Entertainment News Live Updates 27 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 27 Jan 2023 04:24 PM
Mahendra Singh Dhoni : महेंद्र सिंह धोनीने केली पहिल्या सिनेमाची घोषणा

Mahendra Singh Dhoni First Film : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. निर्माता म्हणून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. 'धोनी एन्टरटेनमेंट प्रायवेट लिमिटेड'च्या बॅनरखाली त्याने आपल्या पहिल्या-वहिल्या सिनेमाची घोषणा केली आहे. 'एलजीएम : लेट्स गेट मॅरिड' (Lets Get Married) असं या सिनेमाचं नाव आहे. 





Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांवर गुन्हे दाखल करा; नागपुरात लहू सेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

File Case Against Mahesh Manjrekar Demands Lahu Sena: 'काळे धंदे'या वेबसिरीजमध्ये दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी बँड वाजवणाऱ्यांबद्दल अपमानास्पद आणि अश्लील भाषेत बोलून बँड व्यवसाय करणाऱ्यांचा अपमान केला आहे. यामुळे बँड व्यवसाय करुन आपली आणि आपल्या परिवाराची उपजिविका भागविणाऱ्यांचा अपमानच असल्याचा आरोप करत महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नागपुरात लहू सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. 

Akshay Kelkar : लग्नाच्या रुखवतात सजली 'बिग बॉस'ची ट्रॉफी; अक्षय केळकरने पूर्ण केला लाडक्या बहिणीचा हट्ट

Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकरची (Akshay Kelkar) बहिण नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. अक्षयने 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकावी तसेच ती ट्रॉफी लग्नाच्या रुखवतात ठेवावी अशी अक्षयच्या बहिणीची इच्छा होती. अखेर अक्षयने लाडक्या बहिणीची इच्छा पूर्ण केली आहे. 





Masaba Gupta Wedding : नीना गुप्ताची लेक मसाबा दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात

Masaba Gupta Married Satyadeep Misra : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताची लेक (Neena Gupta) अभिनेत्री मसाबा गुप्ता (Masaba Gupta) नुकतीच सत्यदीप मिश्रासोबत (Satyadeep Misra) लग्नबंधनात अडकली आहे. मसाबा आणि सत्यदीप दोघांचही हे दुसरं लग्न आहे. मसाबाने सोशल मीडियावर सत्यदीप सोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना लग्नाची माहिती दिली आहे. 





Siddarth Jadhav : "तेजू तू बडी होगई रे..."; सिद्धार्थ जाधवने खास पोस्ट शेअर करत तेजस्विनी पंडितला दिल्या शुभेच्छा!

Siddarth Jadhav On Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सध्या 'बांबू' (Bamboo) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ती निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. दरम्यान सिद्धार्थ जाधवने (Siddarth Jadhav) एक खास पोस्ट शेअर करत तेजस्विनी पंडितला शुभेच्छा दिल्या आहेत. 





Box Office Report : बॉक्स ऑफिसवरचा बादशाह शाहरुख खान!

Pathaan And Gandhi Godse Ek Yudh Box Office Report : सिनेप्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळत आहेत. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर दुसरीकडे राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा 'गांधी गोडसे एक युद्ध' (Gandhi Godse Ek Yudh) हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर 'पठाण' आणि 'गांधी गोडसे एक युद्ध' हे सिनेमे आमने-सामने आहेत. 

Actress Jamuna Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री जमुना यांचं निधन; ज्युनियर एनटीआर, महेश बाबू अन् चिरंजीवींनी व्यक्त केला शोक

Actress Jamuna Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री जमुना (Jamuna) यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जमुना यांच्या निधनानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जमुना यांनी तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. 





Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांनी गायलं देशभक्तीपर गीत; नव्या गाण्याचा व्हिडीओ शेअर

Amruta Fadnavis:  गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियावर त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी शेअर करत असतात. अमृता यांनी काल (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी गायलेल्या एका देशभक्तीपर गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अमृता फडणवीस यांचे हे देशभक्तीपर गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.  



Pathaan Housefull: पठाणची काश्मिरमध्ये जादू; तब्बल 32 वर्षांनी थिएटरबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड

Pathaan Housefull:  बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan)  आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा पठाण (Pathaan)  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून शाहरुख खाननं चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. पठाण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी शाहरुखच्या चाहत्यांनी या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग केलं. काही चाहत्यांनी तर अख्खं थिएटर बुक केलं होतं. आता पठाणच्या कामगिरींच्या यादीत आणखी एका कामगिरीचा सामवेश झाला आहे. पठाण चित्रपटामुळे आता काश्मिर खोऱ्यातील  (Kashmir Valley)  एका थिएटरबाहेर तब्बल 32 वर्षांनी हाऊसफुल्लचा बोर्ड  लागला आहे. 



Shark Tank India 2: 85 वर्षांच्या आजोबांनी बनवलंय केस गळती दूर करणारं तेल, शार्क्सना दिली तगडी ऑफर, पण...

Shark Tank India-2: छोट्या पडद्यावरील 'शार्क टँक इंडिया-2' (Shark Tank India-2) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनप्रमाणेच दुसऱ्या सीझनला देखील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. 'शार्क टँक इंडिया' या शोमध्ये स्वत:चा व्यवसाय असणारे लोक येतात. हे लोक शोमधील परीक्षकांना त्यांची बिझनेस आयडिया सांगतात. शार्क टँक इंडियाच्या नुकत्याच एका एपिसोडमध्ये एका 85 वर्षांच्या आजोबांनी हजेरी लावली. या शोमध्ये या आजोबांनी त्यांच्या आयुर्वेदिक तेलाच्या व्यवसायाची माहिती शार्क्सना दिली.



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


सवाई एकांकिका चषकावर महर्षी दयानंद महाविद्यालयच्या 'बारम'चं नाव, कीर्ती महाविद्यालयाची 'उकळी'  द्वितीय


मुंबई: एकांकिकांच्या विषयांमधील विविध छटा असणारी स्पर्धा म्हणजे चतुरंग आयोजित सवाई एकांकिका स्पर्धा (Sawai Ekankika Spardha 2023 Mumbai). तरुणाईच्या उत्साहाला उधाण आणणाऱ्या या स्पर्धेचं यंदाचं हे 34वं वर्ष होतं. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत अखेर महर्षी दयानंद महाविद्यालयच्या 'बारम' (Baram) या एकांकिकेने  बाजी मारली. सर्वोत्तम एकांकिकेसह 'बारम' या एकांकिकेने अन्य चार पुरस्कारांवरही मोहोर उमटवली. याच एकांकिकेला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक,  ध्वनीसंयोजक, नेपथ्यकार आणि प्रेक्षक पारितोषिक मिळालं. तर कीर्ती महाविद्यालयाच्या 'उकळी' या एकांकिकेने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात पार पडली. 


Shubman Gill : 'सारा भाभी जैसी हो...', शुभमन गिलला पाहून चाहत्यांनी दिल्या घोषणा; विराट कोहलीने दिली मजेशीर प्रतिक्रिया


Shubman Gill : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचं (Sara Ali Khan) नाव गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर शुभमन गिलबरोबर (Shubman Gill) जोडलं जात आहे. सारा आणि शुभमन यांना अनेकदा एकत्र स्पॉटदेखील करण्यात आलं आहे. नुकताच आता एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये चाहते क्रिकेटच्या मैदानावर साराच्या नावाने शुभमन गिलला चिडवताना दिसत आहेत. अलीकडेच, इंदूरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारताच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यादरम्यान, प्रेक्षक साराच्या नावाने ओरडून शुभमनची छेड काढताना दिसले. यावेळी संपूर्ण स्टेडियममध्ये साराच्या नावाचा जयघोष सुरु होता. 


Pathaan Worldwide Box Office Collection: 'पठाण'ने 'अवतार'चा विक्रम मोडला; जगभरात पहिल्याच दिवशी केली 100 कोटींची कमाई


Pathaan Worldwide Box Office Collection: तब्बल 4 वर्षानंतर शाहरुख खानने मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. 'पठाण' देशातच नव्हे तर जगात कमाईचे नवे विक्रम करत आहे. चित्रपटाच्या एका दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने जवळपास 106 कोटींचा आकडा पार केला आहे. परदेशी प्रदेशांमध्ये पहिल्या दिवशी पठाणने हिंदी चित्रपटासाठी उत्तर अमेरिका, युनायटेड किंगडम आणि आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, U.A.E, G.C.C, जर्मनी, स्वीडन, रशिया, CIS, फिनलंड आणि नेपाळमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग डे (Movie Opening Day Records) ठरला आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.