Sara Ali Khan: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara ali Khan) हिनं आपल्या करियरची सुरुवात केदारनाथ सिनेमापासून करत नंतर सिंबा, 'लव आज कल'सारख्या चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिकांमध्ये दिसली. मर्डर मुबारक, ए वतन मेरे वतनसह ओटीटीवरही साराची झलक प्रेक्षकांना आवडल्याचं दिसलं. प्रेक्षक साराच्या भूमिकांसह ॲक्टींगलाही पसंती देत असताना 'लव आज कल' सिनेमानंतर तिनं इंटिमेट सिनबाबत केलेल्या स्टेटमेंट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.
घरी जाऊन आईला चेहरा कसा दाखवू?
सारा अली खाननं कार्तिक आर्यनसोबत लव आज कल सिनेमात दिलेल्या इंटीमेट सीननंतर एका मुलाखतीत तिला त्यावेळी डोक्यात काय चाललं होतं असं विचारलं. त्यावर सारा म्हणाली, लव आज कलच्या वेळेस किसिंग सीननंतर घरी गेल्यावर आईला चेहरा कसा दाखवू अशा विचारात असल्याचं सारानं सांगितलं. यावेळी आपली आई सगळ्यात कुलेस्ट असल्याचं तिनं सांगितलं.
इंटीमेट सीननंतर आईची प्रतिक्रीया काय होती?
लव आज कल सिनेमातून सारा अली खानने पहिल्यांदा कीसिंग सीन दिले होते. यावेळी घरी गेल्यावर आईला चेहरा कसा दाखवू असे विचार डोक्यात सुरु होते. पण इंटीमेट सीनबद्दल तिने कोणताही गोंधळ घातला नाही. उलट तिचा असा विचार होता की तिच्या मुलीनं या अनुभवांमधून गोष्टी शिकल्या पाहिजेत. सारानं सांगितलं, तिचे आई आणि वडील दोघेही या बाबतीत अतिशय कम्फर्टेबल आहेत. त्यांनी आपल्या मुलीला या बाबतीत मजबूत बनवलंय.
माझी आई कुलेस्ट: सारा अली खान
साराने सांगितले की तिची आई तिला सल्ला देते आणि तिचा दृष्टिकोन असा आहे की तिच्या अभिनेत्री मुलीने अनुभवातून गोष्टी शिकल्या पाहिजेत. अभिनेत्री सारा अली खानने अमृता सिंगला माझी आई कुलेस्ट असल्याचं म्हटलंय. अमृता सिंग तिची आयडॉल आणि हॉलिडे पार्टनरही असल्याचं तिनं सांगितलं आहे. साराने सांगितलं होते की, आईनं तिचा 'अतरंगी' चित्रपट खूप सेलिब्रेट केला होता आणि 'लव्ह आज कल'साठीही ती सकारात्मकच होती.
सारा अली खानकडे आहेत सध्या हे सिनेमे
सारा अली खानचा व्यावसायिक ग्राफ सध्या चढता असून अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांत काम केल्यानंतर सध्या तिच्या हातात उत्कृष्ट चित्रपट आहेत. यामध्ये स्काय फोर्स, मेट्रो दिस डेज या चित्रपटांचा समावेश आहे. स्काय फोर्स सेनेमातून पहिल्यांदाच सारा ॲक्शन करताना दिसणार आहे.
हेही वाचा: