Entertainment News Live Updates 26May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 May 2022 11:25 PM
गिरगावात उभारले जाणार 'मराठी नाट्य विश्व' नाट्यगृह

गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी पुनर्विकास करून 'मराठी नाट्य विश्व' (Marathi Natya Vishwa) ही नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालय इमारत उभारली जाणार आहे. त्याच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा येथे आज करण्यात आले.

कंगणी बाबाचा स्टाईल फंडा होतोय व्हायरल

'देवमाणूस'  (Devmanus) या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. या मालिकेतील देवमाणूस म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड पहिल्या पर्वात डॉक्टर अजितकुमार तर दुसऱ्या पर्वात कंगणी बाबा - नटवर सिंहच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आला. किरण गायकवाड ही भूमिका अगदी चोख बजावतो आहे. 

'इर्सल' चा ट्रेलर प्रदर्शित

निवडणुका आणि राजकारणातल्या साजूक मुखवट्या मागचं भयाण वास्तव दाखवणाऱ्या 'इर्सल' (Irsal) या मराठी सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर मोठ्या, उत्साहात लॉंच करण्यात आला आहे. 'इर्सल' या सिनेमाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे आणि विश्वास सुतार यांनी केले आहे. ट्रेलर लॉंच झाल्यामुळे हा सिनेमा राजकारणातील कावेबाज माणसांच्या इर्षेची धूळवड दाखवणार असल्याचे दिसून येते. 

'पृथ्वीराज' सिनेमाचे नाव होणार 'सम्राट पृथ्वीराज'

 खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुचर्चित 'पृथ्वीराज' (Prithviraj) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा येत्या 3 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला. करणी सेनेने या सिनेमाचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. त्यानुसार यशराज फिल्म्सने करणी सेनेची मागणी मान्य केली आहे. 'पृथ्वीराज' सिनेमाचे नाव 'सम्राट पृथ्वीराज' असे ठेवण्यात येणार आहे. 

नेहा आणि यशचा लवकरच होणार साखरपुडा

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत लवकरच यश-नेहाचा साखरपुडा पार पडणार आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत यश, परी आणि नेहा तिघेही दिसून येत आहेत. साखरपुड्यादरम्यान नेहा आणि यशने पारंपारिक लूक केलेला दिसून येत आहे. 

ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसह सहा जणांना क्लिनचीट; 14 आरोपींविरोधात चार्जशीट दाखल

Cruise Ship Drugs Case :  आर्यन खानला (Aryan Khan) अटक करण्यात आलेल्या कॉर्डिलिया क्रझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीचं आरोपपत्र कोर्टात दाखल करण्यात आलं. या प्रकरणामधील 14 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आर्यन खानसह सहा जणांना या प्रकरणात क्लिनचीट मिळाली आहे. सबळ पुराव्यांअभावी सहा जणांविरोधात कोणतेही आरोप नाहीत. केवळ 14 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. एनसीबीचे डीडीजी संजय सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.

तीन बेरोजगारांची गोष्ट; ‘BE Rojgaar’ चा पहिला एपिसोड पाहिलात?

पापड्या, पियु आणि अक्षय हे तीन बेरोजगार इंजिनिअर करियरची एक वेगळी वाट निवडतात आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. ही कथा आहे भाडिपाच्या नवीन वेबसिरीज ‘B.E.Rojgaar’ची. पुणे आणि इचलकरंजी येथे शूट झालेल्या या वेबसिरीजचा पहिला भाग नुकताच भाडिपाच्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाला आहे. तो तुम्ही अगदी फुकटात पाहू शकता. B.E. Rojgaarमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर ही आधी कधीही न पाहिलेल्या, आगळ्या वेगळ्या भूमिकेतून आपल्याला दिसणार आहे. कामाच्या शोधत असलेली विदर्भातन आलेली मेकॅनिकल इंजिनीअरचं 'पियु' पात्र सई साकारत आहे. तिच्यासोबत आपल्याला कोल्हापूरी भूमिका सहजरीत्या साकारणारा संभाजी ससाणे ‘पापड्या’च्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत स्मार्ट आणि तितकंच गुंतागुंतीचं ‘अक्षय’ हे पात्र साकारताना जगदीश कन्नम दिसतोय. तीन इंजिनिअरची आयुष्यात दिशा शोधण्यासाठीच्या धडपडीची ही चित्तवेधक कथा आहे.

दिशा वकानी 'तारक मेहता' शोमध्ये परतणार का? दिलीप जोशी म्हणाले...

छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेमधून विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा आई झाली आहे. दिशा आणि तिचा मयूर पाडिया यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. पाच वर्षा पूर्वी दिशानं तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमधून ब्रेक घेतला. या मालिकेमध्ये दिशा कधी कमबॅक करणार आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आता याबाबत एका मुलाखतीमध्ये अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi)  यांनी सांगितलं आहे. 


वाचा सविस्तर बातमी

Urfi Javed : कधी प्लास्टिकचा, तर कधी सेप्टीपीन्सचा ड्रेस घालणाऱ्या उर्फीचं लग्न झालंय?

Urfi Javed : फॅशनमुळे आणि अतरंगी स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असणारी उर्फी जावेदचे (Urfi Javed) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उर्फी ही कधी  प्लास्टिकचा, तर कधी सेप्टीपीन्सपासून तयार केलेला ड्रेस घालून फोटोशूट करते. अनेक लोक उर्फीला तिच्या या फॅशनमुळे ट्रोल करतात तर काही जण तिचं कौतुक देखील करतात. उर्फीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. अनेक जण तिच्याबाबतचे प्रश्न गूगलवर सर्च देखील करतात. जाणून घेऊयात उर्फीबाबत लोकांनी सर्च केले काही प्रश्न 


वाचा सविस्त बातमी 

पार्श्वभूमी

Bhirkit : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या 'भिरकीट' (Bhirkit) नावाचे हास्याचे वादळ येत आहे. 'भिरकीट' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून हे वादळ १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत येणार आहे.  काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा संगीत सोहळा पार पडला. चित्रपटाची गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस आल्यानंतर आता चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारा ट्रेलरही भेटीला आहे. ट्रेलरमध्ये आपल्याला तात्या पाहायला मिळत आहे, ज्यांची सगळ्यांच्या मदतीसाठीची धडपड दिसत आहे. त्यात असे काही घडल्याचे दिसतेय की, त्यातून अवघ्या गावाची दृष्टी बदलते.  आता अशी कोणती घटना घडते, ज्यातून हा बदल घडतो, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. हसवता हसवता मनाला स्पर्शून जाणारा हा चित्रपट आहे.


पाहा ट्रेलर :



Shah Rukh Khan : शाहरुख म्हणतो, 'माझ्या घरात 12 ते 13 टिव्ही'



बॉलिवूडचा 'बादशाह' अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. 23 मे रोजी दिल्लीमधील एका इव्हेंटमध्ये शाहरुकनं सहभाग घेतला. यावेळी उपस्थित लोकांसोबत संवाद साधताना शाहरुखनं त्याच्या घरात असलेल्या टिव्हीची किंमत सांगितली. त्याचा या इव्हेंटमधील व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओला नेचकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.


व्हिडीओमध्ये दिसत आहे की शाहरुख सांगतो, 'माझ्या घराच्या लिव्हिंग एरियामध्ये एक टिव्ही आहे. तसेच बेडरुममध्ये देखील एक टिव्ही आहे. अबरामच्या रुममध्ये वेगळा टिव्ही आणि आर्यनच्या रुममध्ये देखील वेगळा टिव्ही आहे. माझ्या मुलीच्या रुममध्ये एक टिव्ही आहे. जवळपास 12 ते 13 टिव्ही माझ्या घरात आहेत. या सर्वांची किंमत 30 ते 40 लाख रुपये आहे.  '


'तुला रॅम्प वॉक करता येत नाही?'; पलक तिवारीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल


अभिनेत्री  श्वेता तिवारीची (Shweta Tiwari )मुलगी पलक तिवारी (palak Tiwari) तिच्या स्टाईलनं नेहमीच नेटकऱ्यांची मनं जिंकते. पलकच्या बिझली-बिझली या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. पलक ही नुकत्याच दिल्लीमध्ये पार पडलेल्या एका फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. या फॅशन वीकमध्ये तिनं रॅम्प वॉक देखील केला. पलकच्या या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी पलकला ट्रोल केलं आहे. 


ब्लॅक कलरचा ड्रेस आणि हाय हिल्स अशा लूकमध्ये पलकनं फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला. यावेळी एका स्मार्ट वॉचच्या ब्रँडची ती शो- स्टोपर झाली होती. पलकच्या या रॅम्प वॉकचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हा रॅम्प वॉक खूप भीतीदायक आहे.' तर दुसऱ्यानं कमेंटमध्ये लिहिलं, 'तुला रॅम्प वॉक करता येत नाही?' एक युझर म्हणाला, 'राहूदेत, एका व्यक्तीला प्रत्येक गोष्ट येईलच असं नाही. तू रॅम्प वॉक करु नको.'


 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.