Vanita Kharat Wedding Date : वनिता खरात (Vanita Kharat) हे नाव आता घराघरांत पोहोचलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ती लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. पण आता ती खरचं लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाची तारीखदेखील समोर आली आहे. 


'महाराष्ट्राच्या हास्यजत्रे'च्या सेवटर वनिताच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. पुढे विनोदवीरांनी आपल्या स्किटमध्येदेखील वनिताच्या लग्नाबद्दल भाष्य करायला सुरुवात केली आणि वनिता खरात लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा जगभर सुरू झाली.


वनिताच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण ती कोणासोबत लग्नबंधनात अडकणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. वनिता खरात 2 फेब्रुवारी 2023 रोजी बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत (Sumit Londhe) लग्नबंधनात (Vanita Kharat Sumit Londhe Wedding) अडकणार आहे. वनिता लवकरच तिच्या लग्नासंदर्भात चाहत्यांना माहिती देणार आहे. 






वनिताचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे कोण आहे? (Who Is Sumit Londhe) : 


वनिताचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे हा एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. तसेच तो व्हिडीओ क्रिएटर असण्यासोबत ब्लॉगरदेखील आहे. त्याला फिरण्याची आवड आहे. वनिताने सुमितसोबतचे अनेक फोटोदेखील शेअर केले आहेत. दोघांचेही फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. आता चाहत्यांना फक्त त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा आहे. 


वनिता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमासह 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' (Post Office Ughad Aahe) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे एकंदरीतचं सध्या ती छोटा पडदा गाजवत आहे. या दोन्ही मालिकांचं शूटिंग करण्यासोबत तिने आता लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे. 


संबंधित बातम्या


Vanita Kharat: 'थोडी स्वस्त कॉफी...'; महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातची पोस्ट चर्चेत