पुणे: पुण्यात बोपदेव घाटात रात्री आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका 21 वर्षीय तरुणीवर आणि तिच्या मित्रावर हल्ला करण्यात आला. शस्त्राचा आणि लाकडी दांडक्यांचा धाक दाखवत त्यांच्याजवळ असेलल्या वस्तू घेऊन तरूणाला झाडाला बांधून ठेवण्यात आलं तर तरूणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केला. या घटनेतील तीन आरोपी फरार होते, घटनेची सखोल चौकशी सुरु होती. आता अखेर पोलिसांच्या हाती मोठे यश लागले आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.


पुणे: बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर चोरीचे गुन्हे याआधी दाखल झालेले आहेत. त्यातील एकावर बलात्काराचा गुन्हा देखील दाखल आहे. गुरुवारी मध्यरात्री 21 वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्यानंतर कुठल्याही सीसीटीव्हीमध्ये ते सापडू नयेत यासाठी त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. बोपदेव घाटाच्या मधोमध सामूहिक बलात्काराची घटना घडल्यावर आधी ते बोबदेव घाटाच्या वरच्या भागात गेले, तिथून काही वेळाने त्याच रस्त्याने घाट उतरुन कोंढवा भागात आले. 


मिळालेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटामध्ये 21 वर्षीय तरूणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन आरोपींना नागपुरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. ताब्यात घेतलेल्यांची सखोल चौकशी सुरु आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली आहे. 


कोंढवा भागात अनेक वेगवेगळ्या रस्त्यांनी त्यांनी ट्रीपल सीट प्रवास केला. जेणेकरुन सीसीटीव्हीची साखळी तुटावी. मात्र पोलीसांना तपास करताना कोंढवा भागातील एका व्यक्तीने या तिघांना ट्रीपल सीट फिरताना पाहिल्याचे सांगितले. पोलीसांनी त्या दिशेने तपास केला आणि पुण्याजवळील ग्रामीण भागातून काल एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली‌ आणि या गुन्ह्याचा उलगडा झाला. त्याच्या दोन साथिदारांकडे देखील चौकशी सुरु आहे.


या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या 60 टीम पोलिसांनी तयार केल्या होत्या. मात्र घटनेच्या 9 दिवसानंतरही आरोपी मोकाट असल्याने पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. त्यामुळे सगळीकडून या घटनेचा आणि पोलिसांच्या तपासावर संताप व्यक्त केला जात होता. आरोपींचे स्केच तयार केले आहेत. शिवाय आरोपीची माहिती देणाऱ्याला 10 लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. आतापर्यंत रेकॉर्डवरील 400 गुन्हेगारांची झाडझडती घेण्यात आली आहे. 


या प्रकरणातील संशयित आरोपीचे स्केच कोंढवा पोलीस स्टेशनने प्रसिध्द केले होते. याबाबत काही माहिती मिळाल्यास खालील त्वरित संपर्क साधावा असे पोलीसांनी आवाहन केले होते.