या सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे. ही गोष्ट नवज्योत बांदिवडेकरने साकारली आहे. 


नवज्योत विषयी अजिंक्य देव काय म्हणाले?


नवज्योत विषयी बोलताना अजिंक्य देव यांनी म्हटलं की, "या इंडस्ट्रीसाठी आणि येणाऱ्या मराठीसाठी आणि भविष्यातील स्वातंत्र्यासाठी नवज्योत खूप चांगला दिग्दर्शक आहे. आज या दिवशी आपण इथे उभे आहोत, नवज्योतचा मी खूप आभारी आहे ज्याने मला या चित्रपटात कास्ट केले आहे. त्यामुळे आता एक मोठा दिग्दर्शक सिनेसृष्टीला मिळणार आहे.  घरत गणपती हा सिनेमा येत्या 26 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


तगडी स्टारकास्ट असलेला 'घरत गणपती'


निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर,  शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.  


प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची गोष्ट


'प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची' ही गोष्ट असून नातेसंबंधांचा सुरेख गोफ या चित्रपटात विणला आहे. जो प्रत्येकाच्या मनाला भावेल, त्यामुळेच  पॅनोरमा स्टुडिओज  ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या सोबत  भक्कमपणे उभे असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे मॅनेजिंग  डिरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी सांगितले.  






ही बातमी वाचा : 


Tanushree Dutta : नाना पाटेकरांचं सहा वर्षांनी  #MeToo वर भाष्य; त्यावर तनुश्री दत्ताने पुन्हा केले गंभीर आरोप, म्हणाली, 'मला संपवण्याचा डाव...'