Entertainment News Live Updates 29 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 29 Dec 2022 06:05 PM
Vaishnavi Kalyankar: वैष्णवी कल्याणकर करणार मोठ्या पडद्यावर पदार्पण; ‘बांबू’ चित्रपटामध्ये साकारणार ही भूमिका

Vaishnavi Kalyankar: विविध मालिकांमधून अवघ्या महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे वैष्णवी कल्याणकर (Vaishnavi Kalyankar).  अल्पावधितच वैष्णवीने प्रेक्षकांना आपलेसे केले. आता वैष्णवी चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली असून विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बांबू’ या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नुकतीच तिची चित्रपटातील झलक सोशल मीडियावर झळकली आहे. सरळ, साधी, सालस असणारी ही 'झुळूक' तरुणांना भावणारी आहे. 



Dipika Chikhlia: रामायण फेम अभिनेत्री दीपिका चिखलिया यांना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले...

Dipika Chikhlia: रामायण या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेमध्ये सीता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया  (Dipika Chikhlia) या सोशल मीडियावर सक्रिय असतात. दीपिका यांनी नुकताच एक खास व्हिजीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये दीपिका या 'ओ मेरे शोना रे'  या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दीपिका यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.


 पाहा व्हिडीओ: 





Tunisha Sharma: रामदास आठवले यांनी तुनिषा शर्माच्या कुटुंबियांची भेट घेतली

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत अभिनेत्री तुनिषा शर्माच्या कुटुंबियांची भेट घेतली. 





Nitin Manmohan: चित्रपट निर्माते नितीन मनमोहन यांचे निधन; वयाच्या 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Nitin Manmohan: प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन मनमोहन यांचे निधन झाले आहे. नितीन मनमोहन त्यांनी अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली होती.  वयाच्या 60 व्या वर्षी नितीन मनमोहन यांनी अखेरचा श्वास घेतला. नितीन यांना  3 डिसेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 





Tunisha Sharma: 'ती आत्महत्या करुच शकत नाही'; तुनिषा शर्माच्या मामानं व्यक्त केल्या भावना

Tunisha Sharma: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) निधनानं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला. तुनिषा  'अलिबाबा दास्तान ए काबुल' या मालिकेत मुख्य भूमिकेत होती.  24 डिसेंबरला मालिकेच्या सेटवर मेकअप रुममध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप अभिनेता शिझान खानवर (Zeeshan Khan) लावण्यात आला होता. सध्या शिझान हा पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणी तुनिषाच्या कुटुंबियांचा जबाब पोलीस नोंदवत आहेत. पोलिसांनी तुनिषा शर्माच्या मामाचा जबाब नोंदवला आहे. तुनिषाचा मामा पवन शर्मानं नुकतीत एबीपी न्यूजला मुलाखत दिली. 'तुनिषा आत्महत्या करुच शकत नाही', असं या मुलाखतीमध्ये त्यांनं सांगितलं.


Riya Kumari: पती आणि मुलीसमोर अभिनेत्री रिया कुमारीची हत्या; लूटमार करणाऱ्यांनी झाडली गोळी

Jharkhand Actress Riya Kumari: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरलीय आता आणखी एका अभिनेत्रीच्या मृत्यूनं अनेकांना धक्का बसला आहे. झारखंडमधील (Jharkhand) प्रसिद्ध अभिनेत्री रिया कुमारीची (Riya Kumari) गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. रिया कुमारी ही तिचा पती आणि मुलीसोबत प्रवास करत होती, तेव्हा ही घडली घटना. काही लोकांनी रियाची (Jharkhand Actress Riya Kumari) कार थांबवत त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रियावर लूटमार करणाऱ्यांनी गोळी झाडली, त्यात तिचा मृत्यू झाला. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sheezan Khan: शिझान खानच्या अडचणीत वाढ; 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी


Sheezan Khan: अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिझान खान (Sheezan Khan) हा पोलीस कोठडीत आहे. आरोपी शिजान खान याला वाळीव पोलिसांनी वसई न्यायालयात हजर केले होते. शिझान खानच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 30 तारखेपर्यंत शिझान खानला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  


25 डिसेंबर रोजी शिझानला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आता  शिझान खानच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 30 डिसेंबरपर्यंत शिझानला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


Ameya Khopkar: अमेय खोपकर यांचा पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शनाला विरोध; ट्वीट शेअर करत थिएटर मालकांना केलं आवाहन


Ameya Khopkar: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी नुकतेच पाकिस्तानी चित्रपटांबाबत एक ट्वीट शेअर केले आहे. या ट्वीटच्या माध्यातून अमेय यांनी थिएटरमालकांना आवाहन देखील केलं आहे. 


अमेय खोपकर  यांचे ट्वीट
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेननेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पाकिस्तानीच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शनाला विरोध आहे म्हणजे आहे. यापूर्वी जो चित्रपट 23 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता, तो पाकिस्तानी चित्रपट आता 30 डिसेंबरला येतोय. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही.'


Sheezan Khan : पोलिसांसमोरच शिझानला कोसळलं रडू, गर्लफ्रेंड तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी सलग तीन दिवसांपासून कसून चौकशी


Sheezan Khan : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खान (Sheezan Khan) सध्या चर्चेत आहे. आता पोलीस चौकशी दरम्यान शिझानला रडू कोसळलं आहे. चौकशीदरम्यान महिला पोलीस अधिकाऱ्यांसमोर शिझान रडू लागला. अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझानची सध्या चौकशी सुरू आहे. तुनिषाला आत्महत्या करण्यासाठी शिझाननेच प्रवृत्त केल्याचा आरोप तुनिषाच्या आईने केला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान त्याला रडू कोसळलं आहे. 


'वादळवाट' फेम ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड


Raja Bapat Passed Away : ज्येष्ठ अभिनेते राजा बापट (Raja Bapat) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक अनेक सिनेमे, मालिका आणि नाटकांत आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.