Folk Artists Strike: राज्यातील लोककलावंत आपल्या विविध मागण्यासाठी आज (11 जानेवारी, बुधवार ) आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले आहेत. शासन दरबारी लोककलावंत गेल्या अनेक वर्षांपासून मागण्या घेऊन जातात, मात्र त्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे ते संतप्त आहेत. त्यामुळेच लोकनाट्य लोककलावंत मराठी परिषदेच्या नेतृत्वात अनेक कलावंत आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत कलावंत माघार घेणार नाहीत, अशी भूमिका लोककलावंतांनी घेतली आहे.
लोककलावंतांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ?
1. करोना अनुदान पॅकेज बाबत ठोस निर्णय घेण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा...
2. एक खिडकी योजनेतून चित्रपट व नाटयसंस्थेच्या निर्मात्यांना सर्व परवाणग्या एकत्रित देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे लोकनाटय मंडळ , लावणी संच , खडीगमत , दशावतार , भारुड अशा लोक कलेस एक खिडकी योजना चालू करावी .
3. नारायणगाव येथील तमाशा सम्राटीनी स्वर्गीय विठीबाई नारायणगावकर यांच्या नारायणगाव ता . जुनन येथील स्मारकाबद्दल ठोस निर्णय लवकरात लवकर घ्यावा.
4. राज्यातील वेगवेगळया लोककलाप्रकारांच्या निर्मात्यांना राष्ट्रीयकृत बँकेतून मुद्रा लोण मिळावे .
5. संस्कृतिक मंत्र्यांच्या आदेशानुसार सांस्कृतिक धोरण नव्याने ठरवण्याबाबत कमीटी नियुक्ती केलेली आहे. त्यामध्ये संबंधित लोकप्रकारातील एक व्यक्तीस अशासकीय सदस्य म्हणून नेमावे .
6. राज्यातील विविध लोकप्रकराच्या कलावंतास महिना पाच हजार रुपयांचे मानधन वेळेत मिळावे..
7. राज्यात वेगवेगळ्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर राज्यातील पोलिस स्टेशनचे अधिकारी आचारसंहितेचे कारण दाखवून लोकनाटय मंडळ व इतर कलाप्रकारांना परवानगी नाकारण्यात येते, त्याबदल न्याय मिळावा
8. राज्यातील वेगवेगळ्या प्रकारांना कार्यक्रम सादर करण्यासाठी अल्पशा दरामध्ये पोलिस संरक्षण मिळावे .
9 . राज्यातील ग्रामपंचायत , नगरपालिका , महानगरपालिका यांच्याकडून काही कला प्रकारांना तिकीटावर कार्यक्रम करण्यास भरघोस मानदानाची मागणी केली जाते . त्यांना तो परवाना विनामुल्य मिळावा .
10. सास्कृतिक विभागाच्या आमच्या संबंधित येणाऱ्या कमिटयामध्ये आमच्या परिषदेस विचारात घेवून मान्यवर सदस्यांची निवड करण्यात यावी .
11. तमाशा सम्राधिनी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार समिती बरखास्त करण्यात यावी.
दरम्यान, चांगल्या दर्जाची सिनेमे, वेबसीरिज प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळत असल्याने लोककलेकडे दुर्लक्ष झालं आहे. युट्यूबवर लोककलेचे प्रकार उपलब्ध असले तरी ते पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल कमी झाला आहे.