एक्स्प्लोर

गौतमी पाटीलचा व्हॅलेन्टाईन कोण? नेमकं लग्न कधी करणार? तिला जोडीदार कसा हवा? ABPच्या पॉडकास्टमध्ये तिनं सगळंच सांगितलं..

Gautami Patil Talks About Marriage Plans and Social Media Proposals: गौतमी पाटीलने सांगितले की सध्या तिचा कुणीही व्हॅलेन्टाईन नाही. ती सध्या पूर्णपणे आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.

Gautami Patil Opens Up About Her Ideal Life Partner: लाखो दिलो की धडकन म्हणजे गौतमी  पाटील. अनेक दिलाची व्हॅलेन्टाईन म्हणून  तिची ओळख. तिनं कमी कालावधीत प्रसिद्धी मिळवली. तिच्या अदा, ठुमके आणि सोज्वळ रूपावर प्रत्येक जण घायाळ आहे. गौतमी केवळ आपल्या लावणी सादरीकरणासाठी नसून, वैयक्तिक आयुष्यामुळेही प्रचंड चर्चेत असते. आज सर्वत्र व्हॅलेन्टाईन्स डे साजरा केला जात आहे. गौतमीचा नेमका व्हॅलेन्टाईन कोण? तिला साथीदार नेमका कसा हवा आहे? असे  अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांकडून उपस्थित केले जातात. याच प्रश्नांवर गौतमीने खास  व्हॅलेन्टाईन्स डे स्पेशल, एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये  खुलासा केला. 

गौतमी पाटीलचा व्हॅलेन्टाईन कोण? व्हॅलेन्टाईन वीक कसा साजरा करतेय? असा तिला प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना गौतमी म्हणाली, "माझा अजिबात कुणीही व्हॅलेन्टाईन नाहीये.  सध्या माझे कार्यक्रमच सुरू आहेत.  व्हॅलेन्टाईन डे असं काही मी सध्या साजरा करत नाहीये. यात मला खरंतर इंटरेस्ट नाही आहे", असं गौतमी म्हणाली. व्हॅलेन्टाईन डे नेमका कसा साजरा करण्यात यावा?  असा प्रश्न गौतमीला प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा गौतमी म्हणाली, "कुठेतरी फिरायला जायचं, एकत्र जेवण करून,  एकमेकांसाठी आम्ही वेळ देऊ.. एवढं ठीक आहे", असं गौतमी म्हणाली. गौतमीचा व्हॅलेन्टाईन व्यक्ती नेमकी कशी असावी, या प्रश्नावर  उत्तर देताना गौतमी म्हणते, "माझा पार्टनर नेहमी समजूतदार असावा.  आतापर्यंत माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. माझ्या भूतकाळाला एक्सेप्ट करणारी असावी. अशी माझी अपेक्षा आहे".

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

लग्नाबाबत गौतमीनं "एवढ्या लवकर मी लग्न करणार नाही. म्हणून व्हॅलेन्टाईन डे पण नंतर साजरा करणार", असं उत्तर दिलं.  लग्न का लवकर करणार नाही? या प्रश्नावर गौतमी म्हणते, "आपल्या करिअरची सुरूवात आता झाली आहे. मी आता सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे.  मला असं वाटतं, की या गोष्टीत मी आता नाही पडलं पाहिजे. करिअरच्या बाबतीत आणखी काही गोष्टी करून, पुढे लग्न करेन.. हे मला बेस्ट वाटतं", असं गौतमी म्हणाली. प्रोपोजलवर खुलासा करत गौतमी म्हणाली, "मला सोशल मीडियावर बरेच प्रोपोजल येतात. आता म्हणतील की, ही बघते मेसेज पण रिप्लाय करत नाही.  आय लव्ह यू गौतमी, असे चाहत्यांचे मेसेज असतात. हे प्रेक्षकांचं प्रेम आहे.  कार्यक्रमात काहींनी लग्नाचीही मागणी घातली आहे", असं गौतमी म्हणाली.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Salman Khan Koffee With Karan 9: 'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Virar Crime: प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Embed widget