Entertainment News Live Updates 4 October : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 04 Oct 2022 05:29 PM
The Kapil Sharma Show: कपिल शर्मा शोमध्ये राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे

The Kapil Sharma Show:  कपिल शर्मा शोमध्ये राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. या शोच्या आगामी एपिसोडमध्ये अनेक कॉमेडियन सहभागी होणार आहेत





Ponniyin Selvan I: 'पोन्नियिन सेल्वन' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच; 250 कोटींचा टप्पा पार

Ponniyin Selvan I:  दिग्दर्शक मणिरत्न यांच्या 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. विक्रम, जयम रवी, कार्थी, तृषा आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) या कलाकारांनी 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.  लाइका प्रोडक्शन आणि मद्रास टॉकीजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...



Vivek Agnihotri Apartment : विवेक अग्निहोत्रीने मुंबईत अख्खी अपार्टमेंटच विकत घेतली

Vivek Agnihotri Apartment : गेल्या काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्रीचा (Vivek Agnihotri) 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमामुळे विवेक चांगलाच चर्चेत आला. आता विवेक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विवेकने मुंबईतील वर्सोव्यात एक अपार्टमेंट विकत घेतलं आहे. या घराची किंमत 17 कोटी 92 लाख असल्याचं म्हटलं जात आहे.  

Brahmastra Box Office Collection: बॉक्स ऑफिसवरही दिसतेय ‘ब्रह्मास्त्र’ची जादू!

‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji) याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. यंदाच्या वर्षात ‘ब्रह्मास्त्र’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. रिलीजच्या 25 दिवसानंतरही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जादू पाहायला मिळत आहे.


 





Tejasswi Prakash : ‘लग्न कधी करणार?’ प्रश्नावर वैतागलेल्या तेजस्वी प्रकाशने दिलं हटके उत्तर! व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundrra) ‘बिग बॉस 15’पासून (Bigg Boss 15) एकमेकांना डेट करत आहेत. चाहत्यांना देखील ही जोडी खूप आवडते आहे. जेव्हाही ही जोडी एकत्र दिसते, तेव्हा सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा असते. दोघांची परफेक्ट जोडी पाहून चाहते त्यांना एकच प्रश्न विचारतायत की, ‘ही जोडी लग्न कधी करणार आहे?’. दोघांवरही सध्या याच प्रश्नांचा भडीमार होत आहे.


 





Kareena Kapoor: कुणी बॅग ओढली, तर कुणी धक्का-बुक्की केली; करीनासोबत सेल्फी काढायला चाहत्यांची गर्दी, व्हिडीओ व्हायरल

Kareena Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध करीना कपूर (Kareena Kapoor Khan) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिच्या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये करीना मुंबई एअरपोर्टवर चाहत्यांसोबत सेल्फी काढताना दिसत आहे. पण या दरम्यान करीनाचे काही चाहते धक्का-बुक्की करताना दिसत आहेत. 



Urmila Matondkar : उर्मिला मातोंडकरचं ओटीटी विश्वात पदार्पण

Urmila Matondkar Tiwari Web Series : उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondkar) मनोरंजनसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. बालकलाकार ते सुपरस्टार असा उर्मिलाचा प्रवास आहे. या प्रवासात तिने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. आता उर्मिला ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. लवकरच तिची 'तिवारी' (Tiwari) ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 





Urvashi Rautela Video: ‘कही पे निगाहे.. कही पे निशाना!’, ऋषभ पंतच्या वाढदिवशीच उर्वशी रौतेलाची खास पोस्ट!

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने काही वेळापूर्वी तिच्या अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कॅमेराकडे पाहत फ्लाईंग किस देताना दिसली आहे. या व्हिडीओसोबत तिने कॅप्शनमध्ये 'हॅपी बर्थडे' असे लिहिले आहे. मात्र, या पोस्टमध्ये तिने कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नसला, तरी नेमका आजच्याच दिवशी अर्थात 4 ऑक्टोबर क्रिकेटपटू ऋषभ पंत याचाही वाढदिवस आहे.


 





OTT This Week : 'कार्तिकेय 2' ते 'मजा मा'; प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी

OTT Release This Week : कोरोनाकाळानंतर प्रेक्षक ओटीटी (OTT) माध्यमाकडे वळू लागले आहेत. ओटीटीवर प्रत्येक आठवड्यात अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. या आठवड्यातदेखील 'कार्तिकेय 2', 'रक्षा बंधन', 'मजा मा'सारखे अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Aapdi Thaapdi: 'बिग बीं'कडून ‘आपडी थापडी’ चित्रपटाला मराठमोळ्या शुभेच्छा, सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट!

मनोरंजन विश्वाचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अर्थात बिग बी यांनी ‘आपडी थापडी’ (Aapdi Thaapdi) या चित्रपटाचा ट्रेलर ट्विटरद्वारे शेअर करत, या चित्रपटाला खास मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटाचे संगीतकार रोहन विनायक आणि संगीत दिग्दर्शकांचा उल्लेख करत अमिताभ बच्चन यांनी थेट मराठीतून शुभेच्छा दिल्या. ‘आपडी थापडी’ हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर अर्थात 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.


 





Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वातलं पहिलं वहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीचं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून सगळीकडे 'बिग बॉस मराठी 4'ची चर्चा सुरू आहे. कालच्या भागात त्रिशूल, मेघा, रोहित आणि प्रसाद हे चार सदस्य निरुपयोगी ठरले होते. पण बिग बॉसने सदस्यांना 'रुम ऑफ फॉर्च्युन' हे खास सरप्राईझ दिले. आजच्या भागात 'आटली बाटली फुटली' हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. 





Boycott Adipurush: ‘हा रावण आहे की, औरंगजेब?’, ‘आदिपुरुष’मधील सैफ अली खानचा लूक पाहून नेटकरी संतापले!

'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर चित्रपटाविरोधात लोकांचा रोष उसळला आहे. ‘आदिपुरुष’चा टीझर पाहून काही लोक चित्रपटाच्या निर्मात्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत आहेत. चित्रपटाचा हा टीझर एखाद्या कार्टून फिल्मसारखा वाटतो, असे काहींचे मत आहे. या चित्रपटात प्रभास आणि अभिनेता सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


 





Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' फेम अब्दु कोट्यवधींचा मालक

Bigg Boss 16 : रिपोर्टनुसार, अब्दु दोन कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. तो त्याच्या युट्यूब चॅनलवर गाणी रिलीज करण्यासोहत रील्सदेखील बनवतो. त्यामुळे त्याच्या कमाईतदेखील भर पडते. आज कोट्यवधींचा मालक असलेल्या अब्दुला रीकेट्स नावाचा आजार झाला होता. त्यामुळे त्याची उंची वाढली नाही.  





PHOTO : नुसरत जहाँचं बॉयफ्रेंड यश दासगुप्तासोबत खास फोटोशूट, जोडीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष!

नुसरतने बॉयफ्रेंड यश दासगुप्तासोबत नवरात्री निमित्ताने केलेले खास फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नुसरत जहाँने गडद जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तर, यश हिरव्या रंगाच्या कुर्त्यामध्ये छान दिसत आहे. दुर्गा अष्टमीच्या निमित्ताने नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता यांचे हे फोटोशूट खूप चर्चेत आले आहे. या फोटोंमध्ये या क्यूट कपलची केमिस्ट्रीही जबरदस्त दिसत आहे.


 





PHOTO : वयाच्या 42व्या वर्षांत पदार्पण करणारी श्वेता तिवारी आजही दिसते तरुण!



 


Murali Mohapatra : ओडिशाचे लोकप्रिय गायक मुरली प्रसाद महापात्रा यांचे निधन

Murali Mohapatra Died : ओडिशाचे (Odia) लोकप्रिय गायक मुरली प्रसाद महापात्रा (Murali Mohapatra) यांचे निधन झाले आहे. दुर्गापूजेच्या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर गाणं गात असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

Suraj Pawar : सैराट फेम सुरज पवारची पोस्ट व्हायरल

Suraj Pawar : सैराट फेम सुरज पवार (Suraj Pawar) गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील फसवणुक प्रकरणामुळे चर्चेत आहे. मंत्रालयात नोकरी मिळवून देतो असं आमीष दाखवून पैशांची लूट केल्या प्रकरणी सुरज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अखेर या प्रकरणावर सुरजने भाष्य केलं आहे. त्याची फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. 


महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी डॉ.अविनाश ढाकणे यांची नियुक्ती

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी डॉ.अविनाश ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाचा गाढा अभ्यास असणारे डॉ. ढाकणे हे यापूर्वी राज्याचे परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत होते.

Black Panther 2 : 'ब्लॅक पॅंथर 2'चा ट्रेलर रिलीज

Black Panther 2 Trailer Released : मार्वल स्टुडिओजच्या (Marvel Studios) सिनेमांची भारतीय सिनेप्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ दिसून येते. सुपरहिरोंच्या सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच मार्वल स्टुडिओजने त्यांच्या आगामी 'ब्लॅक पॅंथर' या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचा (Black Panther 2) ट्रेलर रिलीज झाला आहे.


वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी करिअरची सुरुवात, आजघडीला टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गाणली जाते श्वेता तिवारी!

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी आज (4 ऑक्टोबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. श्वेता आत्तापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकली आहे. एक उत्तम कलाकार असण्यासोबतच, ती एक सशक्त स्त्री देखील आहे, हे तिने अनेकदा सिद्ध केले आहे. व्यावसायिक जीवनातील संघर्षाव्यतिरिक्त, श्वेताने तिच्या वैयक्तिक आयुष्यातही बरेच चढ-उतार पाहिले आहेत.


 





Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठीला राष्ट्रीय आयकॉन बनवण्याचा राष्ट्रीय आयोगाचा निर्णय

Pankaj Tripathi : ओटीटी विश्वात आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आता निवडणूकीच्या रिंगणात आला आहे. पंकज त्रिपाठीला राष्ट्रीय आयकॉन (ECI National Icon) बनवण्याचा निर्णय राष्ट्रीय आयोगाने घेतला आहे. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


‘हर हर महादेव’ चित्रपटातील ‘वाह रे शिवा’ गाणं रिलीज; चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित


झी स्टुडियोजच्या आगामी हर हर महादेव या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत. संगीताच्या बाबतीतही या चित्रपटातून अनेक नवनवे प्रयोग करण्यात आले आहेत. या प्रयोगातील एक महत्त्वाचं आकर्षण ठरणार आहे ते यातील ‘वाह रे शिवा’ हे गाणं. हितेश मोडक यांच्या जबरदस्त संगीताने आणि मंगेश कांगणे यांच्या तेवढ्याच ताकदीच्या शब्दांनी सजलेलं हे गाणं गायलं आहे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अत्यंत लोकप्रिय असलेल्या सिद श्रीरामने. या गाण्याद्वारे त्याने छत्रपती शिवरायांच्या गुणांचं आणि पराक्रमांचं वर्णन केलं आहे. अतिशय वेगळ्या धाटणीच्या आवाजाचा धनी असलेल्या सिद श्रीराममुळे या गाण्याला एक स्पेशल टच मिळाला आहे.


'आदिपुरुष' मध्ये हा मराठमोळा अभिनेता साकारणार हनुमानाची भूमिका


दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या  (Prabhas)   'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाचा टीझर रविवारी (2 ऑक्टोबर) रिलीज झाला. या टीझरनं अनेकांचं लक्ष वेधलं. सध्या  'आदिपुरुष'  या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटात काही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांनी देखील काम केलं आहे. चित्रपटात प्रभासनं राम ही भूमिका साकारली आहे. तर कृती सेनन (Kriti Sanon) ही सिता या भूमिकेतून आणि सैफ रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे. चित्रपटाच्या टीझरमधील एका मराठमोळ्या अभिनेत्यानं आता अनेकांचे लक्ष वेधले आहे. 'आदिपुरुष' या चित्रपटातील रामभक्त हनुमानाची भूमिका देवदत्त नागे (Devdatta Nage) हा मराठमोळा अभिनेता साकारत आहे.


ऐश्वर्या रायच्या ‘पोन्नियिन सेल्वन' ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई


दिग्दर्शक मणिरत्न यांच्या 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं आतापर्यंत 114 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं तमिळनाडुमध्ये जवळपास 22 कोटींचे कलेक्शन केले. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...


'ऑस्कर'ला नमतं घ्यायला लावणाऱ्या अभिनेत्री सचिन लिटिलफेदर यांचे निधन


अभिनेत्री आणि मूळ अमेरिकन नागरी हक्क कार्यकर्त्या सचिन लिटिलफेदर (Sacheen Littlefeather) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, सचिन लिटिलफेदर  या काही दिवसांपासून स्तनाच्या कर्करोगाचा सामना करत होत्या. 50 वर्षांपूर्वी सचिन लिटिलफेदर यांनी ऑस्कर स्विकारण्यास नकार दिला होता. या पन्नास वर्षापूर्वीच्या प्रकरणाबद्दल काही दिवसांपूर्वी अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने म्हणजेच ऑस्करनं सचिन लिटिलफेदर यांची माफी देखील मागितली होती.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.