Gautami Patil: 'माझ्या वडिलांचा माझ्यावर संशय होता कारण...'; आईचा मोठा अपघात अन् सगळंच बदललं, गौतमी पाटील म्हणाली...
Gautami Patil on Father: गौतमी पाटीलने सांगितला संघर्षाचा काळ. यशाचा टोक कसा गाठला?

Gautami Patils Inspiring Journey: सबसे कातिल गौतमी पाटीलचा (Gautami Patil) चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिने आपल्या जोरावर आपलं नाव कमावलं. गौतमी पाटीलचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतात. तिच्या अदांवर चाहते फिदा आहेत. खानदेशची मुलगी ते महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना, (Gautami Patil Dancer) असा तिचा प्रवास खूप मोठा होता. तिचा आजवरचा प्रवास सोपा नव्हता. कौटुंबिक वादळ, वडिलांचे व्यसन (Entertainment), आईचा अपघात, एवढी वादळं समोर आली असताना गौतमी पाटीलने या सगळ्या गोष्टींवर मात देत आपलं राज्य उभं केलं. अनेक मुलाखतींमध्ये गौतमी पाटील आपल्या पर्सनल लाईफबद्दल बोलताना दिसली आहे. वडिलांना असलेलं व्यसन, त्यांचा नसलेला पाठिंबा, यावर गौतमी पाटील पहिल्यांदाच बोलली आहे.
आपल्या वडिलांबाबत गौतमी पाटील नेमकं काय म्हणाली? (Gautami Patil Opens Up About Her Father)
Grow Motionसोबत बोलताना गौतमी पाटील म्हणाली की, 'माझ्या वडिलांना दारूचे व्यसन होतं. त्यांना संसार ही गोष्टच माहीत नव्हती. त्यांनी आम्हाला आठवीपर्यंत विचारलं नाही. लेकीला किती प्रेम द्यावं हे त्यांना कळत नव्हतं. आईने हात पुढे केला असला तरी वडिलांनी सपोर्ट केला नाही. आम्ही पुण्यात आलो. वडिलांनाही बोलावलं होतं. व्यवस्थित संसार झाला नाही. वडील रोज ड्रिंक करायचे. आईला मारत होते. मी देखील या गोष्टी बघत होते'.
'माझ्यावर देखील काही गोष्टींचा संशय माझे वडील घेत होते. माझ्या आईवर देखील संशय घेत होते. कधीतरी मध्येच म्हणायचे की मला पोरगी नकोय. या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. वडील गेल्यानंतर माझ्या आईने एका कंपनीत काम केलं. बिसलेरीच्या बॉटलच्या कंपनीत माझ्या आईने काम केलं. इतकंच नाही माझ्या आईने लॉन्ड्रीमध्ये देखील काम केलंय. माझ्या शिक्षणासाठी माझी आई हे काम करत होती. पण माझा शिक्षणात रस नव्हता. माझ्या आईची इच्छा होती की मी शिकावं आणि डॉक्टर व्हावं. पैशांमुळे माझं शिक्षण झालेलं नाही. मी दहावीपर्यंत शिकले'.
'माझ्या आईचा अपघात झाला. पुण्यातच अपघात झाला. माझी आई चालत्या बसमधून पडली. माझा डान्स क्लास सुरू होता. मग माझ्या डोक्यात इव्हेंटचा विचार आला. मला महेंद्र सरांनी सपोर्ट केला. तिथून माझी सुरुवात झाली. घर चालवणं हेच माझ्या डोक्यात होतं', असं गौतमी पाटील म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















