Entertainment News Live Updates 26 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 26 Oct 2022 03:32 PM
Riteish Deshmukh Movie Ved: रितेशनं शेअर केलं वेड चित्रपटाचं पोस्टर; म्हणाला, 'वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण...

Riteish Deshmukh Movie Ved:  आज दिवाळी पाडवाचे औचित्य साधून अभिनेता आणि आता दिग्दर्शनाची भूमिका साकारणाऱ्या  रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) त्याच्या वेड (Ved) या आगामी चित्रपटचं  पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्यानं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये या चित्रपटाचे तीन पोस्टर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये रितेशसोबतच जेनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) देखील दिसत आहे.  



Sidhu Moose Wala: सिद्धू मूसेवाला हत्याप्रकरण; गायिका अफसाना खानची NIA कडून पाच तास चौकशी

Sidhu Moose Wala:  पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांची काही महिन्यांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेमुळं संपूर्ण देश हादरला. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. NIA ही तपास यंत्रणा देखील सिद्धू मूसेवाला खून प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, सिद्धू मूसेवाला यांची जवळची मैत्रीण आणि पंजाबी गायिका अफसाना खानची एनआयएनं चौकशी केली आहे.

Kantara Movie: 'अंगावर शहारे आले'; कांतारा चित्रपटाचं अल्लू अर्जुननं केलं कौतुक

Kantara: सध्या 'कांतारा' (Kantara)  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं बॉक्स कोट्यवधींची कमाई केली आहे. ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.  धनुष, अनुष्का शेट्टी, प्रभास ,विवेक अग्निहोत्री,कंगना रनौत या सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक केलं. आता पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुननं देखील या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.



Ghar Banduk Biryani: जबरदस्त अॅक्शन; अकाश ठोसर, नागराज मंजुळे अन् सयाजी शिंदेंचा स्वॅग; 'घर बंदूक बिरयानी' चा टीझर पाहिलात?

Ghar Banduk Biryani:  नागराज मंजुळे आकाश ठोसर आणि सयाजी शिंदे यांच्या घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमधील नागराज आणि सयाजी शिंदे यांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.


पाहा टीझर: 


Ram Setu Box Office Collection: अक्षयच्या 'राम सेतू'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

Ram Setu Box Office Collection:  अभिनेता  अक्षय कुमारनं  (Akshay Kumar)    त्याच्या चाहत्यांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे. त्याचा राम सेतू (Ram Setu) हा चित्रपट काल (26 ऑक्टोबर) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षयसोबतच जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरूचा आणि सत्यदेव कंचरण या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत असून अनेकांनी या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात झाली आहे. जाणून घेऊयात पहिल्या दिवसाचं राम सेतू चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...


पहिल्या दिवशी राम सेतू या चित्रपटानं 15 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. हा चित्रपट जवळपास 3000 स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला. काही चित्रपट समीक्षकांनी आणि अक्षयच्या चाहत्यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. पण बॉक्स ऑफिसवर राम सेतूची सुरुवात संथ झाली. 

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.   


ब्रह्मास्त्र या दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार 


आज (रविवारी 23 ऑक्टोबर) रोजी, OTT अॅप डिस्ने प्लस हॉटस्टारनच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला आहे. यासोबतच या पोस्टमध्ये ब्रह्मास्त्रच्या ओटीटी रिलीज डेटचीही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, पुढील महिन्यात 4 नोव्हेंबर रोजी ब्रह्मास्त्र OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होईल. ब्रह्मास्त्रचा चित्रपट निर्माता करण जोहरनेही हीच पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. आणि म्हटले आहे की, मोठ्या पडद्यापासून तुमच्या हृदयापर्यंत आणि आता तुमच्या पडद्यावर या वर्षातील सर्वात हिट हिंदी चित्रपट ब्रह्मास्त्र ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. ब्रह्मास्त्रच्या ओटीटी रिलीजच्या घोषणेने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 


Alia Bhatt : प्रेग्नंट असल्यामुळे आलिया भट्ट दिवाळी साजरी करत नाही? फोटो शेअर करत केला खुलासा 


मुंबई: आलिया आणि रणबीरसाठी यंदाची दिवाळी विशेष आहे, खासकरून आलिया भट्ट साठी. कारण या वर्षी बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकले नाहीत, पण आलिया भट्टचा गंगूबाई कठियावाड़ी (Gangubai Kathiawadi) आणि ब्रह्मास्त्र (Brahmāstra) या चित्रपटाने मात्र बॉक्स ऑफिसवर जादू केली. तसेच पहिल्यांदाच आलियाने रणबीरसोबत ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या माध्यमातून एकत्रित काम केलं. आलिया आणि रणबीरसाठी यंदाचं वर्ष आणखी एका कारणासाठी स्पेशल आहे. ते म्हणजे त्यांच्या घरी आता लहान पाहुण्याचं आगमन होणार आहे. म्हणूनच आलिया यंदाची दिवाळी दरवर्षीप्रमाणे धुमधडाक्यात साजरी करू शकत नाही. इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिने ही माहिती दिली आहे. 


Mili : '20 दिवस उणे 15 डीग्री फ्रीजरमध्ये...' जान्हवी कपूरसाठी 'मिली'ची भूमिका किती कठीण होती?


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूर तिच्या आगामी 'मिली' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 15 ऑक्टोबरला मिलीचा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्यामध्ये जान्हवीची व्यक्तिरेखा पाहून सगळेच थक्क झाले. जान्हवी कपूरचा 'मिली' हा चित्रपट येत्या 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. दरम्यान, ही भूमिका किती कठीण होती हे जान्हवी कपूरने सांगितलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.