Farah Khan : बॉलिवूडची दिग्गज कोरिओग्राफर फराह खानच्या अडचणीत वाढ झालीये. सध्या फराह 'मास्टरशेफ' शो होस्ट करत आहे. शोदरम्यान केलेल्या कमेंटमुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाय लोकांकडून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याचं म्हणत फराहला विरोध करण्यात येत आहे. 'होळी छपरी लोकांचा सण' असल्याचे वक्तव्य फराह खान हिने केले होते. आता या प्रकरणी विकास फाटक उर्फ ​​हिंदुस्थानी भाऊने फराहविरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली असून,  फराहवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आलाय.




हिंदूस्तानी भाऊने दिलेल्या तक्रारीनंतर फराह खानवर गुन्हा दाखल 


फराह खानच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर, बिग बॉस 13 चा स्पर्धक आणि हिंदुस्थानी भाऊ म्हणून प्रसिद्ध असलेल्या विकास फाटकने फराह खानवर मोठी कारवाई करण्याची मागणी केली होती. विकास फाटकने फराह खानविरोधात  पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मुंबईतील खार पोलीस ठाण्यात 21 फेब्रुवारी रोजी विकासने तक्रार दाखल केली होती. वकील अली काशिफ खान देशमुख हे या खटल्याचे कामकाज पाहत आहेत.




सोशल मीडियावरुन फराहच्या वक्तव्याचा निषेध 


रिपोर्टनुसार, हिंदुस्थानी भाऊचे वकील अली काशिफ खान देशमुख म्हणाले, "माझ्या क्लायंटचा असा विश्वास आहे की फराह खानची टिप्पणी केवळ अपमानास्पद नाही तर धार्मिक भावना दुखावणारी आहे. एखाद्या पवित्र सणाचे वर्णन करण्यासाठी 'छपरी' शब्द वापरणे अत्यंत अयोग्य आहे. गेल्या गुरुवारपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये फराह खान म्हणते की, होळी छपरी लोकांचा सण आहे. तिच्या या वक्तव्याचा लोक निषेध करत आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Laxman Utekar apologies : शिर्के घराण्याने दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर लक्ष्मण उतेकरांनी माफी मागितली, काय काय म्हणाले?


Laxman Utekar : '...यापूर्वी आलेल्या टीव्ही मालिकेतही तसंच दाखवण्यात आलं होतं', वादात सापडलेल्या त्या ऐतिहासिक मुद्द्यावर लक्ष्मण उतेकरांचे सर्वात मोठे खुलासे