Entertainment News Live Updates 22 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Genelia Deshmukh, Riteish Deshmukh: स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) मालिकेतील मल्हार आणि सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिकेतील जयदीप-गौरीच्या नात्यात बरीच उलथापालथ सुरु आहे. मल्हार आणि मोनिकाच्या नात्यात स्वराजमुळे कटुता निर्माण झालीय. तर तिकडे जयदीप-गौरीही एकमेकांपासून दुरावले आहेत. दोन्ही मालिकांमध्ये जरी नात्यात दुरावा निर्माण झाला असला तरी प्रेम मात्र निरंतर आहे. याच प्रेमाची जाणीव करुन देण्यासाठी मालिकेत दोन खास पाहुणे येणार आहेत. तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या सेटवर रितेश आणि जिनिलिया दोघांनीही खास भेट दिलीय. नातं प्रेमामुळे टिकतं. कितीही अडचणी आल्या तरीही प्रेमासाठी खंबीर रहायचं. आपण हरलो तर प्रेमही हरतं म्हणून हिंमतीने लढायचं हा अनोखा संदेश रितेश-जिनिलियाने स्वराज आणि मल्हारला दिलाय.
Deepika Padukone: औरंगाबादचा यशराज मुखाटे (Yashraj Mukhate) हा त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतो. चित्रपटातील सिन्स, कलाकारांचे डायलॉग्स या सर्वांना यशराज म्युझिकल ट्विस्ट देतो. त्यानी एडिट केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. रसोडे मै कौन था, साडा कुत्ता हे यशराजनं एडिट केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. या व्हिडीओला नेटकऱ्यांसोबतच सेलिब्रिटींची देखील पसंती मिळाली. नुकताच यशराजनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, यशराज हा अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) फिफा वर्ल्ड कप रिल व्हिडीओला म्युझिकल ट्वीस्ट देत आहे.
Manoj Muntashir: प्रसिद्ध गीतकार मनोज मुंतशीर(Manoj Muntashir) हे सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. मनोज यांनी सोमवारी (19 डिसेंबर) भोपाळमधील रवींद्र भवन येथे आयोजित एका कर्यक्रमामध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये मनोज यांनी केलेल्या भाषणानं अनेकांचे लक्ष वेधलं. 'परदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा देशभक्त होऊ शकत नाही' असं या भाषणामध्ये मनोज म्हणाले.
Pathaan New Song OUT: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं प्रदर्शित झालं होतं. आता या चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याचं नावं 'झूमे जो पठाण' (Jhoome Jo Pathan) असं आहे.
पाहा गाणं:
Ram Setu OTT Release: बॉलिवूडमधील अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा त्याच्या आगामी चित्रपटांमुळे सध्या चर्चेत आहे. 26 ऑक्टोबर रोजी त्याचा राम सेतू (Ram Setu) हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटात अक्षयसोबतच जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरूचा आणि सत्यदेव कंचरण या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत स्ट्रीम केला जाणार आहे.
Gautami Deshpande: मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) ही सोशल मीडिया सक्रिय असते. वेगवेगळ्या पोस्ट गौतमी सोशल मीडियावर शेअर करते. गौतमीनं नुकता एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली. हा व्हिडीओ शेअर करुन गौतमीनं तिची फूड ऑर्डर चोरीला गेल्याची माहिती दिली. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधलं.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Rapchik Kolinbai : 'रापचिक कोळीणबाई' गाण्यात अमृताची नखरेल अदा
Amruta Patki: अभिनेत्री अमृता पत्की (Amruta Patki) हिने ग्लॅमर विश्वात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 2006 च्या ‘मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेपर्यंत यशस्वी ठरल्यानंतर अमृताने आंतरराष्ट्रीय पातळीवरही ‘मिस अर्थ’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि तिथेही ‘मिस अर्थ एअर’चा किताब मिळवला होता. अमृताने 2010 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर काही मराठी चित्रपटांमध्ये ती झळकली होती. मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेली ही गुणी अभिनेत्री आता बऱ्याच कालावधीनंतर ‘सुर्या’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. सध्या मराठी चित्रपटात बॉलीवूड तारका आयटम साँगवर थिरकताना दिसतायेत. या यादीत अमृताचाही समावेश झाला आहे. अमृता पत्की हिच्या नृत्याचा जलवा ‘सुर्या’ या आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे.
Samantha Ruth Prabhu Health : समंथा सिनेसृष्टीतून ब्रेक घेणार?
Samantha Ruth Prabhu Health : सौंदर्यवती समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून ती आजारपणामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीमुळे ती सिनेसृष्टीपासून ब्रेक घेणार असल्याचे म्हटले जात होते. आता तिच्या प्रकृतीसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Namrata Shirodkar: नम्रता शिरोडकरनं सांगितलं अभिनय क्षेत्र सोडण्याचं कारण; म्हणाली, 'महेश बाबूनं...'
Namrata Shirodkar: अभिनेत्री नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध होती. नम्रतानं अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत स्क्रिन शेअर केली. तिनं काही हिट चित्रपटांमध्ये देखील काम केलं. नम्रतानं फेब्रुवारी 2005 मध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूसोबत(Mahesh Babu) लग्नगाठ बांधली. त्यानंतर ती रुपेरी पडद्यावर दिसली नाही. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नम्रता शिरोडकरनं अभिनय क्षेत्र सोडण्यामगचं कारण सांगितलं.
Deepika Padukone Troll: 'रेनकोट घातलाय...'; फिफा वर्ल्ड कप 2022 ला गेलेल्या दीपिकाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Deepika Padukone Troll: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही सध्या चर्चेत आहे. यंदा दीपिकाला फिफा वर्ल्ड कप 2022 (fifa world cup final 2022) ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. ट्रॉफीचं अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलीवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे. ट्रॉफीचं अनावरण करणाऱ्या दीपिकानं एक खास लूक केला होता. दीपिकाच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं. सध्या काही नेटकरी दीपिकाच्या ड्रेसला ट्रोल करत आहेत.
Gadad Andhar Teaser: पाण्याखालचं विश्व दाखवणारा 'गडद अंधार'
Gadad Andhar Teaser: पाणी आणि मानवी जीवन यांचं नातं अतूट आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अवतार : द वे आॅफ वॅाटर' या हॅालिवूड चित्रपटात प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे पाण्याखालचं विश्व दाखवण्यात आलं आहे. तंत्रज्ञानाच्या या शर्यतीत मराठी चित्रपटही कुठेच मागे नसल्याचं दर्शवणारा सुपर नॅचरल थ्रीलर 'गडद अंधार' हा चित्रपट 3 फेब्रुवारी 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. पाण्याखालचं अद्भुत आणि रहस्यमय विश्व दाखवणारा 'गडद अंधार' चा टीझर उत्सुकता वाढवणारा आहे. या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार याबाबतचं कुतूहल जागं करणाऱ्या या टिझरला नेटकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, सिनेप्रेमींद्वारे 'गडद अंधार'चा टिझर शेअर करण्यात येत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -