मुंबई :  70 आणि 80 दशकातील प्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवैल (Rahul Rawail) यांच्या बहिणीचे म्हणजेच रौशनी रवैल सेठी (Raushni Rawail Sethi) यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राहुल रवैल यांनी एबीपी न्यूजला माहिती दिली. ते म्हणाले, 'कोरोनाची लागण झाल्यानं माझ्या बहिणीवर मुंबईतील चेंबूर येथील सुराणा सेठिया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे उपचार सुरू होते. आज दुपारी तीन वाजता तिचे निधन झाले.'

एबीपी न्यूजसोबत संवाद साधताना राहुल रवैल यांनी सांगितलं की त्यांच्या बहिणीला कोरोनासोडून दुसरा कोणताही आजार नव्हता. राहुल रवैल यांनी  लव्ह स्टोरी (1981), बेताब (1983), अर्जुन (1985), डकैत (1987), जीवन एक संघर्ष (1990), बेखुदी (1992) अंजाम (1994), और प्यार हो गया (1997), अर्जुन पंडित (1999), जो बोले सो निहाल (2005) यांसारख्या हिट चित्रपटांची निर्मीती आणि दिग्दर्शन केले आहे. 

रौशनी रवैल सेठी यांचा मुलगा रजत रवैल (Rajat Rawail) देखील चित्रपट निर्माता आहे. रजत यांनी अभिनय क्षेत्रात देखील काम केले आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये कॉमेडियनची भूमिका साकारली आहे. तसेच सलमान खानचा 2011 साली प्रदर्शित झालेल्या बॉडीगार्ड या चित्रपटामधील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. तसेच  जुडवा 2 (2017), कुली नंबर 1 (2020) या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. 

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha