एक्स्प्लोर

सिनेसृष्टीत खळबळ! रेमो डिसूझाकडून 50 लाखांची खंडणी, गँगस्टर रवी पुजारी अटकेत

Gangster Ravi Pujari Sent to Police Custody Till January 27: रेमो डिसूझाकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप. गँगस्टर रवी पुजारीला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.

Gangster Ravi Pujari Sent to Police Custody Till January 27: मनोरंजन सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझाकडून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. गँगस्टर रवी पुजारीने 50  लाखांची खंडणी  मागितली होती.  आरोपीनं रेमो डिसूझाला आणि त्याच्या पत्नीला वारंवार फोन करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.  दरम्यान, हे प्रकरण समोर येताच मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली असून,  आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, पुजारीनं 2018 साली 50 लाखांची खंडणी मागितली होती. याच प्रकरणात त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

पाच वर्षांपूर्वी सेनेगलमधून हद्दपार झाल्यापासून आरोपी रवी पुजारी हा तुरूंगातच होता.  दरम्यान, रेमो डिसूझाकडून  खंडणी मागितल्याप्रकरणी त्याला शिक्षा सुनावण्यात आली नव्हती.    दरम्यान, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्याला 22 जानेवारीला  न्यायालयात हजर केले.  न्यायालयाने आरोपीला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  तो सध्या अटकेत आहे.  पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  यापूर्वी याच प्रकरणातील आरोपी सत्येंद्र त्यागीच्या सांगण्यावरून पुजारीने रेमो डिसूझा आणि त्याच्या पत्नीला धमकी दिली. ऑक्टोबर 2016 ते ऑक्टोबर 2018 या कालावधीत आरोपी रवी पुजारीनं रेमो डिसूझा आणि त्याची पत्नी लिझेल डिसूझाला धमकी दिली. 

तसेच त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा डाव रचला. आरोपीनं डिसूझाच्या मॅनेजरला फोन करून धमकी दिली.  पुजारीनं डेथ ऑफ अमर हा चित्रपट लवकर प्रदर्शित करण्यासाठी दबाव आणला होता.  हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यानं 50 लाख रूपयांची मागणी केली होती.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेमो आणि सत्येंद्र त्यागी  यांच्यात  2018 मध्ये  अमर जस्ट डाय नावाच्या चित्रपटासाठी करार केला होता.   दरम्यान, दोघांमध्ये चित्रपटाच्या हक्कांवरून   तसेच निधीवरून वाद झाले. सत्येंद्र त्यागीने असा दावा केला की, संबंधित चित्रपटात त्याने गुंतवणूक केली होती.  तसेच रेमो डिसूझावर 5 कोटी  रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा  आरोप केला. यानंतर पुजारीनं रेमो डिसूझाच्या मॅनेजरला धमकावण्यास सुरूवात केली.  तसेच ५० लाखांची खंडणी मागितली.  याच वादातून धमकीच्या सत्राला सुरुवात झाल्याचा रेमोचा आरोप होता.

दरम्यान, याच प्रकरणात तब्बल आठ वर्षांनंतर पुजारीवर कारवाई करण्यात आली. गँगस्टार रवी पुजारीला अटक करण्यात आली असून, त्याला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actress Facebook post: 'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
Dev Khel Zee5 Web Series: 'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
Anurag Kashyap on Diljit Dosanjh: 'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...
'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Embed widget