Mumbai Vasai Virar Crime : महाराष्ट्रातील बहुचर्चित आरती यादव हत्याकांडातील आरोपी रोहित यादवनं आपण का खून केला याचा खुलासा आपल्या वकिलाकडे केला आहे. दोन मिनिटाचा राग आणि त्यात तिला संपवलं, असल्याचा खुलासा आरोपीने आपल्या वकिलाकडे केला आहे. रोहित यादवला आगोदर वसई न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. आज सहा दिवसानंतर वालीव पोलिसांनी आरोपीला वसई कोर्टात हजर केल्यावर पोलिसांनी न्यायालयाकडून आणखीन चार दिवसाची पोलीस कोठडी मांगितली होती. वसई न्यायलयाने आरोपीला २७ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या दरम्यान आरोपीने आपल्या वकिलाला सांगितल्याप्रमाणे आरोपीच रोहित आणि मयत आरतीचं सहा वर्षापासून प्रेमसंबध होतं. आरतीने दुस-या मुलाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे अचानक राग अनावर होवून आपल्या होतून हे कृत्य झाल्याच सांगितलं आहे. 18 जून रोजी सकाळी रोहितनं कामावर जाणाऱ्या आरतीवर हल्ला केला. त्यानं लोखंडी पान्याने सपासप 18 वार करत तिला संपवलं. या घटनेनंतर महाराष्ट्र हादरला होता. आरतीचा खून का केला? याबाबत रोहितने वकिलाला सांगितलेय.
रोहितनं पोलिसांना खोटी माहिती दिली -
वालीव पोलिसांच्या अटकेतील आरोपी रोहित यादवच्या सहा दिवसाच्या तपासात पोलिसांना अचंबित करणारी माहिती मिळाली आहे. आरोपी रोहित याने प्रथम आपलं नाव रोहीत रामनिवास यादव असं सांगितंल होतं. तसेच त्याच मुळ गाव रहिसपुर, पोस्ट मिसलगढी, तहसिल तेजगडी जिल्हा रोहतक राज्य हरीयाणा असं सांगितलं होतं. माञ पोलीसांच्या तपासात त्याच खरं नाव रोहित रामनिवास पाल असं आहे. त्याचं मुळ गाव मकान नंबर १६९, हरागांव, गाजियाबाद, थाना – कविनगर जिल्हा गाजीयाबाद, राज्य उत्तर प्रदेश असल्याच निष्पन्न झालं आहे.
आरोपीने प्रथम आपलं मूळ गावी कुणीही नातेवाईक नसून, आई-वडील, बहीण यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. माञ तपासामध्ये त्याचे आई, वडिल आणि दोन बहिणी त्याच्या मूळ गावी असल्याची माहिती मिळाली आहे. तर आता चार दिवसात अटक आरोपीच्या या हत्याकांडात आणखी कुणी सहभागी आहे का? याबाबत कुणाला माहिती अथावा कुणाशी संपर्क केला होता का? याचा तपास आता वालीव पोलीस करणार आहेत.
सपासप वार केल्यानंतर मृतदेहाला जाब विचारत होता -
रोहितच्या मानगुटीवर संशयाचं भूत, मस्तकात राग आणि हातात लोखंडी पाना...जिच्यावर रोहित यादवनं प्रेम केलं, त्याच आरती यादवची दिवसाढवळ्या भररस्त्यात निर्घृणपणे हत्या केली. वसई पूर्वच्या चिंचपाडा परिसरात 18 जून रोजी सकाळी साडेआठ वाजता रोहितने डाव साधत आरतीवर हल्ला केला. आरती कामाला निघाली होती. पाठलाग करणाऱ्या रोहितनं आधी आरतीला जमिनीवर पाडलं.. मग तिच्यावर लोखंडी पान्याने एकामागे एक 15 वेळा हल्ला केला. हे सगळं घडत असताना बरीच गर्दी जमा झाली. एक जण रोहितला रोखण्यासाठी पुढे आला. पण रोहितने त्याच्यावर देखील पाना उगारल्याने तो मागे सरला. आरती निपचीत पडली. तीने प्राण सोडले होते. मात्र रोहितमधला हैवान शांत झाला नाही. क्यूं किया क्यूं किया... असे म्हणत तो आरतीच्या मृतदेहाला जाब विचारत होता. या सर्व घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी रोहित यादवा अटक केली.