Entertainment News Live Updates 22 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Shehzada Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. कार्तिकच्या भूल भूलैया-2 या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. कार्तिकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. लवकरच तिचा त्याचा 'शहजादा' (Shehzada) हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात कार्तिकसोबतच अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. नुकताच 'शहजादा' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai : नाटक, सिनेमे, वेबसीरिज कितीही आल्या तरी छोट्या पडद्याची गंमत निराळी आहे. सध्या वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' (Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai) असं या मालिकेचं नाव आहे. घराघरात घडणारी सासू सूनांची भांडणं विनोदी पद्धतीने या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
Manushi Chhillar : विश्वसुंदरी, बॉलिवूड अभिनेत्री, मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानुषी सध्या तिच्या अफेअरमुळे चर्चेत आली आहे. ती उद्योगपती निखिल कामथला (Nikhil Kamath) डेट करत असल्याची चर्चा आहे.
Ajay Devgn Blolaa Teaser Out : हिंदी सिनेसृष्टीत सध्या बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) बोलबाला आहे. एकीकडे अक्षयचा 'दृश्यम 2' (Drishyam 2) हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घातलो आहे. दुसरीकडे त्याच्या आगामी 'भोला' (Bholaa) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या टीझरचे वैशिष्ट्य म्हणजे हा टीझर खास 3 डीमध्ये रिलीज करण्यात आला आहे.
Raj Thackeray : तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांना “तुमच्या स्वतःच्या आयुष्यात एवढा ड्रामा आहे, त्यात राजकारण आहे, लव्हस्टोरी आणि आयुष्यातले इतर चढउतार आहेत तर मग तुमच्यावर जर बायोपिक निघाला तर तुमची भूमिका कोणी साकारलेली पाहायला तुम्हाला आवडेल?” असा प्रश्न विचारला. ज्यावर राज ठाकरे यांनी फारच मजेदार उत्तर दिलं. राज ठाकरे यांचं उत्तर ऐकल्यानंतर तेजस्विनीलाही हसू आवरेनासं झालं.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत उत्कर्षने लिहिलं आहे,"आज मराठी सिनेमाला बर्बरतेतून समृद्धीच्या वाटेवर आणायचं असेल तर समानतेची वागणूक मिळायला हवी. अद्वितीय महान कलाकार दादा कोंडके यांच्या चित्रपटांना त्याकाळी सिनेमागृह मिळाली नव्हती. तेव्हाही मराठी सिनेमांची गळचेपी होत होती. तोच प्रश्न, तिच वेळ, तेच विचार, तिचं कुचंबणा, तिच डावलण्याची मानसिकता आजही तोंड वर काढत आहे"
AVATAR: THE WAY OF WATER: दिग्दर्शक जेम्स कॅमेरून (James Cameron)यांच्या 'अवतार' चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर जगभरातील प्रेक्षक या चित्रपटाच्या सीक्वलची वाट पाहत होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'अवतार: द वे ऑफ वॉटर' (Avatar: The Way Of Water)या अवतारच्या सीक्वेलच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. आता भारतातील प्रेक्षक या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग करु शकतात.
'दृश्यम 2'ची कमाई :
- पहिला दिवस - 15.38 कोटी
- दुसरा दिवस - 21.59 कोटी
- तिसरा दिवस - 27.17 कोटी
- चौथा दिवस - 10 कोटी
- एकूण कमाई - 74.14 कोटी
Nora Fatehi : कपिल शर्माने नोराला विचारलं, तुझं कधी कोणत्या सहकलाकारासोबत भांडण झालं आहे का? यावर उत्तर देत नोरा म्हणाली,"बांग्लादेशात एका सिनेमाचं शूटिंग करत होते. शूटिंगदरम्यान सह-कलाकाराने माझ्याशी गैरवर्तन केलं. त्यावेळी कसलाच विचार न करता मी त्याच्या कानशिलात लगावली त्यानंतर त्यानेही माझ्या कानशिलात लगावली. मी पुन्हा त्याला थप्पड मारली तर त्याने माझे केस ओढले".
Kartik Aaryan : तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन (Kartik Aaryan). आज कार्तिक 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. कार्तिकने त्याच्या दमदार अभिनयाने अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली आहे. त्याने आजवर एकापेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Amit Bhanushali : तब्बल नऊ वर्षांनंतर अभिनेता अमित भानुशालीचं मालिका विश्वात पुनरागमन; 'ठरलं तर मग' मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका
Tharla Tar Mag Marathi Serial : स्टार प्रवाहवर 5 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असून रडायचं नाही तर लढायचं असं ठामपणे सांगणारी सायली लवकरच मनोरंजनाच्या प्रवाहात सामील होणार आहे. या नव्या मालिकेत सायली बरोबरच आणखी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा असणार आहे आणि ती म्हणजे अर्जुन सुभेदाराची. अभिनेता अमित भानुशाली (Amit Bhanushali) ही व्यक्तिरेखा साकारणार असून तब्बल नऊ वर्षांनंतर अमित मराठी मालिका विश्वात दमदार कमबॅक करणार आहे.
'बिग बॉस'च्या घरात नवा ट्विस्ट; किरण माने सिक्रेट रूममधून घरातील सदस्यांवर लक्ष ठेवणार
Bigg Boss Marathi 4 : छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 4) शोमध्ये मागच्या आठवड्यापासून अनेक ट्विस्ट पाहायला मिळतायत. शो चे होस्ट महेश मांजरेकर यांनी या आठवड्यात घरात डबल एविक्शन होणार म्हटल्यावर शो मध्ये वेगळा ट्विस्ट पाहायला मिळाला. या आठवड्यात यशश्री मसुरकर हिचे एविक्शन झाले. तर, घरातील दुसरा सदस्य कोण एविक्ट होणार याबाबत प्रेक्षकांमध्ये देखील उत्सुकता होती.
Munmun Dutta: तारक मेहता का उल्टा चष्मामधील 'बबिता'चा अपघात
Munmun Dutta: अभिनेत्री अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील मुनमुनच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेत मुनमुन 'बबिता जी' ही भूमिका साकारते. सध्या मुनमुन ही जर्मनीमध्ये आहे. जर्मनीमध्ये मुनमुनचा अपघात झाला आहे. नुकतीच मुनमुननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन अपघाताबाबत माहिती दिली.
Dharavi Bank: 'धारावी बँक' रसिकांच्या भेटीला
Dharavi Bank: काही कलाकारांमुळे प्रेक्षकांचं सिनेमाकडे लक्ष वेधलं जातं, तर काही दिग्दर्शकांमुळे. दिग्दर्शक समित कक्कड हे आज मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील एक असं नाव बनलं आहे, ज्याची कलाकृती म्हणजे नावीन्यपूर्ण विषयाची जणू खात्रीच. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समितनं रसिकांसोबतच सिनेसृष्टीचंही मन जिंकलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या समितच्या '36 गुण' या चित्रपटाचं समीक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनीच कौतुक केलं आहे. कायम वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृती बनवण्याला प्राधान्य देणारा समित रोमँटिक सिनेमानंतर अंडरबेलीवर प्रकाश टाकणारी 'धारावी बँक' हिंदी वेब सिरीज घेऊन आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -