Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांमध्ये 10.6 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1270 नवीन रुग्ण आढळले असून 31 जणांचा मृत्यू झाला आहे. काल कोरोनाचे 1421 रुग्णांची नोंद आणि 149 जणांचा मृत्यू झाला होता. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
सक्रिय प्रकरणांची संख्या 15 हजार 859 इतकी कमी झाली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवार दिवसभरात देशात 1 हजार 567 रुग्ण कोरोनातून बरे झाले. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 859 वर पोहोचली आहे. कोरोना विषाणुमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 35 झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 83 हजार 829 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 183 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 183 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. रविवार दिवसभरात 4 लाख 20 हजार 842 डोस देण्यात आले. आतापर्यंत लसीचे 183 कोटी 26 लाख 35 हजार 673 डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांवरील लोकांना 2 कोटींहून अधिक (2 कोटी 25 लाख 80 हजार 52) प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Bharat Bandh : आज आणि उद्या भारत बंदची हाक, संपाचा तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या 8 ठळक मुद्दे
- Amaranth Yatra : 30 जूनपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा, 43 दिवस चालणार, कोरोनामुळे यात्रा दोन वर्षे होती रद्द
- West Bengal Violence : बीरभूम हिंसाचार प्रकरणात 21 आरोपी असल्याची सीबीआयची माहिती, 10 जणांचा झाला होता जळून मृत्यू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha