Farhan Akhtar on Shibani Dandekar : अभिनेता फरहान अख्तर हा केवळ एक प्रसिद्ध अभिनेता नाही तर एक प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून देखील सिनेसृष्टीत ओळखला जातो. बॉलिवूडमधील फरहान अख्तरचे अनेक चित्रपट सुपरहिट देखील ठरले. त्याच्या क्लासिकल सिनेमांमुळे फरहान नेहमी चर्चेत असतो. दरम्यान, अभिनेता फरहान अख्तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत आलाय. फरहान आणि शिवानी हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल पैकी एक आहे.  दरम्यान आता  फरहान अख्तर आणि अभिनेत्री शिवानी दांडेकर लवकरच आई-बाबा होणार असल्याची चर्चा सुरु आहे. 




फरहान अख्तर आणि अभिनेत्री शिवानी दांडेकर यांच्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फरहान आणि शिबानी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करण्याची तयारी करत आहेत. या बातमीने चाहत्यांना आणखीनच आनंद झाला आहे. सोशल मीडियावर फॅन्स फरहानला वाढदिवसाच्या तर देतच आहेत. मात्र, तो बाबा होणार असल्याची चर्चा देखील सुरु झाली आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिवानी प्रेग्नंट आहे आणि या वर्षाच्या अखेरीस तिच्या घरी छोट्या पाहुण्याचं स्वागत करणार आहे. फरहान अख्तर आणि शिवानी अख्तरने फेब्रुवारी 2022 मध्ये लगीनगाठ बांधली होती. त्यांचे लग्न हे अतिशय खासगी पार पडले होते.  फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. खंडाळा येथे त्यांचा विवाह सोहळा पार पडला होता. फरहान अख्तरने 8 जानेवारीला त्याचा 51 वा वाढदिवस कुटुंब आणि मित्रांसोबत साजरा केला. शिबानी अख्तरही यावेळी सेलिब्रिटी मित्रांसोबत तिथे दिसली.


2022 मध्ये शिबानी अख्तरच्या प्रेग्नेंसीच्या अफवा चर्चेत आल्या होत्या, पण तिने अतिशय हुशारीने या अफवा फेटाळून लावल्या. शिबानीने स्वतःचा मिरर सेल्फी पोस्ट केला आणि स्पष्टपणे सांगितले की ती गर्भवती नाही. मात्र, आतापर्यंत तिच्या प्रेग्नेंसीच्या वृत्तावर तिच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


करोडो रुपयांचा सेट, कोट्यवधींचं रक्तचंदन, पुष्पा-2 सिनेमा कसा तयार झाला? मेकिंगचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!


Blockbuster Celebrity Actress: बॉक्स ऑफिसची क्वीन आहे, एकमेव भारतीय अभिनेत्री; केलीय 10,000 कोटींची कमाई, अल्लू अर्जुनतर जवळपासही नाही