Gashmeer Mahajani : गष्मीर महाजनी पुन्हा ओटीटीसाठी सज्ज, या अभिनेत्रीसोबत झळकणार नव्या वेब सिरिजमध्ये?
Gashmeer Mahajani : अभिनेता गष्मीर महाजनी हा लवकरच एका नव्या वेब सिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Gashmeer Mahajani : हिंदी, मराठी मालिका,चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेता गष्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा मागील काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर आणि गष्मीरच्या आईने नुकतच लहिलेल्या त्यांच्या आत्मचरित्रानंतर गष्मीर महाजनी हे नाव वारंवार चर्चेत राहिलंय. दरम्यान गष्मीरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गष्मीर हा लवकरच एका नव्या वेब सिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान गष्मीरच्या या वेब सिरिजबाबत अद्याप कोणत्याही प्रकाराचा खुलासा करण्यात आला नाहीये.
दरम्यान गष्मीरची ही नवी सिरिज डीस्नी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच या सिरिजमध्ये गष्मीरसह अभिनेत्री सुरभी ज्योती देखील झळकणार असल्याचं पाहायला मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. गष्मीर हा द व्हॅम्पायर डायरीजपासून प्रेरित असलेल्या तेरे इश्क में घायाल या कार्यक्रमात झळकला होता. पण आता गष्मीर आणि सुरभी ज्योतीसह गष्मीर एका नव्या कोऱ्या वेब सिरिजमध्ये झळकणार असल्याच्या चर्चांना त्याच्या चाहत्यांना देखील सुखद धक्का मिळाला आहे.
गष्मीर दिसणार मुख्य भूमिकेत
वृत्तानुसार, गष्मीरने डीस्नी या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी एक वेब सिरिज साईन केली आहे. तसेच या वेब सिरिजमध्ये तो मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. परंतु गष्मीरच्या या नव्या सिरिजची नेमकी गोष्ट काय असणार, त्याच्यासोबत या सिरिजमध्ये आणखी कोणते कलाकार झळकणार हे येत्या काही काळामध्येच कळेल.
या सिरिजमध्ये झळकली होती सुरभी ज्योती
अभिनेत्री सुरभी ज्योती ही बरुण सोबतीसह तनहाईया या डीस्नीच्या वेब सिरिजमध्ये झळकली होती. दरम्यान सुरभीचे चाहते मागील काही दिवसांपासून तिच्या चांगल्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. तसेच सुरभी ही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
गष्मीर हा अनेक मराठी सिनेमांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याने हंबीरराव या चित्रपटात साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. त्याने साकारलेल्या या दोन्ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या होत्या. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मृत्यू झाला. त्यावेळी गष्मीरला बऱ्याच अडचणींना समोरं जावं लागलं होतं.