Kiran Rao Birthday: किरण राव सध्या तिच्या ऑस्कर एन्ट्रीमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिच्या सिनेमासह तिच्या आणि आमिरच्या नात्याविषयीही समाजमाध्यमांवर आणि चाहत्यांमध्ये मोठे कुतुहल असते. लग्नाच्या 16 वर्षांनंतर किरण आणि अमिर खान वेगळे झाल्यानंतरही आज हे दोघेही आल्या परिवारासोबत आपल्या मुलांची एकत्र काळजी घेताना दिसतात. दोघांमध्ये आजही चांगली मैत्री आहे. आपल्या चांगल्या कामाचं श्रेय कायम अमिर खानला देणं हे आसपासच्या लोकांना फारसं रुचत नसल्याचं तिनं नुकतंच माध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान ती आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. तिनं आमिरसोबत कोणकाेणते सिनेमे केले जाणून घेऊयात.
सक्सेसचं क्रेडिट आमिरला देणं म्हणजे..
किरण राव हिची दुसरी फिल्म लापता लेडिजने केवळ भारतीयांचच नाही तर जगभरात नाव काढत ऑस्करसाठी एन्ट्री मिळवली आहे. देशभरातून तिचं मोठं कौतूक होत आहे. या चित्रपटाला तिच्या एक्स पतीने म्हणजेच अमिर खानने प्रोड्यस केल्यानं अनेकांना दिग्दर्शक म्हणून तिनं हे क्रेडिट अमिरला देणं फारसं रुचत नसल्याचं ती म्हणाली आहे.
आमिरविषयी किरण म्हणाली..
किरणने दिग्दर्शित केलेली फिल्म लापता लेडिज जरी आमिर खानने प्रोड्यूस केली असली तरी किरण या चित्रपटाच्या यशाचं क्रेडिट अमिरलाच देताना दिसते. पण लोकांना ही गोष्ट फारशी रुचत नसल्याचं तिनं सांगितलंय. तिच्या पूर्व पतीला या यशाचं क्रेडिट देणं लोकांच्या दृष्टीनं थोडं चूकीचं असल्याचं तिनं सांगितलंय, करीना कपूरच्या शोमध्ये किरणने तिच्या यशाचं क्रेडिट अमिर खानला दिल्याचे दिसले. पण हे क्रेडिट दिले हे लोकांना फारसे रुचले नसल्याचं ती सांगते. हे खरतंर स्वाभाविक आहे. कारण अमिर कायमच त्याच्या दर्जेदार कलाकृतींमुळे ओळखला जातो. व्यक्तिगतरित्यासुद्धा माझ्या आयुष्यात मिळालेल्या अनेक यशामध्ये माझ्या सपोर्टिव्ह आणि ब्राईट पार्टनरचा मोठा वाटा आहे. त्याचं डोकं आणि बुद्धी या दोन्हीचा माझ्या विचारांशी मेळ बसतो. तो माझ्या प्रत्येक कामाला प्रोत्साहन देतो. माझ्या आयुष्यात त्यानं मोठी भूमिका निभावली आहे. पण केवळ दुसऱ्यांना वाटतं म्हणून मी कमवलेल्या गोष्टींचं क्रेडिट त्याला देणं ही गोष्ट चूकीची आहे. अनेक महिलांना ही गोष्ट कबूल करावी लागेल. त्यांच्यासोबत असं घडलं असेल. असं किरण म्हणाली.
लापता लेडिससह कोणते सिनेमे केलेत किरणने?
लापता लेडिज या सिनेमाआधी २०११ मध्ये रिलिज झालेल्या धोबी घाट या सिनेमातून किरणने दिग्दर्शनात पाऊल टाकलं. या सिनेमाला बॉक्सऑफिसवर फार कमाई करता आली नसली तरी या चित्रपटाला फिल्म क्रिटिक्सनेही दाद दिली होती. किरणने आमिरसोबत अनेक लोकप्रीय चित्रपटांची सहनिर्मिती केली आहे. यात जाने तू या जाने ना, पीपली लाईव्ह, तलाश, दंगल या चित्रपटांचाही समावेश आहे.