Farhan Akhtar, Shibani Dandekar wedding photos : बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) 19 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत शिबानी आणि फरहानचा विवाह सोहळा पार पडला. नुकतेच फरहान आणि शिबानी यांनी त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


फरहाननं लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'काही दिवसांपूर्वी मी आणि शिबानी लग्नबंधनात अडकलो आहोत.आम्ही त्या सर्वांचा आभार मानतो ज्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याचे काही फोटो आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.' तर शिबानीनं या विवाह सोहळ्याचे फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'Mr & Mrs'






शिबानीची बहिण अनुशा दांडेकर, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, अभिनेता ह्रतिक रोशन, फरहानची बहिण जोया अख्तर, अमृता अरोरा, जावेद अख्तर आणि शबाना आझमी या सेलिब्रिटींनी फरहान आणि शिबानीच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली.  






फरहान आणि शिबानीनं 2018 पासून एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. फरहाननं त्याच्या पहिल्या पत्नीसोबत म्हणजेच अधुना भबानीसोबत 2017 साली घटस्फोट  घेतला. अधुना आणि फरहाननं 2000 मध्ये लग्नगाठ बांधली होती.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha