एक्स्प्लोर

Sajinde : गजेंद्र अहिरेंची 'साजिंदे' वेबसिरीज येणार प्रेक्षकांच्या भेटीस; 'व्हीमास मराठी'वर होणार रिलीज

'साजिंदे' ही रोमँटिक वेबसिरीज 'व्हीमास मराठी' या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Sajinde :  दिग्दर्शक गजेंद्र अहिरेंच्या (Gajendra Ahire) प्रत्येक सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो. बाईतल बाईपण प्रभावीपणे मांडणार संवेदनशील मन हे फार कमी पुरुषांकडे असत त्यापैकी एक म्हणजे गजेंद्र अहिरे होय. दर्जेदार चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर गजेंद्र अहिरेंनी मोर्चा वळवला आहे तो वेबसिरीजकडे.  चित्रपटाच्या कथेला प्राधान्य मिळवून देण्यासाठी जी धडपड त्यांची असते तीच धडपड एक कथानक वेबसिरीजमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यास गजेंद्र अहिरेंनी प्रयत्न केले आणि 'साजिंदे' ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आणली. 'व्हीमास मराठी' प्रस्तुत दिदर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित 'साजिंदे' ही रोमँटिक वेबसिरीज 'व्हीमास मराठी' या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'व्हीमास मराठी'च्या 'राडा राडा' या टॉक शो मधून प्राजक्ता माळी आणि पूर्वा शिंदे झळकली त्यांच्या या टॉक शो ला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. आता त्यांची रोमँटिक वेबसिरीज रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला येत आहे. 

अभिनेत्री कश्मिरा ताकटे, अभिनेता ऋषिकेश वांबूरकर, अमित रेखी, अभिजित दळवी, ऋषिकेश पाठारे या कलाकारांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने साजिंदे या वेबसिरीज मधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. तर या वेबसिरीजमधून कश्मिरा हिने सिनेविश्वात पदार्पण केले आहे. तर या वेबसिरीजची कथा, पटकथा, संवाद, गीत, संगीत याची जबाबदारी गजेंद्र अहिरे यांनी स्वतः पेलवली आहे. तर या वेबसिरीजच्या संकलनाची बाजू ओंकार परदेशी याने सांभाळली आहे. 

याबद्दल बोलताना गजेंद्र अहिरे असे म्हणाले की, एक फिल्म संपली की पुन्हा नवीन प्रयोग करायचा, ही अस्वस्थता कायम मला सतावत असते आणि म्हणूनच मी 'साजिंदे' या वेबसिरीजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली, कथा माझ्याकडे तयार होती, शिवाय स्टारकास्टच्या सोबतीने ही आगळीवेगळी कथानक असलेली वेबसिरीज दिग्दर्शित केली. कथा, दिग्दर्शनासह या वेबसिरीजच्या संगीताची बाजूही मी सांभाळली, एकूणच संपूर्ण चित्रीकरणाचा अनुभव विलक्षणीय होता. 'साजिंदे' या वेबसिरीजला ओटीटीवर आणण्यासाठी 'व्हीमास मराठी' या प्लॅटफॉर्मने उत्तम साथ दिली. त्यामुळेच ही वेबसिरीज आज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

हेही वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Protest Mumbai: मराठा आंदोलन संपलं, पण भाकऱ्या अन् पाण्याच्या बाटल्यांची प्रचंड रास उरली, आंदोलकांनी काय केलं?
मराठा आंदोलन संपलं, पण भाकऱ्या अन् पाण्याच्या बाटल्यांची प्रचंड रास उरली, आंदोलकांनी काय केलं?
Maratha Protest : विजय झाला, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार का? मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं यश किती मोठं?
विजय झाला, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार का? मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं यश किती मोठं?
Manoj Jarange patil: उपोषण सोडताच जरांगे पाटलांच्या डोळ्यात आनंदाश्रू; आझाद मैदान गहिवरलं, विखे पाटलांचा खांद्यावर हात
उपोषण सोडताच जरांगे पाटलांच्या डोळ्यात आनंदाश्रू; आझाद मैदान गहिवरलं, विखे पाटलांचा खांद्यावर हात
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ; एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ; एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange PC Mumbai Azad Maidan : आरक्षण लढाई जिंकलो, मनोज जरांगे यांची विजयी पत्रकार परिषद
Manoj Jarange Full Speech : देवेंद्र फडणवीस...महागात पडेल! आझाद मैदानावरील स्फोटक भाषण Azad Maidan
Maratha Reservation: सरकारचा मसुदा ABP Majha च्या हाती, Kunbi प्रमाणपत्र, Hyderabad Gazetteer वर मुद्दे.
Maratha Protest Mumbai दुपारपर्यंत रिकामी करा, मुंबईत मराठा आंदोलनावर हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश
Maratha Protest मध्य प्रदेशातील तरुण-मराठा आंदोलक;आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न,आंदोलकांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Protest Mumbai: मराठा आंदोलन संपलं, पण भाकऱ्या अन् पाण्याच्या बाटल्यांची प्रचंड रास उरली, आंदोलकांनी काय केलं?
मराठा आंदोलन संपलं, पण भाकऱ्या अन् पाण्याच्या बाटल्यांची प्रचंड रास उरली, आंदोलकांनी काय केलं?
Maratha Protest : विजय झाला, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार का? मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं यश किती मोठं?
विजय झाला, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार का? मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं यश किती मोठं?
Manoj Jarange patil: उपोषण सोडताच जरांगे पाटलांच्या डोळ्यात आनंदाश्रू; आझाद मैदान गहिवरलं, विखे पाटलांचा खांद्यावर हात
उपोषण सोडताच जरांगे पाटलांच्या डोळ्यात आनंदाश्रू; आझाद मैदान गहिवरलं, विखे पाटलांचा खांद्यावर हात
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ; एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ; एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब
Maharashtra Live blog Updates: गणेशोत्सवानिमित्त देवेंद्र फडणवीसांच्या घरी महायुतीच्या आमदारांसाठी स्नेहभोजन
LIVE: गणेशोत्सवानिमित्त देवेंद्र फडणवीसांच्या घरी महायुतीच्या आमदारांसाठी स्नेहभोजन
आता, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचे विधिज्ञ सिद्धार्थ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
आता, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचे विधिज्ञ सिद्धार्थ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
Manoj Jarange Protest : गावातील, कुळातील, नात्यातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देणार, हैदराबाद गॅझेटिअरची तातडीने अंमलबजावणी करणार; मराठा उपसमितीचा मनोज जरांगेंना शब्द
गावातील, कुळातील, नात्यातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देणार, हैदराबाद गॅझेटिअरची तातडीने अंमलबजावणी करणार; मनोज जरांगे यांच्या उपोषणाची सांगता
फडणवीससाहेब, कटुता संपवूया, उपोषण सोडतो; 5 व्या दिवशी उपोषणाची सांगता, जरांगे पाटील म्हणाले, आता गावाकडं चला
फडणवीससाहेब, कटुता संपवूया, उपोषण सोडतो; 5 व्या दिवशी उपोषणाची सांगता, जरांगे पाटील म्हणाले, आता गावाकडं चला
Embed widget