Forbes List Worlds Richest Actor: जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता (Worlds Richest Actor) हा एक स्थलांतरित आहे, ज्याची एकूण संपत्ती 1.2 अब्ज डॉलर्स म्हणजेच 10 हजार कोटी रुपये आहे. फोर्ब्सनं एक हटके यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये अमेरिकेतील सर्वात यशस्वी स्थलांतरितांचा (America's Most Successful Immigrants) समावेश आहे. या यादीत अब्जाधीश स्थलांतरितांची (Billionaire Immigrant) नावं आहेत, जे अमेरिकेबाहेर (America) जन्मले होते, परंतु अमेरिकेत स्थायिक झाले आणि त्यांनी मोठं स्थान मिळवलंय. तो या वर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये (Highest-Earning Actor) अव्वल स्थानावर आहे.
जॉर्ज सोरोस, सत्या नाडेला, पीटर थिएल आणि एलॉन मस्क यांसारख्या सेलिब्रिटींव्यतिरिक्त, यादीत एन्टरटेन्मेंट विश्वातील काही कलाकारांचाही समावेश आहे, जसं की, जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता, 77 वर्षीय, जो अमेरिकेतील आयकॉन बनण्यापूर्वी नाझी कुटुंबात वाढला होता. फोर्ब्सच्या मते, अॅक्शन आयकॉन आणि कॅलिफोर्नियाचे माजी गव्हर्नर अर्नोल्ड श्वार्जनेगर यांची एकूण संपत्ती 1.2 अब्ज डॉलर्स म्हणजेच 10 हजार कोटी रुपये आहे.
जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता कोण?
अर्नोल्डनंतर टॉम क्रूझ, ड्वेन जॉन्सन आणि शाहरुख खान यांचा नंबर लागतो, ज्यांची एकूण संपत्ती 800 ते 900 दशलक्ष डॉलर्स दरम्यान आहे. एकमेव अब्जाधीश महिला कलाकार रिहाना आहे, तर एकमेव अब्जाधीश पुरुष कलाकार टायलर पेरी आणि जेरी सेनफेल्ड आहेत. दरम्यान, त्यापैकी कोणीही अभिनेता म्हणून काम करत नाही, दोघेही जगप्रसिद्ध गायक आहेत.
केवळ चित्रपटांमधून कमावले 500 दशलक्ष डॉलर्स
77 वर्षीय अभिनेत्यानं त्याचं बालपण ऑस्ट्रेलियात घालवलं. त्यानं त्याचे पालक, आई ऑरेलिया आणि वडील गुस्ताव अत्यंत शिस्तप्रिय असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळेच त्याचं बालपण अत्यंत शिस्तीत गेल्याचंही त्यानं सांगितलेलं. आज तो हॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. फोर्ब्सच्या मते, त्याने केवळ चित्रपटांमधून 500 दशलक्षपेक्षा डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली आहे.
अर्नोल्ड श्वार्जनेगरचे इतरही अनेक बिझनेस
अर्नोल्ड श्वार्जनेगर उत्तम अभिनेता आहे, पण त्यासोबतच तो एक बिझनेसमनही आहे. कॅलिफोर्नियामधील त्याची रिअल इस्टेट गुंतवणूक आणि अब्जाधीश डेव्हिड बूथच्या डायमेंशनल फंड अॅडव्हायझर्समध्येही त्याची मोठी भागीदारी आहे. आता या अभिनेत्याकडे फिटनेस पब्लिकेशन्स इंक., त्याची फिल्म फर्म ओक प्रॉडक्शन्स, त्याची ट्रेडमार्क आणि फिल्म होल्डिंग कंपनी पंपिंग आयर्न अमेरिका असे अनेक व्यवसाय आहेत. या कंपन्यांच्या मालकानं यावेळी फोर्ब्सच्या यादीत स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :