Entertainment News Live Updates 3 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 03 Jan 2023 07:07 PM
Pathaan : शाहरुख खान 'पठाण'ची रिलीज डेट बदलणार?

KRK On Pathaan Release Date : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'पठाण' (Pathaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. रिलीजआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता किंग खान या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

Tunisha Sharma : तुनिषाच्या निधनानंतर 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' मालिकेचा सेट बदलला

Ali Baba Dastaan E Kabul : तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' (Ali Baba Dastaan E Kabul) या मालिकेचं शूटिंग थांबलं होतं. तुनिषाने या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केल्याने सेटवर भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं. पण शूटिंग थांबल्याने निर्मात्यांना मात्र मोठा फटका बसला होता. पण आता शो मस्ट गो ऑन म्हणत या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. 

Sumitra Sen : सुमित्रा सेन यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Sumitra Sen Passes Away : ज्येष्ठ गायिका सुमित्रा सेन (Sumitra Sen) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांची मुलगी श्रावणी बेन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. 

Shiv Thakare : 'बिग बॉस' फेम शिव ठाकरेची सोशल मीडियावर हवा

Shiv Thakare : शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या सलमान खानचा (Salman Khan) 'बिग बॉस' अर्थात 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) गाजवत आहे. अशातच शिवने आता नवा रेकॉर्ड केला आहे. इन्स्टाग्रामवर शिवने 1 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. 





Ved Box Office Collection: रितेश-जिनिलियाच्या 'वेड' ला प्रेक्षकांची पसंती; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

Ved Day 4th Box Office Collection: मराठी चित्रपटससृष्टी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची जोडी  रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. त्यांचा वेड (Ved) हा चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत. या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबतच अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि  जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं रणवीर सिंहच्या सर्कस या चित्रपटाला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.



PIFF : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावाची तारीख ठरली

Pune International Film Festival : 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (Pune International Film Festival) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही कारणाने या महोत्सवाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण आता हा महोत्सव 2 ते 9 फेब्रुवारीदरम्यान पार पडणार आहे. 

Dnyanada Ramtirthkar: नाकात नथ अन् पैठणीचा ड्रेस; ज्ञानदाचा हटके लूक, पाहा फोटो

Dnyanada Ramtirthkar: अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली.ज्ञानदानं ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमधील अप्पू ही भूमिका साकारली.नुकतेच ज्ञानदानं तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 





Phulrani : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 'फुलराणी' फुलणार

Subodh Bhave On Phulrani : अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत सुबोध भावेने या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 





Sajal Ali: 'पाकिस्तानी अभिनेत्रींचा 'हनी ट्रॅप' म्हणून वापर', निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याचा दावा; अभिनेत्री सजल अलीची प्रतिक्रिया

Sajal Ali: पाकिस्तानी अभिनेत्री सजल अली (Sajal Ali) ही सध्या तिच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहे. निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी मेजर आदिल राजा (Adil Raja) यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले. त्यांनी असा दावा केला होता की,  पाकिस्तानी अभिनेत्रींचा 'हनी ट्रॅप' म्हणून वापर करतात. आदिल राजा यांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री सजल अलीनं (Sajal Aly)  प्रतिक्रिया दिली आहे. 



Bigg Boss 16 : टीना दत्ता आणि शालीन भनोटची वाढती जवळीक; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) हा वादग्रस्त कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या कार्यक्रमातील टीना दत्ता (Tina Datta) आणि शालीन भनोट (Shalin Bhanot) यांच्या नात्यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये शालीन आणि टीनाची जवळीक वाढलेली दिसली. त्यांची वाढती जवळीक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.





Chitra Wagh: नाव न घेता चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल; म्हणाल्या, 'समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो...'

Chitra Wagh: भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh)आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed)  सोशल मीडियावर वॉर सुरु आहे. चित्रा वाघ यांनी एक ट्वीट शेअर करुन उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्या ट्वीटला उर्फीनं प्रत्युत्तर दिलं होतं. या वादादरम्यान आता  ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी एक पोस्ट शेअर केली. सुषमा अंधारे यांनी कंगना रनौत, अमृता फडणवीस आणि केतकी चितळे यांचे काही फोटो शेअर केले. या फोटोला सुषमा अंधारे यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधलं. आता सुषमा अंधारे यांच्या पोस्टवर चित्रा वाघ यांनी नाव न घेता खोचक टीका केली आहे. 


चित्रा वाघ यांचे ट्वीट



Riteish Deshmukh Genelia Deshmukh : रितेश-जिनिलियाच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला 20 वर्ष पूर्ण

Riteish Deshmukh Genelia Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) 'वेड' (Ved) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. दोघेही आज आघाडीचे कलाकार आहेत. दोघांनी 'तुझे मेरी कसम' (Tujhe Meri Kasam) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. आज त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला 20 वर्ष पूर्ण झाले आहेत. 

Akshaya Deodhar: लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर अक्षयानं शेअर केला व्हिडीओ; म्हणाली, 'मी तयार नव्हते'

Akshaya Deodhar:  'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat Jeev Rangala) मालिकेतील राणादा आणि पाठकबाई यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मालिकेत राणादा ही भूमिका साकारणारा हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि  राणादा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांनी 2 डिसेंबर 2022 रोजी लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नाला आता एक महिना झाला आहे. यानिमित्तानं अक्षयानं एक खास व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये अक्षयानं तिच्या लग्नाच्या निर्ययाबाबत सांगितलं.



Tunisha Sharma Case : तुनिषा शर्मा आणि शिझान खानचा ब्रेकअप कसा झाला?

Tunisha Sharma Suicide Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असून दररोज नवीन अपडेट समोर येत आहेत. नुकतचं शिझानच्या (Sheezan Khan) कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यादरम्यान शिझानच्या बहिणींनी खुलास केला आहे की, तुनिषा आणि शिझानचा ब्रेकअप झाला नव्हता. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. 





Urfi Javed: 'चित्रा वाघ, तुमच्या पक्षातील....'; दिल्लीमधील घटनेतील पीडितेच्या आईचा व्हिडीओ उर्फीनं केला शेअर

Urfi Javed: गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) या अभिनेत्री   उर्फी जावेदच्या (Urfi Javed) फॅशन स्टाईलवर टीका करत आहेत. 'हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही.' असं म्हणतं चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर निशाणा साधला होता. 'उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा' अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती. आता इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.


 

Rishabh Pant: उर्वशीच्या आईनं शेअर केला ऋषभ पंतचा फोटो; नेटकऱ्यांना केलं प्रार्थना करण्याचं आवाहन; नेटकरी म्हणाले, 'जावई बापू...'

Rishabh Pant: क्रिकेटपटू ऋषभ पंतचा काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला.अपघातानंतर ऋषभ पंतची आता प्रकृती स्थिर (Rishabh Pant Health Update) आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.अभिनेता अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी नुकतीच ऋषभ पंतची रुग्णालयात भेट घेतली. ऋषभचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ऋषभच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. आता अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या (Urvashi Rautela) आईनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.  'सर्वांनी प्रार्थना करा.' , असं आवाहन या पोस्टच्या माध्यमातून उर्वशीची आई मिरा रौतेला यांनी नेटकऱ्यांना केलं आहे. 



Sushma Andhare: उर्फी जावेद-चित्रा वाघ वादात आता सुषमा अंधारेंची उडी; अमृता फडणवीस, केतकी चितळे अन् कंगनाचे फोटो शेअर करुन म्हणाल्या...

Sushma Andhare: गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh)आणि अभिनेत्री   उर्फी जावेद  (Urfi Javed) यांचा सोशल मीडियावर वॉर सुरु आहे. चित्रा वाघ यांनी एक ट्वीट शेअर करुन उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्या ट्वीटला उर्फीनं प्रत्युत्तर दिलं होतं. आता ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. 'नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो.' असं या पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांनी लिहिलं. 


पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Savitribai Phule : समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री सावित्रीबाई फुले (Savitribai Phule)यांची आज जयंती आहे. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. स्त्री शिक्षणाबाबत त्यांनी समाजात जागृती केली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर भाष्य करणाऱ्या अनेक कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. अनेक अभिनेत्रींनी सावित्रीबाई फुले यांची भूमिका लिलया पार पाडली आहे. 


Urfi Javed: 'जेव्हा ती सापडेल, त्या दिवशी तिचं थोबाड रंगवेन'; उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ आक्रमक


Chitra Wagh: भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदवर (Urfi Javed)  पुन्हा निशाणा साधला आहे. 'हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही.' असं म्हणतं चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फी जावेदवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, 'व्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांना लाज वाटत नाही? व्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार माजवला आहे. चार भिंतींच्या आत तुम्ही उघडे-नागडे नाचा, आम्हाला त्याचं काही वाटणार नाही पण ज्यावेळी सार्वजनिक ठिकणी अशा पद्धतीनं कोणी वागले तर तुम्हाला त्याचा प्रसाद मिळेल. मी पुन्हा एकदा सांगितले, पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मी केली आहे. ज्या दिवशी मला ती सापडेल. तेव्हा पहिल्यांदा तिचं थोबाड रंगवेन आणि नंतर मी तुम्हाला ट्वीट करुन सांगेल की, मी काय केलं. हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही.' 


Rinku Rajguru: आर्चीनं शेअर केला 'बेशरम रंग' गाण्यावरील व्हिडीओ; नेटकरी कमेंट करत म्हणाले, 'एवढा पैसा आलाय तर...'


Rinku Rajguru: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) ही सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असते. रिंकू ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच एक खास व्हिडीओ रिंकूनं शेअर केला आहे. या व्हिडीओमधील रिंकूच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकऱ्यांनी रिंकूनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन तिला ट्रोल केलं आहे.


Ved : बॉक्स ऑफिसवर रितेश अन् जिनिलियाचा बोलबाला; 'वेड'ने तीन दिवसात जमवला 10 कोटींचा गल्ला


Ved Movie : बॉलिवूड अभिनेता  रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) 'वेड' (Ved) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धमाका केला आहे. वीकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत 'वेड' सिनेमाचा समावेश झाला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.