Entertainment News Live Updates 28 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 28 Sep 2022 10:59 PM
Lata Mangeshkar : 'भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्याल'याचं मुख्यमंत्राच्या हस्ते उद्घाटन

Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज 'आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे' (Bharat Ratna Lata Dinanath Mangeshkar International Music College) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन झाले. त्यावेळी लता दीदींच्या आठवणींना उजाळा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)म्हणाले,"दीदी आपल्या सोबत नसल्या तरी आपल्या सोबत कायम आहेत".

Har Har Mahadev : 'हर हर महादेव' शिवगर्जना घुमणार रुपेरी पडद्यावर

Har Har Mahadev : मराठमोळा अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) एक अभ्यासू अभिनेता असून नेहमीच तो त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडत असतो. आज सुबोध पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुबोधचा 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आऊट झाले आहे.



Vivek Agnihotri : बॉलिवूडच्या घराणेशाहीवर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने साधला निशाणा

विवेक अग्निहोत्री म्हणाला,"2000 साली बॉलिवूड आतापेक्षा वेगळं होतं. बॉलिवूडमध्ये घराणेशाही नव्हती. त्यावेळी धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, श्रीदेवी आणि माधुरी दीक्षितसारखे कलाकार त्यांच्या अभिनयामुळे ओळखले जायचे. कलाकार ते सुपरस्टार्स असा या मंडळींचा प्रवास आहे". 

Drishyam 2 First Look : अजय देवगनच्या 'दृश्मम 2'चा फर्स्ट लुक आऊट

Ajay Devgan Film Drishyam 2 First Look : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या (Ajay Devgan) आगामी 'दृश्मम 2' (Drishyam 2) या सिनेमाचा फर्स्ट लुक आऊट झाला आहे. 'दृश्मम' हा सिनेमा 2015 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात अजय देवगन (Ajay Devgan), तब्बू (Tabu), श्रिया सरन (Shriya Saran) महत्त्वाच्या भूमिकेत होते. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे प्रेक्षक 'दृश्मम 2'ची प्रतीक्षा करत होते. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 





Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत येत असणाऱ्या नव्या ट्विस्टमुळे मालिका आता लोकप्रियतेच्या शिखरावर आली आहे. मालिकेत नेहा प्रेग्नंट असल्याची घरच्यांना चाहुल लागली आहे. त्यामुळे आता नेहा खरंच आई होणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

Alia Bhatt : 'टाईम 100 इम्पॅक्ट पुरस्कारा'साठी आलियाची निवड

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आलियासाठी 2022 हे वर्ष वैयक्तिक कारणांसह व्यावसायिकरित्यादेखील खास आहे. आलिया-रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत असून आज रणबीरच्या वाढदिवशी आलियाने पुन्हा एकदा चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 'टाईम 100 इम्पॅक्ट पुरस्कारा'साठी (Time 100 Impact Award) आलियाची निवड झाली आहे. 





Code Name Tiranga Trailer : परिणीती चोप्राच्या 'कोड नेम तिरंगा' सिनेमात पाहायला मिळणार अॅक्शनचा तडका

Code Name Tiranga Trailer : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) सध्या चर्चेत आहे. तिच्या आगामी 'कोड नेम तिरंगा' (Code Name Tiranga) सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमुळे चाहत्यांना आता सिनेमाची उत्सुकता लागली आहे. 





Lata Mangeshkar: 'सम्राज्ञी'; लतादीदींचा जीवनपट उलगडणाऱ्या डॉक्युमेंटरीची घोषणा

Lata Mangeshkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज जयंती आहे. जगभरातील चाहते आज लता दिदींना आदरांजली वाहत आहेत. 28 सप्टेंबर 1929 रोजी लता दीदींचा इंदूरमध्ये जन्म झाला. लता दीदींच्या चाहत्यांना त्यांचा जीवन प्रवास आता एका माहितीपटाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. सम्राज्ञी या माहितीपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध  संगीतकार मयुरेश पै  हे करणार आहेत. 



Sunny Kaushal: कतरिना कैफनं सनी कौशलला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Sunny Kaushal: अभिनेत्री कतरिना कैफनं नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिनं विकी कौशलचा भाऊ सनी कौशलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 





Indira Devi: साऊथ सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दुःखाचा डोंगर; आई इंदिरा देवी यांचे निधन

Indira Devi: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूची (Mahesh Babu) आई इंदिरा देवी (Indira Devi) यांचे  हैदराबाद येथे निधन झाले आहे. इंदिरा देवी यांनी बुधवारी (28 सप्टेंबर) पहाटे चार वाजता अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून इंदिरा देवी यांची प्रकृती बिघडली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इंदिरा देवी या सुपरस्टार कृष्णा (Superstar Krishna) यांच्या पत्नी होत्या. महेश बाबूच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन इंदिरा देवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 



Kim Kardashian: हे काय गं बाई? हॉट दिसण्याच्या नादात केलं भलतंच काही; अभिनेत्रीची फॅशन पाहून नेटकरी चक्रावले,टाइट ड्रेसमुळे उड्या मारत चढाव्या लागल्या पायऱ्या

सेलिब्रिटी त्यांच्या हटके फॅशन सेन्समुळे चर्चेत असतात. काही कलाकारांच्या फॅशन सेन्सची चर्चा सोशल मीडियावर होत असते. सेलिब्रिटी वेगवेगळ्या फॅशनला कधी प्रेक्षकांची पसंती मिळते, तर कधी लोक त्यांच्या फॅशन सेन्सची थट्टा करतात. नुकताच हॉलिवूड अभिनेत्री  किम कार्दशियनचा (Kim Kardashian) एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमधील किमच्या फॅशननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'बिग बॉस' (Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. येत्या 1 ऑक्टोबरला भाईजानचा 'बिग बॉस' सुरू होणार आहे. 'बिग बॉस' हा कार्यक्रम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. अशातच या पर्वातील पहिल्या स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे. युट्यूबर अब्दु राजिक (Abdu Razik) या पर्वात सहभागी होणार आहे. 


Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या चर्चेत आहे. दीपिका पदुकोणला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती खालावल्याने तिला मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या दीपिकाची प्रकृती सुधारली असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 


Adipurush: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रभासचा (Prabhas)  'आदिपुरुष'(Adipurush) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.  या आगामी चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर हे 2 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे रिलीज करण्यात येणार आहे. शरयू नदीच्या काठावर एक भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आलं आहे. या समारंभात आदिपुरुष या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे. आदिपुरुष चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊतनं (Om Raut) केलं आहे. ओम राऊतनं ट्विटरवर ट्वीट शेअर करुन आदिपुरुषच्या टीझर लाँचच्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. 


Dada Saheb Phalke Award: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांना यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी माहिती दिली आहे. 30 सप्टेंबरला आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. आशा पारेख यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.