Entertainment News Live Updates 30 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Jun 2022 06:15 PM
Ek Villain Returns Trailer : ‘एक व्हिलन रिटर्न्स’चा ट्रेलर आऊट

Ek Villain Returns Trailer Out Now : बॉलिवूडच्या बहुचर्चित  ‘एक व्हिलन रिटर्न्स’ (Ek Villain Returns) या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. जॉन अब्राहम (John Abraham) आणि अर्जुन कपूरचा (Arjun Kapoor) हा सिनेमा एकतर्फी प्रेमावर भाष्य करणारा आहे. 


अक्षया देवधरनं हार्दिक जोशीसाठी घेतला खास उखाणा

पाहा व्हिडीओ:



Bhool Bhulaiyaa 2 : देशातच नाही तर विदेशातही 'भूल भुलैया 2' ब्लॉकबस्टर सिनेमा; नेटफ्लिक्सवर केला रेकॉर्ड

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) या सिनेमाने सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्सवरील नोन इंग्लिश विभागात या सिनेमाने जगभरातून पहिला क्रमांक पटकावला आहे. हा रेकॉर्ड करणारा हा पहिला हिंदी सिनेमा आहे. 





अवघ्या 10 मिनिटांच्या भूमिकेतही फरहान अख्तरने जिंकलं मार्वल चाहत्यांचं हृदय!

Ms Marvel Episode 4 : मार्वल स्टुडीओची पहिलीवहिली पाकिस्तानी मुस्लिम सुपर हिरो कमाला खान अर्थात ‘मिस मार्वल’ (Ms Marvel) चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. या सीरिजमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार झळकत आहेत. इतकंच नाही तर, बॉलिवूड गाण्यांनी या सीरिजची लज्जत आणखी वाढवली आहे. नुकताच या सीरिजचा चौथा एपिसोड रिलीज झाला आहे. ‘मिस मार्वल’ या सीरिजचा चौथा एपिसोड आणखी खास बनला आहे. हॉलिवूडच्या या सीरिजच्या चौथ्या एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर झळकला आहे.


या सीरिजमध्ये फरहान अख्तरची अवघी 7 ते 10 मिनिटांची भूमिका आहे. मात्र, या भूमिकेतही त्याने जबरदस्त मनोरंजन केले आहे. या सीरिजमध्ये त्याने ‘वलिद’ नावाच्या एका योद्ध्याची भूमिका साकारली आहे. चला तर, जाणून घेऊया या एपिसोडमध्ये नेमकं काय घडतं...


वाचा संपूर्ण बातमी

Swara Bhasker : स्वरा भास्करनं ट्वीट करत मानले उद्धव ठाकरेंचे आभार

पाहा पोस्ट:



दिशा पाटणी अन् जॉन अब्राहमची जमली जोडी! ‘एक व्हिलन रिटर्न्स’चं धमाकेदार पोस्टर पाहिलंत का?

Ek Villan Returns Poster : 'एक व्हिलन रिटर्न्स' (Ek Villain Returns)  हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ‘एक व्हिलन’ हा चित्रपट तब्बल 8 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता आणि आता या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच 'एक व्हिलन रिटर्न्स'चे काही पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत.  या पोस्टरमध्ये दिशा पाटणी (Disha Patani) आणि जॉन अब्राहमचा (John Abraham) जबरदस्त लूक दिसला आहे. त्यांचा लूक पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत. यासोबतच आता चित्रपटाचा ट्रेलर आणि रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.


अभिनेत्री दिशा पाटणीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केले आहेत. यासोबतच तिने एक खास कॅप्शन देखील लिहिले आहे. यात तिने म्हटलेय की, 'नायक आणि नायिकेच्या कथा खूप पाहिल्या, आता खलनायकाची कथा जाणून घेण्याची वेळ आली आहे.' यासोबतच चित्रपटाची रिलीज डेट आणि ट्रेलर रिलीज करण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 30 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. तर, चित्रपट 29 जुलै 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.


वाचा संपूर्ण बातमी

'त्यांना शिव देखील वाचवू शकत नाही....'; कंगनाचा शिवसेनेला टोला

Kangana Ranaut : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी (29 जून) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयावर मत व्यक्त केलं. मराठी चित्रपसृष्टीबरोबरच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्रतिक्रिया दिल्या. आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) एक व्हिडीओ शेअर करुन शिवसेना आणि सध्या सुरु असलेल्या राजकीय क्षेत्रातील घडामोडींवर मत व्यक्त केलं आहे.  


पाहा व्हिडीओ



बुशरासोबत रोमँटिक झाला मिका सिंह, ‘स्वयंवर’चा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत!

Swayamvar Mika Di Vohti: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक मिका सिंहचा (Mika Singh) ‘स्वयंवर: मिका दी वोटी’ (Swayamvar Mika Di Vohti) हा शो टीव्हीवर प्रसारित झाला, तेव्हापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मिका सिंहसोबतच आता त्याच्या चाहत्यांनाही गायकाच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे. आता लवकरच मिकाला त्याची आयुष्यभराची जोडीदार मिळणार आहे. मिकाच्या स्वयंवरात एकूण 12 तरुणी सहभागी झाल्या होत्या, ज्यातील काही आता एलिमिनेशनमध्ये बाहेर पडल्या आहेत. मात्र, नुकताच आता या शोचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यात मिका चक्क रोमँटिक होताना दिसला आहे.


दरम्यान, मिका आणि बुशराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बुशराचे कौतुक करताना थकत नाहीय. मिका बुशराला सांगतो की, ती हॉट आणि स्वीट देखील आहे. मिका म्हणतो की, बुशरा तू खूप सुंदर आहेस. मला तुझ्यात एक लहान मूल दिसत आहे. तू खूप सुंदर आहेस. तुझे डोळे खूप छान आहेत. मात्र, त्याचवेळी दिव्यांका बजर वाजवून वेळ संपल्याचे सांगते.


वाचा संपूर्ण बातमी

Bhool Bhulaiyaa 2 : ओटीटीवर भूल भूलैय्या-2 ला तुफान प्रतिसाद; कार्तिक आर्यन म्हणाला...

Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan)  'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. कार्तिकचा हा चित्रपट  20 मे रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफऑर्मवर प्रदर्शित झाला. नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर भूल भुलैय्या-2 हा चित्रपट रिलीज झाला.  भूल भुलैय्या-2  चित्रपटाच्या नावाचा सामावेश आता नेटफ्लिक्सच्या टॉप चित्रपटांच्या यादीत झाला आहे.  भूल भुलैय्या-2  हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या प्रेक्षकांच्या प्रतिसादावर आता कार्तिक आर्यननं प्रतिक्रिया दिली आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

हॉलिवूड स्टार जोसेफ मॉर्गनकडून आरआरआरचं कौतुक

पाहा जोसेफ मॉर्गनची पोस्ट:





उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केल्यानंतर मराठी कलाकारांच्या पोस्ट चर्चेत

Uddhav Thackeray :  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी (29 जून) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर मराठी चित्रपसृष्टीबरोबरच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्रतिक्रिया दिल्या. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता हेमंत ढोमेनं (Hemant Dhome) देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. तसेच अभिनेता  आस्ताद काळे (Astad Kale), आरोह वेलणकर (Aroh Welankar), केदार शिंदे (Kedar Shinde) या मराठी सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

’10 लाख दे नाही तर...’, गायक मनू पंजाबीला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी केली अटक!

Manu Punjabi : 'बिग बॉस 14' चा स्पर्धक मनू पंजाबी (Manu Punjabi) याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर मनू पंजाबीने जयपूर पोलिसांचे आभार मानले आहेत. रिपोर्टनुसार या व्यक्तीने त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता आणि पैसे न दिल्यास पंजाबी रॅपर सिद्धू मुसेवालासारखे (Sidhu Moose Wala) गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती.


या व्यक्तीला अटक केल्यानंतर मनूने सोशल मीडियावर जयपूर पोलिसांचे आभार मानले आहेत. त्याने ट्विट केले की, ‘मी अत्यंत आभारी आणि कृतज्ञ आहे.... रिचा तोमर... एसपी रामसिंग जी, आनंद श्रीवास्तव जी आणि जयपूर पोलिसांचे आभार ज्यांनी मला सुरक्षा दिली आणि सिद्धू मुसेवालाचा मारेकरी असलेल्या गुन्हेगाराला पकडले. मला #SidhuMooseWala  मारेकऱ्यांच्या टोळीकडून 10 लाखांच्या खंडणीची मागणी करणारा ईमेल आला होता. हे पैसे न दिल्यास ते मलाही मारून टाकतील, असे म्हटले होते. गेल्या आठवडा तणावपूर्ण होता.’


वाचा संपूर्ण बातमी

‘महाराष्ट्रातील लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील..’, अभिनेता प्रकाश राज यांची उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट!

Prakash Raj, Uddhav Thackeray : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. महाराष्ट्रातील राजकारण सध्या ढवळून निघालं आहे. यातच आता राज्यातील मंत्रीमंडळ देखील बरखास्त झालं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. बहुमत सिद्ध करण्याच्या आदल्याच दिवशी संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त झाले आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना पाठींबा दिला आहे. सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी देखील ट्विटरवर एक पोस्ट लिहित उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे.


बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज हे नेहमी आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत एक पोस्ट लिहिली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे.


वाचा संपूर्ण बातमी

साऊथ सुपरस्टार महेश बाबूने घेतली बिल गेट्सची भेट! फोटो शेअर करत म्हणाला...

Mahesh Babu, Bill Gates : साऊथ सुपरस्टार, अभिनेता-निर्माता महेश बाबू (Mahehs Babu) आणि त्याची पत्नी-अभिनेत्री नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) सध्या न्यूयॉर्क शहरात सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. अभिनेता महेश बाबू आपल्या संपूर्ण कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेत आहेत. दरम्यान, अभिनेता या धमाल ट्रीपचे फोटो तो चाहत्यांसोबत शेअर करत आहे. नुकताच त्याने एक असा खास फोटो शेअर केला आहे, जो पाहून त्याचे चाहतेही थक्क झाले आहेत. न्यूयॉर्कच्या व्हेकेशनदरम्यान अभिनेता महेश बाबू आणि नम्रता यांनी अमेरिकन व्यावसायिक-मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान काढलेला एक फोटो महेश बाबू याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत महेश बाबूने बिल गेट्स यांचे वर्णन ‘प्रेरणा’ म्हणून केले आहे.


वाचा संपूर्ण बातमी

‘बालिका वधू’ बनून घराघरांत मिळवली ओळख, आता बोल्ड अदांमुळे असते चर्चेत! वाचा अभिनेत्री अविका गौरबद्दल....

Avika Gor Birthday : 'बालिका वधू' या लोकप्रिय मालिकेत चिमुकल्या आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) आज (30 जून) तिचा 25वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या 11 व्या वर्षी अविकाला 'बालिका वधू' मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. या भूमिकेमुळे ती घराघरांत गाजली. आजही लोक तिला ‘आनंदी’ म्हणूनच ओळखतात. मालिकेतील त्याचा जबरदस्त अभिनय पाहून चाहत्यांना तिच्याबद्दल कौतुक वाटू लागले. लोक अविकाला आनंदी नावानेच ओळखायला लागले.


‘बालिका वधू’शिवाय ती ‘ससुराल सिमर का’ या मालिकेमध्येही दिसली होती. या मालिकेमधील तिच्या पात्राला दीपिका कक्करपेक्षा जास्त प्रशंसा मिळाली. अभिनय विश्वात सक्रिय असणारी अविका समाजातील लोकांना मदत करण्यासाठीही नेहमी उधे दर्दावते. चला तर मग जाणून घेऊया तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी...


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'जुग जुग जियो'च्या निर्मात्यांना बसला आर्थिक फटका; कमाईच्या बाबतीत पडला मागे


Jug Jugg Jeeyo Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि कियारा अडवाणीचा (Kiara Advani) 'जुग जुग जियो' (Jug Jugg Jeeyo) हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात रिलीज झाला आहे. विकेंडला या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पण आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला आहे. त्यामुळे निर्मात्यांना आर्थिक फटका बसला आहे. 'जुग जुग जियो' या सिनेमाने ओपनिंग डेला 9.28 कोटींची कमाई केली आहे. तर शनिवार आणि रविवारी विकेंडला या सिनेमाने चांगलीच कमाई केली. शनिवारी 12.55 कोटी तर रविवारी या सिनेमाने 15.10 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर सोमवारी या सिनेमाने फक्त 4.82 कोटी आणि मंगळवारी 4.52 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त 46.27 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे निर्मात्यांना रिलीजच्या पाचव्या दिवशी चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.


Sharad Ponkshe : शरद पोंक्षेंची नवी पोस्ट; म्हणाले, 'हिंदूंनो जागे व्हा'


Sharad Ponkshe : अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे  चित्रपट,  मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. शरद पोंक्षे सोशल मीडियावर सक्रिय असतात. वेगवेगळ्या घडामोडींवरील तसेच विषयांवरील त्यांची मतं ते सोशल मीडियावर मांडतात. राजस्थानमधील उदयपूर(Udaipur) शहरात दिवसाढवळ्या दोन लोकांनी कन्हैया लाल या युवकाचा गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली. उदयपूरमधील हत्या प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली आहे. या घटनेबाबत आता शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी विनायक दामोदर सावरकर यांचे विचार नेटकऱ्यांना सांगितले आहेत.


आसामवासीयांच्या मदतीला धावून आलं बॉलिवूड


Assam Floods : ईशान्य भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण पूराशी सध्या आसामवासीय संघर्ष करत आहेत. या भीषण पुरामुळे आसाम गेल्या काही आठवड्यांपासून चर्चेत आहे. सोशल मीडियावरही आसाममधील या भीषण परिस्थीतीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या पुरामुळे तब्बल 21 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. तर, मृतांची संख्या 134च्या वर गेली आहे आणि लाखो लोक अजूनही संकटात आहेत. आसामला मदतीची नितांत गरज आहे. समाजातील प्रत्येकजण आसाममधील मदतकार्यासाठी आणि तेथील लोकांना आर्थिक सहकार्य देण्यासाठी पुढे येत आहे. यात आता बॉलिवूडनेही हातभार लावला आहे. आमिर खान (Aamir Khan) , अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अनेक कलाकारांनीही यासाठी देणगी दिली आहे.


फुफ्फुसाच्या आजाराशी झुंज अयशस्वी, साऊथ अभिनेत्री मीनाचे पती विद्यासागर यांचे निधन


Meena Husband Vidyasagar : साऊथ अभिनेत्री मीनाचे (Meena) पती विद्यासागर (Vidyasagar) यांचे सोमवारी चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. विद्यासागर यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते मागील काही वर्षांपासून फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. यावर्षी जानेवारी महिन्यात संपूर्ण कुटुंबाला कोरोना झाला होता. मात्र, कुटुंबासोबत विद्यासागर यांनीही कोरोनावर मात केली होती. परंतु, त्यानंतरही त्यांची प्रकृती बिघडली होती. मीडिया रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी काही आठवड्यांपूर्वी विद्यासागर यांच्या फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, ब्रेन डेड रुग्णांकडूनच हे शक्य असल्याने डोनर मिळण्यात अडचणी येत होत्या. तोपर्यंत डॉक्टरांनी औषधोपचार करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची ही झुंज अयशस्वी ठरली आहे. अभिनेता सरथकुमारने ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली आणि मीना आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.


Oscars Committee : काजोलला ऑस्कर कमिटीच्या सदस्यपदासाठी निमंत्रण; सूर्याच्या नावाचादेखील समावेश


Oscars Committe : 'ऑस्कर पुरस्कार' (Oscars Awards) हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा पुरस्कार आहे. आता दाक्षिणात्य अभिनेता सूर्या (Suriya) आणि बॉलिवूड अभिनेत्री काजोलला (Kajol) ऑस्कर कमिटीच्या सदस्यपदासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. जगभरातील 397 सेलिब्रिटींना ऑस्टर कमिटीच्या सदस्यपदासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. सूर्याच्या नावाची लोकप्रियता दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येदेखील आहे. सूर्याचा 'जय भीम' सिनेमा चांगलाच गाजला होता. हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला असला तरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. चाहत्यांनी सूर्याचे प्रचंड कौतुक केले होते. ऑस्करच्या शर्यतीतदेखील हा सिनेमा सामील झाला होता. आता ऑस्कर कमिटीच्या सदस्यपदांच्या नावांच्या यादीत सूर्याच्या नावाचादेखील समावेश आहे. ऑस्टर कमिटीच्या सदस्यपदासाठी निमंत्रण मिळणारा सूर्या हा पहिला दाक्षिणात्य अभिनेता आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.