Entertainment News Live Updates 27 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 27 Mar 2023 06:04 PM
Shah Rukh Khan New Car : 'पठाण'च्या यशानंतर शाहरुखने खरेदी केली 'ही' आलिशान कार

Shah Rukh Khan New Car : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून 'पठाण' या सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याच्या 'पठाण' या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. आता 'पठाण'च्या यशानंतर शाहरुख खानने 'रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज एसयुव्ही' (Rolls Royce Cullinan Black Badge) ही कार खरेदी केली आहे. 





Shivpratap Garudjhep : अमोल कोल्हेंच्या 'शिवप्रताप गरुडझेप'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

Amol Kolhe Shivpratap Garudjhep World Television Premiere : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या कारकिदीर्तील लक्षणीय ठरलेली घटना म्हणजे औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून आग्र्याहून केलेली सुटका. अमोल कोल्हेंच्या (Amol Kolhe) शिवप्रताप गरुडझेप (Shivpratap Garudjhep) या सिनेमाच्या माध्यमातून ही ऐतिहासिक घटना पुन्हा एकदा जिवंत करण्यात आली आहे. आता या बहुचर्चित सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.





Daniel Radcliffe Girlfriend Erin Darke Pregnant: हॅरी पॉटर स्टार डॅनियल रॅडक्लिफ लग्नाआधीच होणार बाप; गर्लफ्रेंडच्या बेबी बंपचा फोटो व्हायरल

Daniel Radcliffe Girlfriend Erin Darke Pregnant:  अभिनेता डॅनियल रॅडक्लिफ (Daniel Radcliffe) हा हॉलिवूडमधील (Hollywood) प्रसिद्ध अभिनेता आहे. डॅनियल रॅडक्लिफला हॅरी पॉटर (Harry Potter) फिल्म सीरिजमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या फिल्म सीरिजमध्ये त्यानं हॅरी ही भूमिका साकारली. हॅरी पॉटरमधील डॅनियलच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. डॅनियल हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. डॅनियल रॅडक्लिफची गर्लफ्रेंड एरिन डार्के (Erin Darke) हिचा एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये एरिनचा बेबी बंप दिसत आहे. 





Daniel Radcliffe Girlfriend Erin Darke Pregnant: हॅरी पॉटर स्टार डॅनियल रॅडक्लिफ लग्नाआधीच होणार बाप; गर्लफ्रेंडच्या बेबी बंपचा फोटो व्हायरल

Daniel Radcliffe Girlfriend Erin Darke Pregnant:  अभिनेता डॅनियल रॅडक्लिफ (Daniel Radcliffe) हा हॉलिवूडमधील (Hollywood) प्रसिद्ध अभिनेता आहे. डॅनियल रॅडक्लिफला हॅरी पॉटर (Harry Potter) फिल्म सीरिजमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या फिल्म सीरिजमध्ये त्यानं हॅरी ही भूमिका साकारली. हॅरी पॉटरमधील डॅनियलच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. डॅनियल हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. डॅनियल रॅडक्लिफची गर्लफ्रेंड एरिन डार्के (Erin Darke) हिचा एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये एरिनचा बेबी बंप दिसत आहे. 



Nawazuddin Siddiqui : 100 कोटींच्या मानहानी प्रकरणानंतर नवाजुद्दीननं उचललं मोठं पाऊल

Nawazuddin Siddiqui Asks For Settlement With Wife Aaliya : अनेक दर्जेदार सिनेमांच्या माध्यमातून नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण सध्या तो वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. नवाज आणि आलियाच्या (Aaliya Siddiqui) नात्यात दुरावा आला आहे. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आलियाने नवाजुद्दीनवर गैरवर्तन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे अभिनेत्याने पत्नी आणि भाऊ शमसुद्दीन सिद्दीकीविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. पण आता नवाजने आलियासोबतच्या त्याच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. 

Sreejita De : 'बिग बॉस' फेम श्रीजिता डे लवकरच जर्मन बॉयफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकणार

Sreejita De Wedding : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता छोट्या पडद्यावरील आणखी एक अभिनेत्री, 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) फेम श्रीजिता डे (Sreejita De) लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. 





Mahesh Babu : महेश बाबूचा किलर स्वॅग; 'SSMB28'ची रिलीज डेट जाहीर

Mahesh Babu SSMB28 Poster : दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) सध्या त्याच्या आगामी 'एसएसएमबी 28' (SSMB28) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पोस्टर शेअर करत अभिनेत्याने या सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर केली आहे. सिनेमाच्या पोस्टरने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 





Virat Kohli: नाटू नाटू गाण्यावर थिरकला विराट कोहली; पाहा व्हिडीओ

Virat Kohli: क्रिकेटर विराट कोहलीनं नाटू नाटू या गाण्यावर डान्स केला आहे. त्याच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा देखील दिसत आहे. 





Malayalam Actor Innocent Death: मल्याळम अभिनेते इनोसंट यांचे निधन, कलाकारांकडून शोक व्यक्त

Malayalam Actor Innocent Death: मल्याळम (Malayalam) चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि माजी राज्यसभा खासदार इनोसंट (Innocent) यांचे कोची येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांनी वयाच्या  75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. इनोसंट यांना 3 मार्च रोजी कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. रविवारी (26 मार्च) रात्री 10.30 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इनोसंट यांच्या निधनानं मल्याळम चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इनोसंट यांना श्रद्धांजली वाहिली. 



Ram Charan Birthday Celebration: RC 15 च्या टीमसोबत राम चरणचं प्री-बर्थडे सेलिब्रेशन, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Ram Charan Birthday Celebration: आरआरआर (RRR) या चित्रपटानंतर आता राम चरणच्या (Ram Charan) आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सध्या राम चरण हा त्याच्या ‘आरसी 15’ (RC 15) या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे. आज (27 मार्च) राम चरणचा 38 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा देत आहेत. राम चरणनं   RC 15 च्या टीमसोबत  प्री-बर्थडे सेलिब्रेशन केले. RC 15 चित्रपटाच्या सेटवरील राम चरणच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल झाले आहेत. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Prajakta Mali : 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेत प्राजक्ता माळीची एन्ट्री!



Prajakta Mali On Post Office Ughade Ahe : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हे नाव कायमच आघाडीवर असते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. आता 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' (Post Office Ughde Ahe) या मालिकेत प्राजक्ताची एन्ट्री होणार आहे. 


International Film Festival : लातुरात पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची जल्लोषात सुरुवात; तीन दिवसांत तब्बल 17 आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी 



International Film Festival in Latur : विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन, अभिजात फिल्म सोसायटीच्या आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज लातुरात पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. सिनेमा क्षेत्रात जागतिक पातळीवर होत असलेले बदल समजून घेण्याचे भान यावे तसेच विविध देशांची संस्कृती आणि पर्यावरणाची जाणीव व्हावी, या उद्देशाने या पहिल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. 














Shah Rukh Khan : पाकिस्तानात कलाकारांकडून 'किंग खान'ला अनोखी भेट; साकारलं हुबेहूब प्रतिमेचं सँड पोर्ट्रेट


SRK Sand Portrait In Pakistan Beach : बॉलिवूडच्या दिग्गज सुपरस्टारमध्ये बादशाह म्हणजेच शाहरूख खानचं (Shah Rukh Khan) नाव टॉपवर आहे. शाहरूख खानचा चाहता वर्ग फक्त भारतातच (India) नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहे. इतकंच नाही तर, भारताच्या शेजारील देश पाकिस्तानातही (Pakistan) किंग खानच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. अशाच पाकिस्तानच्या प्रसिद्ध एका वाळू शिल्परकाराने गडानी बीचवर शाहरुख खानचे अप्रतिम पोर्ट्रेट बनवले आहे. या पोट्रेटची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. 








 






शाहरुख खानच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शाहरुख खानचा असाच एक चाहता पाकिस्तानचा सँड आर्टिस्ट समीर शौकत आहे. खरंतर, नुकतेच समीर शौकतने बलुचिस्तानमधील प्रसिद्ध गडानी समुद्रकिनारी वाळूवर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे स्केच कोरले आहे. समीर आणि त्याच्या टीममधील सहकाऱ्यांनी शाहरुख खानचे हे अप्रतिम वाळूचे पोर्ट्रेट साकारले आहे याचा अंदाज आपल्याला या पोट्रेटकडे पाहताक्षणीच येतो.























- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.