एक्स्प्लोर

Farhan Akhtar On Raveer SIngh: सैफविषयी बोलता बोलता अचानक रणवीर सिंहवर घसरला, फरहान अख्तरचा 'डॉन 3'वरून टोला; म्हणाला...

आत्तापर्यंत दोघांपैकी कोणीही थेट एकमेकांविषयी काही बोललं नव्हतं. मात्र पहिल्यांदाच फरहान अख्तरने या मुलाखतीतच रणवीर सिंह वर अप्रत्यक्ष टोला लगावला.

Farhan Akhtar on Ranveer Singh: फरहान अख्तरचा 'डॉन 3' (Don 3) सध्या रखडलाय.  हा चित्रपट पुन्हा कधी सुरू होणार यात मुख्य भूमिकेत कोण दिसणार? हा सध्या मोठा प्रश्न आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेता रणवीर सिंहने (Ranveer Singh) या चित्रपटातून ऐन वेळेस माघार घेतल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.  FWICE नं रणवीर सिंहवर बंदी घातली होती. नंतर ही बंदी उठवण्यात आली. 40 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईवरून फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि रणवीर सिंह या दोन्ही कलाकारांमधील वाद होते. दोघांनी आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी,हा वाद अद्याप पूर्णपणे मिटलेला नाही. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत, फरहान अख्तरने केलेल्या एका सूचक टिप्पणीमुळे 'डॉन 3' चा हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. आत्तापर्यंत दोघांपैकी कोणीही थेट एकमेकांविषयी काही बोललं नव्हतं. मात्र पहिल्यांदाच फरहान अख्तरने या मुलाखतीतच रणवीर सिंहवर अप्रत्यक्ष टोला लगावला. 'दिल चाहता है' चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका मुलाखतीत तो बोलत होता.

'दिल चाहता है 'चं चित्रीकरण सुरू होण्याआधी सैफ अली खान या प्रोजेक्टमधून जवळजवळ बाहेर पडणार होता. असं सांगताना फरहानच्या एका वाक्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. सोशल मीडियावरही फरहांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

नेमकं काय म्हणाला फरहान अख्तर?

फरहान अख्तरचा दिग्दर्शक म्हणून पदार्पणाचा चित्रपट 'दिल चाहता है' ला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत.यानिमित्ताने द हॉलीवुड रिपोर्टर इंडियाला दिलेला मुलाखतीत फरहानने अभिनेता सैफ अली खान बद्दल एक किस्सा सांगितला. 'शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधीच सैफ अली खानला चित्रपटातून बाहेर पडायचं होतं.शूटिंग सुरू होण्यापूर्वी तारखांच्या अनेक अडचणी त्याला येत होत्या.' असं फरहान म्हणाला.

तो म्हणाला ' सैफ अली खान जो दुसऱ्या चित्रपटात काम करणार होता,त्याच्या शूटिंग शेड्युल बदललं होतं.त्यामुळे सेफ काहीच अडचणीत आला होता.शेवटी सैफ ने फरहानचा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला.मात्र त्याला थांबवण्यासाठी सगळेच प्रयत्न करत होते.माझ्यासाठी तर सगळंच संपल्यासारखं झालं होतं.जेव्हा आम्ही त्याला भेटलो आणि कामाला सुरुवात केली,तेव्हा जाणवलं की या भूमिकेत दुसरं कोणीच बसू शकत नाही.हे अशक्यच होतं.खरंच मन दुखावणार होतं.शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधीच असं झालेलं.शूटिंगला अजून एक महिना बाकी होता.आज-काल असाच एक पॅटर्न पाहायला मिळतोय' फरहान अख्तरने रणवीर सिंहला टोला लगावल्याचं कळताच मुलाखत घेणारी व्यक्ती ही हसू लागली. तिला प्रतिक्रिया देताना फरहान म्हणाला 'हे फक्त माझ्यासोबतच होत नाही, अशा गोष्टी होत राहतात.'

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
इम्रान खान म्हणाला, मी नोकरीचा शोध घेतोय; मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल, पण देश सोडण्याच्या नोटीसवर दिलासा
इम्रान खान म्हणाला, मी नोकरीचा शोध घेतोय; मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल, पण देश सोडण्याच्या नोटीसवर दिलासा
Prashant Damle on Dia Mirza: 'मला यात खेचू नका'; दिया मिर्झाच्या दिवाळी VIDEOने जाळ अन् धूर, भाजपे नेते भडकले, प्रशांत दामलेंनीही स्पष्ट केली भूमिका
'मला यात खेचू नका'; दिया मिर्झाच्या दिवाळी VIDEOने जाळ अन् धूर, भाजपे नेते भडकले, प्रशांत दामलेंनीही स्पष्ट केली भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
दिवाळीपूर्वी पर्यटकांना गुडन्यूज, रायगडवरील रोप-वे पुन्हा सुरू; देखभालीसाठी दीड महिन्यांपासून होता बंद
दिवाळीपूर्वी पर्यटकांना गुडन्यूज, रायगडवरील रोप-वे पुन्हा सुरू; देखभालीसाठी दीड महिन्यांपासून होता बंद
Sayaji Shinde On Tree Cutting: 'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
Embed widget