Farmers Agitation in solapur congress Bhavan :- माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) यांच्याशी संबंधित असलेल्या मातोश्री साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं थकवली आहेत. यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत. सोलापुरातील काँग्रेस भवन कार्यालयसमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. हे सर्व शेतकरी धाराशिव जिल्ह्यातून आले आहेत.


मागील अनेक महिन्यांपासून ऊसाचे बिल थकीत असल्याने वेळोवेळी आंदोलन करूनही बिल दिले जातं नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे सोलापुरातील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयासामोरं आंदोलन करण्याची भूमिका  शेतकऱ्यांनी घेतलीय. मागील जवळपास 12 तासापासून शेतकरी काँग्रेस भवनसमोरं बसून आहेत. जोपर्यंत बिल मिळत नाहीत तोपर्यंत हटणार नसल्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.


महत्वाच्या बातम्या:


सोमेश्वर कारखान्याचा विक्रम, शेतकऱ्यांना विक्रमी दर देणारा राज्यातील पहिला साखर कारखाना, नेमका किती दिला दर?