Entertainment News Live Updates 22 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Aug 2022 08:21 PM
Takatak 2 : 'टकाटक 2'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद; पहिल्या वीकेंडला केली 2.11 कोटींची कमाई

Takatak 2 : मराठी प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा 'टकाटक' मनोरंजनाचा खजिना खुला झाला आहे. मराठी तिकिटखिकडीवर प्रेक्षक 'टकाटक' मनोरंजनाची जादू अनुभवत आहेत. 'टकाटक 2' (Takatak 2) या मराठी सिनेमाने प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यश मिळवलं आहे. याच बळावर 'टकाटक 2'च्या खात्यावर पहिल्या वीकेंडला तब्बल 2.11 कोटी रुपयांचा गल्ला जमा झाला आहे. जन्माष्टमीच्या मुहूर्तावर 18 ऑगस्ट रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच प्रेक्षक गर्दी करत आहेत.

'पुष्पा 2'च्या शूटिंगला सुरुवात

'पुष्पा द रुल' या सिनेमाच्या शूटिंगला अखेर सुरुवात झाली आहे. 'पुष्पा: द रूल' या सिनेमात 'पुष्पा: द राइज' प्रमाणेच प्रेक्षकांना नाट्य, अॅक्शन आणि थ्रिल बघायला मिळणार आहे. 'पुष्पा: द रूल' या सिनेमाची निर्मिती 500 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात येणार आहे. निर्माते या सिनेमाच्या प्रमोशनसाठी 500 कोटी खर्च करणार आहेत. हा सिनेमा 10 भाषांमध्ये रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे. आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याने प्रेक्षक 'पुष्पा: द रूल'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच सिनेमागृहात 'पुष्पा: द रूल' हा सिनेमा धमाका करणार आहे. 

Jailer : सुपरस्टार रजनीकांतच्या 'जेलर'चे फर्स्ट पोस्टर आऊट

Jailer : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. 'जेलर' (Jailer) असे या सिनेमाचं नाव आहे. नेल्सन मंडेलाने (Nelson Mandela) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाचे शूटिंग सुरू झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. अशातच आज या सिनेमाचे फर्स्ट पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीनं शेअर केला खास व्हिडीओ: वील चेअरवर केला योगा

Daagdi Chawl 2 : 'दगडी चाळ 2'ने सिनेमागृहात रोवला यशाचा झेंडा

Daagdi Chawl 2 : 'दगडी चाळ 2' (Daagdi Chawl 2) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. चंद्रकांत कणसे (Chandrakant Kanse) दिग्दर्शित या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या सिनेमाने सिनेमागृहात यशाचा झेंडा रोवला आहे. तीन दिवसांत या सिनेमाने दोन कोटींहून अधिक कमाई केली आहे. 

लोकप्रिय डिझायनर दिलीप छाब्रिया ईडी कार्यालयात हजर

लोकप्रिय डिझायनर दिलीप छाब्रिया यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले होते. त्यानुसार ते आता ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. ईडीने छाब्रिया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. 

नवा लूक अन् डॅशिंग अवतार! कपिल शर्मा लवकरच टीव्हीवर परतणार

Sushmita Sen : सुष्मिता सैननं शेअर केला पर्फेक्ट फॅमिली फोटो

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अद्याप जैसे थे, 13व्या दिवशीही कॉमेडियन बेशुद्धच!

सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांना अजून शुद्ध आलेलीच नाही. 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.


 





Koffee With Karan: कॉफी विथ करणमध्ये कियारा आणि शाहिदनं मारल्या मजेशीर गप्पा; उलगडणार अनेक गुपितं

Sunny : ललित प्रभाकरच्या नव्या चित्रपटाची घोषणा; 18 नोव्हेंबरला 'सनी' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘आई कुठे काय करते’मधील गौरीचा मनमोहक अंदाज, साडीत दिसतेय खास!

‘आधी वक्तव्य केलंय, तर आता परिणाम...’, अनुपम खेर यांची आमिर खानवर टीका!

आता आमिर खानच्या या चित्रपटाच्या फ्लॉप होण्याबाबत अनुपम खेर यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यात त्यांनी अभिनेत्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अनुपम खेर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉयकॉट ट्रेंडवर प्रतिक्रिया दिली. आमिर खानचे वक्तव्य यामागचे कारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वाचा संपूर्ण बातमी

Prajaktta Mali : प्राजक्ता माळीनं शेअर केले खास लूकमधील फोटो

Sacheen Littlefeather : अखेर 50 वर्षांनंतर ऑस्करनं अभिनेत्री सचिन लिटिलफेदर यांची मागितली माफी; पुरस्कार स्वीकारण्यास दिला होता नकार

Sacheen Littlefeather : अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने म्हणजेच ऑस्करनं नुकतीच पन्नास वर्षांपूर्वीच्या प्रकरणाबद्दल माफी मागितली आहे. ऑस्करनं 45 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये अभिनेत्री सचिन लिटिलफेदर ( Sacheen Littlefeather) यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. अमेरिकन कार्यकर्त्या आणि अभिनेत्री सचिन लिटिलफेदर  यांची माफी ऑस्करनं मागितली. 


Happy Birthday Chiranjeevi : ‘ऑस्कर’ सोहळ्याला जाणारा पहिला दक्षिणात्य अभिनेता!

साऊथ इंडस्ट्रीतील मेगास्टार चिरंजीवी (Chiranjeevi) या लोकप्रियता केवळ देशातच नव्हे तर परदेशातही पसरलेली आहे. आज (22 ऑगस्ट), साऊथचा हा सुपरस्टार अर्थात अभिनेते चिरंजीवी आपला 66वा वाढदिवस साजरा करत आहेत. ‘हिरो’, ‘चॅलेंज’, ‘इंद्रा’ आणि ‘खून का रिश्ता’ यांसारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. चिरंजीवी अशा कुटुंबातून आहेत, ज्यांच्या पिढ्यानपिढ्या मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. आपल्या कुटुंबियांप्रमाणे त्यांनीही अभिनय क्षेत्र निवडले.

‘या’ कारणामुळे ‘फिल्मफेअर’ विरोधात कंगना कोर्टाचा दरवाजा ठोठावणार!

यावेळेस कंगनाने चक्क ‘फिल्मफेअर’शी (Filmfare) पंगा घेतला आहे. कंगनाने फिल्म मॅगझिनवर दावा ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. तिने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.



‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची बॉलिवूडवर टीका!

विवेकच्या मते, बॉलिवूड हे सामान्य माणसाला समजून घेण्याची जागा नाही. इतकेच नाही, तर विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडला प्रतिभेचे कब्रस्तान म्हटले आहे. नुकतेच विवेक अग्निहोत्रीनेही सातत्याने फ्लॉप होणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांवर मोठे वक्तव्य केले आहे. आता त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, बॉलिवूड जसे दिसते, तसे नाहीय. येथे स्वप्ने चिरडली जातात.


 





गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली ज्युनियर एनटीआरची भेट, ट्विट करत केले अभिनेत्याचे कौतुक!

देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) सध्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. या दरम्यान नुकतीच त्यांनी साऊथचा प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआर (Jr. NTR) याची भेट घेतली.


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा शो पुन्हा रद्द


स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा बंगळुरू येथे होणारा शो रद्द करण्यात आला आहे. मुनव्वरच्या 'डोंगरी टू नोव्हेअर' या शोला पोलिसांनी मान्यता न दिल्याने हा शो रद्द करण्यात आला आहे. पोलिसांची परवानगी न मिळाल्याने कार्यक्रम रद्द करण्याची ही दुसरी वेळ आहे.


चिरंजीवीच्या 'गॉडफादर'चा टीझर आऊट


सध्या अनेक दाक्षिणात्य सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या सिनेमांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. चिरंजीवीचा 'गॉडफादर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 'गॉडफादर' हा सिनेमा 'लूसिफर' या ब्लॉकबस्टर मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे.


हृतिक रोशनच्या 'महाकाल की थाली'च्या जाहिरातीच्या वादात झोमॅटोने मागितली माफी


माफी मागून झोमॅटो कंपनीने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, जाहिरातीमध्ये बोललेल्या महाकाल की थाली या शब्दाचा अर्थ 'महाकाल रेस्टॉरंट'चा होता, महाकालेश्वर मंदिराचा नव्हता. वास्तविक, झोमॅटोच्या या नव्या जाहिरातीत हृतिकने म्हटले आहे की, "मला भूक लागली होती म्हणून महाकालकडून थाळी मागवत आहे." या जाहिरातीत महाकालेश्वर मंदिराच्या नावाने हृतिक रोशनच्या जाहिरातीवरून गदारोळ झाला होता. हृतिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


'देवमाणूस 2' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप


'देवमाणूस' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. 'देवमाणूस 2' मालिकेत येणारे नव-नवे ट्विस्ट प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन करत असतात. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली असून लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे 'देवमाणूस 2' मालिकेचा चाहतावर्ग नाराज झाला आहे.


हजर होण्यासाठी रणवीरने पोलिसांकडे दोन आठवड्यांची मुदत मागितली


न्यूड फोटोशूट प्रकरणी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह उद्या (22 ऑगस्ट) चौकशीसाठी मुंबईतील चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहू शकणार नाही. त्याने याबाबत पोलिसांना कळवलं असून हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे. आता चेंबूर पोलीस नवीन तारीख निश्चित करुन नवा समन्स पाठवतील. अभिनेता रणवीर सिंहने 'पेपर' या मॅगझीनसाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. मात्र त्याला हे फोटोशूट चांगलंच महागात पडल्याचं चित्र आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.