Kiki Hakansson Passed Away : जगातील पहिली विश्वसुंदरी किकी हॅकन्सन काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. किकी हॅकन्सन यांचं वयाच्या 95 व्या वर्षी निधन झालं आहे. 4 नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. किकी हॅकन्सन यांचं कॅलिफोर्नियामधील राहत्या घरी झोपेतच निधन झालं. त्यांच्या कुटुंबाने त्यांची मृत्यूची पुष्टी केली आहे. मिस वर्ल्ड इंस्टाग्राम अकाऊंटवरुन याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. किकी हॅकन्सन यांनी 1951 मध्ये इतिहास रचला होता. त्यांनी लंडनमध्ये आयोजित पहिली मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली होती. 


जगातील पहिली विश्वसुंदरी काळाच्या पडद्याआड


स्वीडनमध्ये जन्मलेल्या किकी हॅकन्सनने 1951 मध्ये लंडनमध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत मिस वर्ल्डचा ताज जिंकून इतिहास घडवला होता. 29 जुलै 1951 रोजी लिसियम बॉलरूम येथे आयोजित करण्यात आलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेची सुरुवात ब्रिटनच्या फेस्टिव्हलशी संबंधित एक कार्यक्रम म्हणून झाली. नंतर, ही स्पर्धा नंतर जागतिक संस्था बनली. किकी हॅकन्सन यांच्या विजयाने मिस वर्ल्ड वारसा सुरू झाला. मिस वर्ल्ड स्पर्धेच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन किकी हॅकन्सन यांना श्रद्धांजली अर्पण करत त्याच्या निधनावर दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे.


 






मिस वर्ल्ड अकाऊंटवरुन श्रद्धांजली


मिस वर्ल्ड इंस्टाग्राम पेजने केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय, "पहिली मिस वर्ल्ड, स्वीडनमधील किकी हॅकन्सन यांचं सोमवारी, 4 नोव्हेंबर रोजी कॅलिफोर्नियातील त्यांच्या घरी निधन झालं. त्या 95 वर्षांच्या होत्या. किकी यांचं झोपेत निधन झालं". किकी हॅकन्सन यांनी 1951 मध्ये लंडनमध्ये मिस वर्ल्ड किताब जिंकला. त्यांचा मुलगा, ख्रिस अँडरसन, त्याच्या आईचे वर्णन "वास्तविक, दयाळू, प्रेमळ आणि मजेदार" असे केलं आहे. "तिच्याकडे विनोद आणि बुद्धीची तल्लख भावना आणि मोठं हृदय होतं".


"आम्ही किकीच्या सर्व कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो, या कठीण वेळी आमचं प्रेम आणि प्रार्थना तुमच्यासोबत आहेत", असं ज्युलिया मोर्ले यांनी म्हटलंय. "किकी ही खरी पायनियर होती आणि म्हणूनच किकीला पहिली "मिस वर्ल्ड" बनून इतिहासात तिचे स्थान मिळणे योग्यच होतं. आमच्या अंतःकरणात कायमस्वरूपी असलेल्या केर्स्टिन (किकी) हॅकन्सनच्या पहिल्या मिस वर्ल्डच्या स्मृती अनंतकाळ राहिलं."


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Anushka Shetty Birthday : रश्मिका-समंथा आधी साऊथ सिनेमातील दिग्गज सेलिब्रिटी, योगा इंस्ट्रक्टर ते अभिनेत्री; वाढदिवसानिमित्त जाणून घ्या अनुष्का शेट्टीचं मूळ नाव काय?