Entertainment News Live Updates 22 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 22 Oct 2022 03:07 PM
Khal Khal Goda Song: "खळ खळ गोदा"; गोदावरी चित्रपटातील गाणं प्रदर्शित

Khal Khal Goda Song: 'गोदावरी' चित्रपटातील 'खळ खळ गोदा' (Khal Khal Goda) हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. नदी जशी सगळं काही पोटात सामावून वर्षानुवर्षे वाहतच राहते, तसच काहीस आयुष्याच होताना दिसतंय. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परंपरागत चालत आलेला वारसा आणि त्यात गुंतणारे भावविश्व यांचं उत्तम वर्णन ह्या गाण्यातून होताना दिसते.  मन प्रसन्न करणारे 'खळ खळ गोदा' हे गाणे श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श करून आयुष्याच्या नागमोडी प्रवाहात वाहताना दिसून येत आहे. गाण्याचे बोल नदीला संबोधून असले तरीही मनुष्याच्या व्यक्तिगत जीवनातील घडामोडीचा उत्तम आरसा आहे. ऐन दिवाळीत घरबसल्या रसिकप्रेक्षकांना गोदावरीचे दर्शन घडवून, मनात नवचैतन्य निर्माण करणारे हे गाणे उत्सवासाठी परिपूर्ण आहे. 


घरापासून दूर असलेल्या प्रत्येकासाठी 'रात ही' दिवाळीच्या निमित्ताने 'सनी' चित्रपटातील गाणे प्रदर्शित

असं म्हणतात, लांब गेल्यावरच जवळच आठवतं ! आणि हे अगदी बरोबर आहे. घरापासून दूर गेल्यावरच आपल्याला घराची, घरच्यांची किंमत कळते. घरापासून दूर असलेल्या प्रत्येकाच्या मनातील तळमळ असलेले 'सनी' चित्रपटातील 'रात ही' हे गाणं दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. कामानिमित्ताने, शिक्षणानिमित्ताने आपल्या कुटुंबापासून, मित्रमैत्रिणींपासून लांब असणाऱ्या प्रत्येकासाठी हे गाणं आहे. क्षितिज पटवर्धन यांचे भावस्पर्शी बोल असणाऱ्या या गाण्याला सौमील - सिद्धार्थ यांनी संगीतबद्ध केले आहे. तर या गाण्याला निखिल डिसुझा याचा आवाज लाभला आहे. इरावती कर्णिक लिखित 'सनी' या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे.


पाहा गाणं: 


OTT Release: दिवाळीला मनोरंजनाचा धमाका; ओटीटीवर पाहा 'हे' चित्रपट

Ott Release Movies:  ओटीटीवरील (OTT) चित्रपटांना आणि वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळत असते. दिवाळीला अनेकांना ऑफिसला तसेच शाळेला सुट्ट्या असतात. अशावेळी कुटुंबासोबत चित्रपट बघायला अनेकांना आवडतं. दिवाळीला ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका होणार आहे, कारण काही हिट चित्रपट नेटफ्लिक्स, अॅमेझन प्राइम, डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफर्मवर प्रदर्शित होणार आहेत. घरबसल्या हे चित्रपट तुम्ही ओटीटीवर पाहू शकता. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Sardar Twitter Review: 'कांतारा' नंतर आता 'सरदार' ची चर्चा; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Sardar Twitter Review:  सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कांतारा हा कन्नड चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता कांतारा (Kantara)  नंतर सरदार (Sardar) या तमिळ चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हा स्पाय थ्रिलर चित्रपट काल (21 ऑक्टोबर) रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. दिवाळीमध्ये रिलीज झालेला हा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे, अशा प्रतिक्रिया  सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. 



Sanjay Dutt: 'खलनायकच्या सिक्वेलमध्ये रणवीरने काम करु नये'; असं का म्हणाला संजय दत्त?

Case Toh Banta Hai:  ‘केस तो बनता है’ (Case Toh Banta Hai) हा कोर्ट रुम कॉमेडी शो प्रेक्षकांचे सध्या मनोरंजन करत आहे. हा कार्यक्रम मिनी अॅमेझन टीव्हीवर प्रेक्षक पाहू शकतात. बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात. या कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा वकिलाची भूमिका साकारतो. करीना कपूर, अनिल कपूर, वरुण धवन  यांसारख्या कलाकारांनी या कार्यक्रमात उपस्थिती लावली. या कार्यक्रमाच्या एका एपिसोडमध्ये अभिनेता  संजय दत्तनं (Sanjay Dutt)  देखील हजेरी लावली. या एपिसोडमध्ये संजयला काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची संजयनं मजेशीर उत्तरं दिली.


पाहा प्रोमो: 



Parineeti Chopra: अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात करायचं होतं करिअर; परिणीती अशी झाली बॉलिवूड स्टार

Parineeti Chopra: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) सध्या तिच्या वेगवेगळ्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. परिणीतीच्या आगामी चित्रपटांची वाट प्रेक्षक उत्सुकतेने बघत असतात. परिणीतीचा आज (22 ऑक्टोबर) वाढदिवस आहे. तिचा जन्म 22 ऑक्टोबर 1988 रोजी  हरियाणातील अंबाला येथे झाला. परिणीतीचे वडील व्यापारी असून तिची आई गृहिणी आहे.  परिणीतीचे सुरुवातीचे शिक्षण अंबाला येथे झाले. परिणीती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती.  त्यामुळे तिच्या वडिलांनी  तिला वयाच्या 17 व्या वर्षी पुढील शिक्षणासाठी परदेशात पाठवले. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Whistle Blowing Suit : ‘व्हिसल ब्लोईंग सूट’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित; पाहा व्हिडीओ

Whistle Blowing Suit : सृष्टीत अतिशय वेगाने अनाकलनीय बदल घडत आहेत. याचे पडसाद जगभर उमटत आहेत. या बदलांच्या मुळांपर्यंत जाऊन त्यांचे विश्लेषण करून उपाय सुचवण्याचा धाडसी प्रयत्न ‘व्हिसल ब्लोईंग सूट’ (Whistle Blowing Suit) या चित्रपटात केला गेला आहे. जागतिक घडामोडींचा वेध एका मराठी चित्रपटात घेतला जात आहे. भूत, वर्तमान आणि भविष्याचा समग्र धांदोळा घेत प्रभावी उपाय सुचवणारा मराठीतील हा पहिला विज्ञानपट असून ‘व्हिसल ब्लोईंग सूट’ चित्रपट जागतिक चित्रपट महोत्सवात दमदार हजेरी लावण्यासाठी आता सज्ज झाला आहे. 


पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.       


बिग बॉसच्या घरात पेटणार शाब्दिक युद्ध; टास्क दरम्यान अमृतानं अपूर्वाला सुनावले खडे बोल!


बिग बॉस यांनी सदस्यांवर काल सोपवले रोख ठोक हे कार्य. काल मिळालेल्या चार कॅप्टन्सीच्या उमेदवारांमध्ये कार्य रंगणार असून त्यांच्यामध्ये आज पेटणार शाब्दिक युद्ध. आज उमेदवार त्यांची मते मांडणार असून इतर सदस्य देखील साक्षिदार म्हणून या कार्यात सहभागी होणार आहेत. उमेदवार पर्यायी वकील यांची भूमिका निभावणार असून या कोर्टाचा जज असणार आहे कॅप्टन रोहित शिंदे.


भाजपच्या कार्यक्रमात राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून टायगर श्रॉफचा सत्कार; सचिन अहिर यांचा आरोप, तर शेलार म्हणतात...


'मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव' हा कार्यक्रम भाजपकडून आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम वरळीमधील जांबोरी मैदान येथे पार पडला. भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांचा अपमान भाजपनं केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी केला आहे. सचिन अहिर यांनी ट्वीट करुन हा आरोप केला आहे. राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून अभिनेता टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) सत्कार करण्यात आला, असंही सचिन अहिर यांचं मत आहे.


वैशाली ठक्कर प्रकरणात एक्स-बॉयफ्रेंड राहुल नवलानी पोलिसांच्या ताब्यात, आरोपी पूजाचा शोध सुरु


टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करच्या (Vaishali Thakkar) आत्महत्येप्रकरणी (Vaishali Thakkar Suicide Case) इंदूर पोलिसांनी मुख्य आरोपी असणाऱ्या राहुल नवलानी (Rahul Navlani) याला अटक केली आहे. आरोपी राहुल नवलानी याला पोलिसांनी इंदूरमधून अटक केली आहे. वैशालीने आत्महत्या केल्यानंतर तो फरार झाला होता. वैशालीने आपल्या सुसाईड नोटमध्ये राहुल नवलानी आणि त्याची पत्नी दिशा नवलानी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तेव्हापासून पोलीस राहुल आणि त्याच्या पत्नीच्या शोधात होते. मात्र, अद्याप राहुलची पत्नी पूजा फरार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.