Entertainment News Live Updates 6 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Sidharth Malhotra, Kiara Advani: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी जुही चावला काही वेळापूर्वी जेलमेर विमानतळावर पोहोचली. जुही चावलासोबत तिचे पती जय मेहताही अहमदाबादहून चार्टर्ड विमानाने जैसलमेरला पोहोचले.
Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा पठाण (Pathaan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. पण सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अहाना नावाच्या मुलीचा आहे. ही मुलगी व्हिडीओमध्ये 'पठाण आवडला नाही' असं म्हणत आहे. या व्हिडीओला शाहरुख खाननं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Pathaan Box Office Collection Day 12 : अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. रिलीज आधीच या चित्रपटानं अॅडव्हान्स बुकिंगमधून कोट्यवधींची कमाई केली होती. हा चित्रपट रिलीज होऊन 12 दिवस झाले आहे. या चित्रपटानं रविवारी (5 फेब्रुवारी) देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. जाणून घेऊयात या चित्रपटाचं 12 व्या दिवसाचं कलेक्शन...
Ghoda Marathi Movie : 'घोडा' (Ghoda) या सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. कुटुंबियांच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची गोष्ट 'घोडा' या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून चाहते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहे.
Shiv Thakare On Bigg Boss 16 : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) सध्या चर्चेत आहे. आता या लोकप्रिय कार्यक्रमाचा ग्रॅंड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या या कार्यक्रमात नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. घरातील प्रत्येक स्पर्धक खूप मेहनत घेताना दिसतो आहे. अशातच 'बिग बॉस 16'ची ट्रॉफी जिंकण्याआधीच शिव ठाकरेचं (Shiv Thakare) नशीब उजळलं आहे.
Sharmishtha Raut : मराठमोळी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) सध्या चर्चेत आहे. आजवर शर्मिष्ठा वेगवेगळे नाटक, सिनेमे आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता तिनेनव्या इनिंगला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) सध्या लग्नामुळे चर्चेत आहेत. आता त्यांच्या लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. कियाराच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी लागली असून आज त्यांच्या संगीताचा कार्यक्रम पार पडणार आहे.
Grammy Awards 2023 Winners : 'ग्रॅमी पुरस्कार' (Grammy Awards 2023) हा संगीतक्षेत्रातील मानाचा पुरस्कार मानला जातो. 65 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात लोकप्रिय पॉप गायिका बियॉन्से नॉलेस (Beyonce) आणि भारतीय संगीतकार रिकी केजने (Ricky kej) सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 'ग्रॅमी पुरस्कार 2023'च्या विजेत्यांची संपूर्ण यादी जाणून घ्या...
Grammy Awards 2023 Winners : बियॉन्से ते रिकी केज; 'ग्रॅमी पुरस्कार 2023'च्या विजेत्यांची संपूर्ण यादी जाणून घ्या...
Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) सध्या लग्नामुळे चर्चेत आहेत. आता त्यांच्या लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. कियाराच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी लागली असून आज त्यांच्या संगीताचा कार्यक्रम पार पडणार आहे.
Ricky Kej On Grammy Awards 2023 : भारतीय संगीतकार रिकी केज (Ricky Kej) यांचं ग्रॅमी पुरस्कारासोबत (Grammy Awards) खास नातं आहे. संगीतप्रेमींसाठी मानाचा असणारा ग्रॅमी पुरस्कार सोहळा (Grammy Awards 2023) नुकताच पार पडला असून या पुरस्कार सोहळ्यात भारताच्या रिकी केज यांनी तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कारावर नाव कोरलं आहे.
Grammy Awards 2023 : ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards 2023) हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. लॉस एंजेलिसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडतो आहे. या वर्षीचा पुरस्कार सोहळा खूपच खास आहे. या वर्षी नामांकन जाहीर झालेल्यांमध्ये महिलांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यामुळे 65 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात महिलांचा बोलबाला पाहायला मिळत आहे.
Lata Mangeshkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज (5 फेब्रुवारी) पहिली पुण्यतिथी आहे. जगभरातील चाहते आज लता दीदींना आदरांजली वाहत आहेत. 28 सप्टेंबर 1929 रोजी लता दीदींचा इंदूरमध्ये जन्म झाला. तर 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठांपासून ते तरुणांपर्यंत, प्रत्येक पिढीतील लोक त्यांची गाणी आवडीनं ऐकतात. आज दीदींच्या पुण्यतिथीला पाहूयात त्यांची प्रसिद्ध गाणी...
Lata Mangeshkar First Income Story : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी अखेरचा श्वास घेतला असून आज त्यांची पहिली पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने जगभरातील चाहत्यांसह मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज मंडळी आज त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. लता मंगेशकर यांची लहान बहीण उषा मंगेशकर (Usha Mangeshkar) यांनीदेखील एका मुलाखतीत लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Lata Mangeshkar Death Anniversary : लता मंगेशकर यांनी पहिल्या मानधनाचं काय केलं? उषा मंगेशकरांनी सांगितला 'तो' किस्सा
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Pathaan Box Office Collection : रिलीजच्या दहा दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चाच दबदबा; 400 कोटींचा टप्पा पार
Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने वर्षाच्या सुरुवातीलाच बॉक्स ऑफिसला सुगीचे दिवस दाखवले आहेत. वीकेंड आणि वर्किंग डे कोणत्याही दिवशी बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चाच बोलबाला आहे. रिलीजच्या 11 व्या दिवशीही या सिनेमाची क्रेझ कायम आहे.
Tharla Tar Mag : ठरलं तर मग; मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी सायली अर्जुनसोबत करणार कॉन्ट्रॅक्ट मॅरेज!
Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेत लवकरच सायली आणि अर्जुनचा लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना आता या विवाहसोहळ्याची उत्सुकता लागली आहे.
R. Madhavan: 'थ्री-इडियट्स'साठी आर. माधवननं दिलेल्या ऑडिशनचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'त्याला ऑडिशन देण्याची गरज...'
R. Madhavan: दिग्दर्शक राजकुमार हिराणी (Rajkumar Hirani) यांचा थ्री इडियट्स (3 Idiots) हा चित्रपट रिलीज होऊन 14 वर्ष झाले आहेत. तरी देखील अनेक जण आजही हा चित्रपट आवडीनं बघतात. हा चित्रपट 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्यावेळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात आमिर खान (Aamir Khan), आर. माधवन (R. Madhavan) आणि शर्मन जोशी (Sharman Joshi) यांनी प्रमुख भूमिका साकारली. थ्री इडियट्स या चित्रपटामध्ये आर. माधवननं फरहान कुरेशी ही भूमिका साकारुन अनेकांची मनं जिंकली. या चित्रपटामधील आर. माधवनच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केले. या चित्रपटातील त्याला 'अब्बा नहीं मानेंगे' हा डायलॉग प्रसिद्ध आहे. या डायलॉगचे मीम्स देखील नेटकरी तयार करतात. आता या चित्रपटासाठी आर. माधवननं दिलेल्या ऑडिशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -