Entertainment News Live Updates 25 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 25 Mar 2023 01:33 PM
3 Idiots Sequel: करीनानंतर आता बोमन इराणीनं देखील शेअर केला व्हिडीओ; थ्री-इडियट्सच्या सिक्वेलबाबत म्हणाला, 'व्हायरसशिवाय...'

3 Idiots Sequel:  थ्री इडियट्स (3 Idiots) हा चित्रपट आजही लोक आवडीनं बघतात. हा चित्रपट 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात अभिनेता आमिर खान (Aamir Khan), आर. माधवन (R. Madhavan) आणि शर्मन जोशी (Sharman Joshi),  करीना कपूर (Kareena Kapoor) आणि बोमन इराणी (Boman Irani) यांनी प्रमुख भूमिका साकारली. आता या चित्रपटाचा सिक्वेल रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. करीनानं काही दिवसांपूर्वी  थ्री इडियट्स चित्रपटाच्या सिक्वेलबाबत एक व्हिडीओ शेअर केला होता. आता बोमन इराणीनं या चित्रपटाबाबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 








पाहा व्हिडीओ








Rashmika Mandanna: पुष्पाच्या श्रीवल्लीची ठसकेबाज लावणी; चंद्रा गाण्यावर रश्मिकाचा जबरदस्त परफॉर्मन्स, पाहा व्हिडीओ

Rashmika Mandanna: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) ही तिच्या ग्लॅमरस अदा आणि स्टाईलनं प्रेक्षकांना घायाळ करते. पुष्पा या चित्रपटामुळे रश्मिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिनं श्रीवल्ली ही भूमिका साकारली. 'नॅशनल क्रश' या नावानं रश्मिका ओळखली जाते. रश्मिकाचा चाहता वर्ग मोठा आहे. नुकताच रश्मिकाच्या एका डान्स परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रश्मिका ही ठसकेबाज लावणी सादर करताना दिसत आहे. व्हिडीओमधील रश्मिकाच्या मराठमोळ्या अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 



Nilu Kohli Husband Death: अभिनेत्री नीलू कोहलीच्या पतीचे निधन, बाथरूममध्ये आढळला मृतदेह

Nilu Kohli Husband Death:   मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री नीलू कोहलींचे (Nilu Kohli) पती हरमिंदर सिंह (Harminder Singh) यांचे निधन झाले. शुक्रवारी (24 मार्च) हरमिंदर सिंह हे गुरुद्वारमध्ये गेले होते.  गुरुद्वारा येथून घरी आल्यानंतर ते बाथरुममध्ये गेले.  बाथरुममध्ये असताना ते कोसळले. त्यावेळी नीलू यांच्या घरातील हेल्पर तिथे होता.  हरमिंदर सिंह यांना रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. 



Bheed Box Office Collection: कोरोनाकाळावर भाष्य करणारा 'भीड' बॉक्स ऑफिसवर आपटला; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

Bheed Box Office Collection: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांचा भीड (Bheed) हा चित्रपट काल (24 मार्च) प्रेक्षकांच्या भेटीस आला. भीड या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत होते. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या या चित्रपटाचं कथानक कोरोनाकाळावर आधारित आहे. हा चित्रपट ब्लॅक अॅन्ड व्हाईट थीमवर आधारित आहे. भीड या चित्रपटाचं क्रिटिक्सनं कौतुक केलं. सोशल मीडियावर देखील अनेकांनी या चित्रपटाचं प्रमोशन केलं. पण तरी देखील हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही.  या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 15 लाख रुपयांची कमाई केली आहे. 

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Aani Baani: रुपेरी पडद्यावर ‘आणीबाणी’; प्रवीण तरडे, सयाजी शिंदे प्रमुख भूमिकेत


Aani Baani: 'आणीबाणी' (Aani Baani) म्हटलं कि, ती सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवणारी असते. त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारी असते. पण आता मात्र चिंता वाढवायला नाही तर कमी करायला ‘मनोरंजनाची आणीबाणी’ लागू होणार आहे. लेखक अरविंद जगताप आणि दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी विनोदाची ही ‘आणीबाणी’ प्रेक्षकांसाठी आणली आहे. उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे (Pravin Tarde), सयाजी शिंदे (Sayaji Shinde), संजय खापरे (Sanjay Khapare), वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर अशा मराठीतील अनेक दिग्गजांचा या ‘आणीबाणी’त सहभाग आहे. 'दिनिशा फिल्म्स' निर्मित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट येत्या जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  








3 Idiots Sequel:  14 वर्षांनंतर 'थ्री-इडियट्स-2' येणार? करीनानं शेअर केला व्हिडीओ

3 Idiots Sequel:  थ्री इडियट्स (3 Idiots) हा चित्रपट रिलीज होऊन 14 वर्ष झाले आहेत. तरी देखील अनेक जण आजही हा चित्रपट आवडीनं बघतात. हा चित्रपट 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्यावेळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. दिग्दर्शक राजकुमार हिराणी (Rajkumar Hirani) यांनी थ्री इडियट्स या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. नुकताच अभिनेत्री करीना कपूरनं (Kareena Kapoor) एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये अभिनेता आमिर खान (Aamir Khan), आर. माधवन (R. Madhavan) आणि शर्मन जोशी (Sharman Joshi)  यांचा एक फोटो दिसत आहे. या फोटोवर 'इडियट्स' असं लिहिलेलं दिसत आहे. 






 







Sonu Nigam : सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी करणारा अटकेत; आरोपीला कोल्हापुरातून अटक, 72 लाखांचा डल्ला


Sonu Nigam :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगमचे (Sonu Nigam) वडील आगम कुमार निगम यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. मुंबई (Mumbai) पोलिसांनी आता आरोपीला कोल्हापुरातून (Kolhapur) अटक केली. रेहान मुजावर असे आरोपीचे नाव आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी 70 लाख 70 हजार रुपये जप्त केले आहेत.








 






 






























- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.