South Actress Anushka Shetty 43rd Birthday : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिचा 7 नोव्हेंबर रोजी 43 वा वाढदिवस आहे. रश्मिका आणि समंथाच्याही आधी साऊथ सिनेमातील एकमात्र मोठा चेहरा म्हणून अनुष्का शेट्टीकडे पाहिलं जायचं. बाहुबली सारख्या क्लासिक कल्ट चित्रपटातही अनुष्का शेट्टीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनुष्का शेट्टी साऊथ ऑडियंससह हिंदी भाषिकांमध्येही खूप प्रसिद्ध होतं. अनुष्का शेट्टीचा आज जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म यायच्या आधी टीव्ही अन् थिएटर हेच मनोरंजनाचं साधन होतं. त्यावेळी अनुष्का शेट्टीने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत मोठा चाहतावर्ग निर्माण केला, ज्याला आज कोणतीही अभिनेत्री टक्कर देऊ शकत नाही.


 


थिएटर आणि टीव्ही याकडे मनोरंजन म्हणून पाहिलं जात असतात. अनुष्का शेट्टी हे नाव प्रामुख्याने प्रसिद्धीझोतात आलं. टीव्हीवर हिंदी सिनेमांसोबत साऊथ चित्रपट दाखवले जायचे. यावेळी कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात काम न करता हिंदी भाषिकांमध्ये प्रसिद्ध झालं. अनु्ष्काने ड्रामा, ॲक्शन, रोमान्स, थ्रिलर अशा विविध प्रकारच्या करत टीव्हीवर हिंदी भाषिकांची मने जिंकली. हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्ये हे नाव रुळलं. अरुंधती, रुद्रमादेवी, लिंगा, निशब्दम यासारख्या अनेक चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 


अभिनेत्री अनुष्का शेट्टीचं खरं नाव काय?


अनुष्का शेट्टीचा जन्म कर्नाटकातील मंगळुरू येथे 7 नोव्हेंबर 1981 रोजी झाला. अनुष्काचं मूळ नाव स्वीटी आहे. तिचं शालेय शिक्षण बंगळुरुमध्ये झालं. त्यानंतर तिने माउंट कार्मेल कॉलेजमधून (Mount Carmel College) कंम्प्यूटर ॲप्लिकेशनमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केलं. अनुष्का शेट्टी एक योगा एक्सपर्टही आहे. अभिनेत्री होण्यापूर्वी अनुष्का शेट्टीने योग इंस्ट्रक्टर म्हणून काम केलं आहे.


स्वीटी शेट्टीला अनुष्का शेट्टी नाव कसं मिळालं?


'बाहुबली'मध्ये 'देवसेना'ची भूमिका साकारून आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अनुष्का शेट्टी ही दक्षिण चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेत्री आहे. अनुष्का शेट्टीने सुपर या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाच्या शुटींग वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आणि निर्माता-अभिनेता नागार्जुन यांच्या मनात अभिनेत्रीसाठी स्क्रीन नाव देण्याचा विचार आला, कारण त्यांना वाटलं की स्वीटी नाव प्रेक्षकांना पसंती पडणार नाही. यानंतर त्यांनी त्याच चित्रपटातील गायिका अनुष्का मनचंदा हिचं नाव आवडलं आणि त्यानंतर स्वीटी शेट्टीने अनुष्का शेट्टी हे स्क्रिन नाव स्वीकारलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


वास्तव चित्रपटाच्या सेटवर संजय दत्तने संजय नार्वेकरांना दिलेली 'अशी' वागणूक; म्हणाले, "मी ते कधीही विसरु शकणार नाही"