Harshvardhan Sapkal: भाजपचं सर्वात मोठं हत्यार निष्प्रभ होणार, हर्षवर्धन सपकाळांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करुन काँग्रेस हायकमांडने कसा मास्टरस्ट्रोक मारला?

पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते सतेज पाटील आणि मराठवाड्यातील बडे नेते अमित देशमुख यांच्यासारख्या नेत्यांना बाजूला सारून काँग्रेसने अतिशय स्वच्छ प्रतिमेच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व दिले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
काँग्रेस हायकमांडने स्वच्छ प्रतिमेच्या आणि कोरी पाटी असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांना जाणीवपूर्वक निवडले असावे, असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे.

भाजप सरकार सहकार चळवळीतील नेतृत्वावर ईडी, सीबीआय किंवा आयटीद्वारे दबाव टाकून त्यांना अडचणीत आणू शकते पर्यायाने पक्षाला त्याचा फटका बसतो. ही शक्यता गृहित धरूनच काँग्रेसने पहिल्यांदाच हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारखी ‘कोरी पाटी’ असलेले प्रदेशाध्यक्ष दिल्याची चर्चा आहे.
हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी मानले जातात.
जपने काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांना हँडल करण्यासाठी सातत्याने वापरलेलं हत्यार आता निष्प्रभ होणार आहे. कारण काँग्रेसने आता साध्यासुध्या चेहऱ्याला सिंहासनावर बसवलंय.
काँग्रेस समोर आमदार अमित देशमुख, माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अमित देशमुख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या सारखे अनेक पर्याय होते. मात्र, काँग्रेसने सर्व प्रस्थापित नेते बाजूला करुन हर्षवर्धन सपकाळ यांना संधी दिली आहे.
हर्षवर्धन सपकाळ हे विदर्भातून येतात. मुख्यमंत्री फडणवीस हे देखील विदर्भातूनच येत असल्याने त्यांच्याविरोधात भिडण्यासाठी विदर्भातील नेत्याचा पुढे करून काँग्रेसने डाव खेळला आहे.
विदर्भात जर पुढची पाच वर्षे चांगली मशागत केली तर पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो किंबहुना तिकडून जास्तीचे आमदार विधानसभेत दिसू शकतात, हे डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षाने सपकाळ यांच्याकडे संघटनेचे नेतृत्व दिल्याची चर्चा आहे.
हायकमांडने देखील नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर केला असून नव्या प्रदेशाध्यक्षाची नेमणूक केलीये.
हर्षवर्धन सपकाळ यांची स्वच्छ प्रतिमा आता काँग्रेस पक्षासाठी किती फायदेशीर ठरणार, हे आगामी काळात कळून येईल.