नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू अशी ओळख एलन मस्क यांना गेल्या काही महिन्यांपासून मिळाली आहे. एलन मस्क हे टेस्लाचे मालक असून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे मालक आहेत. एलन मस्क यांच्या टेस्ला या कंपनीच्या शेअरमध्ये मंगळवारी मोठी घसरण झाली. याचा फटका मस्क यांना बसला, अब्जाधीशांच्या यादीत यामुळं उलटफेर पाहायला मिळाला. एलन मस्क यांची संपत्ती एका दिवसात 22.2 अब्ज डॉलर्सनं कमी झाली. दुसरीकडे अमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस यांच्या संपत्तीत वाढ झाली. जेफ बेजोस हे अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर तर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग तिसऱ्या स्थानावर आहेत.
एलन मस्क यांची कंपनी टेस्लाचे शेअर मंगळवारी गडगडले. वॉल स्ट्रीटवर टेस्लाच्या शेअरमध्ये 8.39 टक्क्यांची घसरण झाली. टेस्लाचं बाजारमूल्य देखील 8.39 टक्क्यांनी घसरलं. नोव्हेंबरनंतर पहिल्यांदा टेस्लाचं बाजारमूल्य घसरलं आहे. नोव्हेंबरनंतर पहिल्यांदा टेस्लाचं बाजारमूल्य 1 ट्रिलियन डॉलरच्या खाली आलं आहे.
जानेवारी महिन्यात टेस्लाच्या कारमध्ये घसरण झाली आहे. यूरोपियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार टेस्लाची जानेवारीतील यूरोपमधील विक्री 45 टक्क्यांनी घसरली आहे. मात्र, त्याचवेळी ईलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 37 टक्क्यांची वाढ झाली आहे. एलन मस्कची नेटवर्थ देखील एका दिवसात घटली आहे. मस्कची नेटवर्थ 22.2 अब्ज डॉलर्सनं घसरुन 358 अब्ज डॉलर्सवर आली आली आहे.
अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोसच्या संपत्तीमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. जेफ बेजोस सध्या 233 अब्ज डॉलर्सच्या नेटवर्थ सह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे अब्जाधीश आहेत.
फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्ग हे अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर होते. त्यांच्या संपत्तीत 3.67 अब्ज डॉलर्सची घसरण झाली. यामुळं ते ब्लूमबर्ग बिलेनिय इंडेक्समध्ये तिसऱ्या स्थानावर घसरले.
बर्नार्ड अर्नाल्ट चौथ्या स्थानावर
बर्नार्ड अर्नाल्ट यांच्या संपत्तीत 1.16 अरब डॉलर्सनं कमी झाली. मात्र, त्यांना एका स्थानाचा फायदा झाला. ते चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. लॅरि एलिसन एक स्थानानं खाली घसरलं. मंगळवारी एलिसन च्या संपत्तीमध्ये 2.59 अब्ज डॉलर्सची घसरण झाली. यामुळं बर्नार्ड चौथ्या स्थानावर पोहोचले. बर्नार्डकडे 192 अब्ज डॉलर्स तर एलिसनकडे 190 अब्ज डॉलर्स संपत्ती आहे.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी एलन मस्क यांनी भारतात कार निर्मिती प्रकल्प सुरु करु नये असं म्हटलं होतं. मात्र, एलन मस्क भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मिती सुरु करु शकतात.
इतर बातम्या :