OTT Platform Netflix True Story Indian Predator: Beast of Bangalore: ओटीटीवर (OTT) प्रत्येक मिनिटाला म्हटलं तरी काहीना काही नवं येत असतं. काही कॉमेडी सीरिज किंवा फिल्म्स असतात, तर काही हॉरर... पण, आज आम्ही तुम्हाला एका खऱ्याखुऱ्या घटनेवर आधारित क्राईम डॉक्टुमेंटरीबाबत (Crime Documentary) सांगणार आहोत. ही फक्त अंगावर शहारेच आणत नाहीतर तुम्हाला पुरतं हादरवून सोडते. आपलं रक्षण करण्यासाठी असलेल्या पोलिसाची ही कहाणी, या डॉक्युमेंटरीच्या तीन भागांमध्ये एका पोलिसाचा भयानक चेहरा दिसतो आणि संपूर्ण सीरिज तुम्हाला हादरवून सोडते. 

समाजात शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्याचं काम पोलीस करतात. लोक अनेकदा पोलिसांवर असा विश्वास ठेवतात. पोलीस जर इथे असतील, तर आपण सुरक्षित आहोत, असं प्रत्येकाला वाटतं. पण कधीकधी आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेला पोलीस समाजातील एखाद्या व्यक्तीसाठी घातक समस्या बनू शकतो. जर तुम्हाला यावर विश्वास नसेल, तर नेटफ्लिक्सची ही डॉक्युमेंट्री पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचा विचार बदलावा लागू शकतो. ही तीन एपिसोड्सची डॉक्युमेंट्री आहे. ही एका रिअल स्टोरीवर आधारित क्राइम डॉक्यू सीरीज आहे. या सीरिजच्या तीन एपिसोड्समध्ये पोलिसाचा खुंखार चेहरा दिसून येतो आणि संपूर्ण सीरिज हादरवून सोडते. 

डॉक्युमेंट्रीचं नाव काय? 

आपण ज्या क्राइम डॉक्युड्रामाबाबत बोलत आहोत, त्याचं नाव 'इंडियन प्रीडेटर - बीस्ट ऑफ बंगलोर' (Indian Predator: Beast of Bangalore) आहे. ही कथा एका व्यक्तीची आहे, जो पोलिसात कॉन्स्टेबल होता. पण हा त्याच्या निर्दयी आणि क्रूर चेहऱ्यावरचा मुखवटा होता. खरं तर, तो एक सीरिअल किलर, बलात्कारी आणि खुनी होता. तो दिवसा गणवेश घालून समाजाचं रक्षण करण्याचा आव आणायचा आणि रात्री त्याच गणवेशाच्या आडून आपला वाईट हेतू अंमलात आणायचा. हा पोलीस उमेश रेड्डी होता. जो एकट्या महिलांना लक्ष्य करायचा. तो त्या महिलांचा पाठलाग करायचा, त्यांच्या घरात घुसायचा, त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि नंतर त्यांना मारायचा.

फाशी देण्याऐवजी मिळाली 'ही' शिक्षा 

'इंडियन प्रीडेटर - बीस्ट ऑफ बंगलोर' (Indian Predator: Beast of Bangalore) या डॉक्यु सीरिजमध्ये उमेश रेड्डीच्या ब्रूटल क्राईमला थ्रिलरच्या स्वरुपात सादर करण्यात आलं आहे. ज्यामध्ये तुम्ही पोलीस, पत्रकार आणि प्रकरणाशी संबंधित काही इतर लोकांच्या रियल इंटरव्यूजही पाहू शकता. काही सीन्समध्ये क्राईम सीनला रीकंस्ट्रक्ट करण्यासोबतच कोर्ट केसचेही डिटेल्स दाखवण्यात आले आहेत. त्या नराधम पोलिसानं तब्बल 18 महिलांसोबत बलात्कार आणि हत्येच्या जघन्य कृत्याची कबुली दिली आणि त्यापैकी नऊ प्रकरणांमध्ये तो दोषी आढळला. 2002 मध्ये त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. पण नंतर ही शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Actress Exposed Salman Khan: 'सलमान खानसोबतच्या आठ वन-नाईट स्टँडमुळे मी थकलेले...'; एक्स-गर्लफ्रेंडकडून सुपरस्टार भाईजानची पोलखोल