Kantara Ganesh Idol : गणेश चतुर्थी 2024 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. गणेशभक्त बाप्पाच्या आमगनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. गणेशभक्त लाडक्या बाप्पाचे भक्तिभावाने स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुंबई गणेशोत्सव अत्यंत भव्य पद्धतीने साजरा केला जातो. मुंबईतील रस्त्यांवर विविध मंडळे, आकर्षक देखावे करतात. यावेळी विविध आकार, थीमच्या गणेशमूर्ती पाहायला मिळतात. यंदाही गणेशोत्सावावर कांतारा फिवर पाहायला मिळत आहे.
गणेशोत्सवात 'कांतारा' फिवर
2022 मध्ये रिलीज झालेल्या 'कांतारा' चित्रपटाला प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली. या चिपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रिषभ शेट्टीचा दमदार अभिनय आणि दिग्दर्शनामुळे या चित्रपटाला यंदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल. 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'कांतारा' चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट मनोरंजन प्रदान करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट' पुरस्कार मिळाला. 'कांतारा' चित्रपटाबद्दलचा उत्साह अजूनही कायम आहे. याची झलक गणेशोत्सवातचही पाहायला मिळत आहे.
पंजुली दैवाच्या रुपात अवतरले गणपती बाप्पा
ऋषभ शेट्टीच्या कांतारा या चित्रपटाला अलिकडे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 याने गौरवण्यात आलं आहे. यानंतर देशभरातील चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा कांतारा फिवर दिसत आहे. कांतारा चित्रपटापासून प्रेरणा घेत एका मंडळाने भुता कोला-थीमची बाप्पाची मूर्ती बनवली आहे. नवी मुंबईतील एका गणेश मंडळाने 'कांतारा' फेम पंजुर्ली दैवाच्या भूता-कोला रुपातील मूर्ती बनवली आहे. 'कोपरखैरणेचा एकदंत' या मंडळाची ही आकर्षक मूर्ती आहे. या मूर्तीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.फक्त यंदाच नाही तर गेल्या वर्षी 2023 मध्येही गणेशोत्सवात कांतारा चित्रपटाचा ट्रेंड दिसून आला होता.
'कांतारा' गणेशमूर्तीचं धूमधडाक्यात स्वागत
नवी मुंबईतील कौपरखैरणे येथील गणेशोत्सव मंडळाने यंदा 'कांतारा' गणेशमूर्तीचं स्वागत केलं आहे. पांजुर्ली दैवावर आधारित या गणेशमूर्तींची थीम आणि सजावट करण्यात आली आहे. कांतारा चित्रपट रिलीज झाल्यापासून चाहत्यांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकांवर याचा प्रभावही पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने भारतातील छोट्याशा गावातील कथा आणि प्रथा जगासमोर आणली आहे. कांतारा चित्रपटामुळे भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतीची जागतिक पातळीवर ओळख झाली आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
कांतारा 2 चित्रपटाची प्रेक्षकांना आतुरता
कांतारा चित्रपटाने कन्नड चित्रपटसृष्टीसाठी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आता प्रेक्षक कांतारा 2 चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कांतारा चित्रपटाचा दुसरा भाग हा मूळ चित्रपटाचा प्रीक्वेल असणार आहे. या चित्रपटाचं शूटींग पूर्ण झालं असून चित्रपट पोस्ट प्रोडक्शनमध्ये आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :