Salman Khan Will Not Host the Bigg Boss 18 Show : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉसचा 18 वा सीझन लवकरच सुरु होणार आहे. बिग बॉस ओटीटी सीझन 3 संपल्यापासून प्रेक्षक या शोच्या नवीन सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खान बिग बॉस शो होस्ट करताना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. दरम्यान, बिग बॉस 18 संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सलमान खान यंदाचा सीझन होस्ट करणार नाही, अशी चर्चा रंगली आहे.


सलमान खान बिग बॉस शो होस्ट करणार नाही? 


बिग बॉस ओटीटी तिसऱ्या पर्वाची विजेती सना मकबूल ठरली. हा सीझन अनिल कपूरने होस्ट केला होता.  बिग बॉस ओटीटी 3 मध्ये होस्ट सलमान खानची कमतरता प्रेक्षकांना जाणवली. सलमान खानशिवाय बिग बॉस शो अपूर्ण वाटतो. आता बिग बॉस 18 सीझनची चाहत्यांना आतुरता लागली असून प्रेक्षक सलमान खानला छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे.


सोशल मीडियावर चर्चांना उधाण


बिग बॉस ओटीटी सीझन संपल्यानंतर बिग बॉस सीझन 18 ची घोषणा करण्यात आली. हे ऐकून चाहत्यांना वाटले की आता सलमान खान नक्कीच शो होस्ट करणार आहे, पण नुकतीच एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे चाहत्यांची निराशा झाली आहे. यावेळी सलमान खान बिग बॉसचा सीझन 18 होस्ट करणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. 






'या' कारणामुळे शोपासून दूर राहण्याची शक्यता


सलमान खान तब्येतीच्या कारणामुळे यंदाचा सीझन होस्ट करणार नसल्याचं बोललं जात आहे. तब्येतीच्या काही समस्या असल्यामुळे सलमान शो होस्ट करू शकत नाही, असं सांगितलं जात आहे. अलीकडेच सलमान खान एका कार्यक्रमाचा भाग बनला होता. यादरम्यान त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्या सोफ्यावरून उठतानाही अडचण येत असल्याचं दिसत होतं. हे पाहून चाहत्यांनाही त्याची काळजी वाटू लागली.


सलमान खान बिग बॉस शोचा होस्ट असेल की नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र या शोमध्ये सलमान खानला होस्ट म्हणून पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. आता या शोबाबत निर्मात्यांच्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Salman Khan :  Salman Khan ला सोफ्यावरुन उठताच येईना, हातांचा आधार घेऊन उठून उभा राहिला, VIDEO पाहून चाहत्यांच्या चिंतेत भर!