Entertainment News Live Updates 31 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट (Sonali Phogat) हत्येप्रकरणी हरियाणा पोलिसांनी कॉम्पुटर ऑपरेटर शिवमला ताब्यात घेतले आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. सोनालीच्या कुटुंबीयांनी शिवमवर फार्म हाऊसमधील कार्यालयातून लॅपटॉप, डीव्हीआर, कार्यालयातील मोबाईल फोन, 12 सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर कागदपत्रे चोरून नेल्याचा आरोप केला होता.
न्यू जर्सीच्या एडिसन सिटीमध्ये राहणाऱ्या या कुटुंबाने त्यांच्या घरात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan statue) यांचा मोठ्या आकाराचा पुतळा बसवला आहे. इतकेच नाही तर, मेगास्टार अमिताभ बच्चन त्यांच्यासाठी एखाद्या देवाप्रमाणे असल्याचे या कुटुंबाचे म्हणणे आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
सिद्धू मुसेवाला मृत्यू प्रकरणातील आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैझानमधून अटक
दिवंगत गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणातील आरोपी सचिन बिश्नोईला परदेशातून अटक करण्यात आली आहे. आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैझान या देशातून अटक करण्यात आली. हत्येपूर्वीच आरोपी परदेशात पळून गेल्याचं समोर आलं आहे.
अभिनेता कमाल आर खानला मुंबईत अटक
वादग्रस्त वक्तव्य आणि ट्विट्समुळे चर्चेत असणाऱ्या कमाल आर खान उर्फ केआरकेला अटक करण्यात आली आहे. 2020 साली त्यानं एक ट्वीट केलं होतं. या प्रकरणी मालाड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दोन वर्षांनंतर केआरके हा मुंबईत पोहचला होता. त्यावेळी मुंबई विमानतळावरून पोलीसांनी त्याला अटक केली. त्याला आज बोरिवली कोर्टात हजर करण्यात येईल.
गणेशोत्सवातही साऊथच्या सिनेमांची क्रेझ
गणपती बाप्पाच्या आगमनाची सध्या घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. मखर, सजावट, फुलांचा हार, प्रसाद अशा अनेक गोष्टींची सध्या घरोघरी तयारी सुरू आहे. दोन वर्षांनंतर बाप्पाचं थाटामाटात स्वागत करण्यात येत आहे. त्यामुळे सजावटीचे वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राइज' या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. आजही सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसत आहे. कारण गणेशोत्सवात 'पुष्पा' स्टाइल बाप्पाची मुर्ती बनवण्यात आली आहे.
'राडा' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!
फुल्ल ऑफ अॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' चित्रपटाच्या मोशन पोस्टरने सोशल मीडियावर चांगलीच हवा केलीय. प्रेक्षकांची उत्सुकता फार काळ न ताणता या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
दिलजीत दोसांझच्या 'जोगी' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज
अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझच्या जोगी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे कथानक हे 1984 दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीवर आधारित असणार आहे. दंगली दरम्यान झालेली हिंसा आणि लोकांना होणारा त्रास याचं दृष्य ट्रेलरमध्ये दिसत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -